शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

शहरी निसर्गाची ओळख

By अोंकार करंबेळकर | Updated: April 27, 2018 19:58 IST

निसर्ग पहायला आपण निसर्गरम्यस्थळी जातो.. कशाला? आपल्या अवतीभोवतीही निसर्ग असतोच की..

शहरात कसला आलाय निसर्ग. निसर्ग म्हटलं की डोंगर पाहिजेत, नद्या पाहिजेत, भरपूर पक्षी-प्राणी हवेत, गवत हवे वगैरे वगैरे अशा समजुती आपल्याकडे असतात. शहरामध्ये काही नसतंच असं अनेकांना वाटतं; पण ही समजूत एका मुंबईकर मुलीने मोडीत काढली आहे. आपल्याकडच्या शहरांमध्येही कित्येक वर्षे जुनी झाडे आहेत, वेगवेगळ्या जातींचे दुर्मीळ वृक्ष मुंबई-पुण्यासारख्या शहरांमध्ये बागांमध्ये किंवा रस्त्यांच्या दुतर्फा लावलेले आहेत. काही वृक्ष ब्रिटिशकालीनसुद्धा आहेत. रोज येता-जाता आपण या झाडांकडे पाहात असतो; पण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. ऋतुचक्रानुसार ठरावीक काळात त्यांना बहर येतो, फळं, शेंगा लागतात, पानं गळतात याची काहीच माहिती आपण घेत नाही.गौरी गुरवला मात्र हेच खटकत होतं. शहरातील लोकांना त्यांच्या आजूबाजूच्या वृक्षांची ओळख करून देण्यासाठी ती शहरामध्येच नेचर ट्रेल आयोजित करते. त्या कामात तिची मैत्रीण श्रेया भानपही आघाडीवर असते.गौरीचं शिक्षणच मुळी पर्यावरण विषयाशी संबंधित होतं. निसर्गाची आवड लहानपणापासूनच, तिच्या या आवडीला आणि तिने निवडलेल्या क्षेत्राचा घरातील लोकांचाही पाठिंबा होताच त्यामुळं तिला पुढची वाटचाल सोपी गेली. एम.एस्सी. बॉटनी झाल्यावर तिने बीएनएचएसतर्फे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या निसर्ग माहिती केंद्रात प्रकल्प अधिकारी म्हणून कामाला सुरुवात केली. त्यावेळेस या केंद्राला भेट देणाऱ्या शाळा-महाविद्यालयांतील मुलांना पर्यावरणाची तसेच उद्यानातील प्रजातींची माहिती देणं, त्यांची ओळख करून देणं आणि त्यांच्यापर्यंत पर्यावरण संवर्धनाचा संदेश पोहोचवणं असं तिच्या कामाचं स्वरूप होतं. गौरीलाही हे माहिती देण्याचं काम आवडलं आणि मुलांच्या प्रतिसादामुळे ते अधिकच शक्य झालं. त्यानंतर २००८ साली तिनं डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडिया (विश्व प्रकृती निधी) या संस्थेत सहाय्यक शिक्षण अधिकारी या पदावरती काम सुरू केलं आणि त्यानंतर वरिष्ठ शिक्षण अधिकारी पदावर २०१५ पर्यंत तिने काम केलं. हे कामसुद्धा महाराष्ट्रातील शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपासून सामान्य लोकांपर्यंत पर्यावरणाची माहिती देण्याचं होतं. मुलांसाठी माहितीपर वेगवेगळ्या कार्यशाळा घेणं, निसर्गभ्रमंती, निसर्गशिबिरं भरवणं, स्लाइड शोच्या माध्यमातून मुलांना माहिती देणं असं तिच्या आवडीचंच काम होतं. आता गेली तीन वर्षे श्रेयाबरोबर तिने ओयकोइसेन्स या फर्मतर्फे स्वतंत्र काम सुरू केलं आहे.कॉलेजमध्ये शिकत असतानाच तिला सर्वांबरोबर आजूबाजूच्या झाडांचं निरीक्षण व अभ्यास करण्याची संधी मिळाली. त्यामुळे तिला झाडांची वैशिष्ट्ये, त्यांची रचना, आकार, पाने-फुले यांची माहिती गोळा करण्याची आवडच निर्माण झाली आणि त्याची सवय लागली. प्रत्येक वृक्षाच्या संबंधी काही गोष्टीही आपल्याकडे पूर्वापार चालत आल्या आहेत. त्याचा उपयोग करून झाडांची माहिती लोकांना करून देणं तिला मस्त वाटली. तिनं हेच काम पुढे न्यायचं ठरवलं. नवीन पिढी ही माहिती ऐकायला उत्सुक असते असा तिचा अनुभव आहे. आपल्या राहाण्याच्या आसपासच्या प्रदेशातच असणाºया जैवविविधतेबाबत त्यांना आणखी माहिती घ्यायला आवडतं हे तिच्या लक्षात आलं. शहरांमधील वृक्षसंपदा हीसुद्धा महत्त्वाची आहे, शहरांमधील तो आॅक्सिजनचा मोठा स्त्रोत आहे. प्रदूषण कमी होण्यासाठी त्यांचा मोठा आधार असतो. शहरातील धकाधकीच्या जीवनामध्ये रिफ्रेश होण्यासाठी वृक्षांचा आधार घेणं कधीही चांगलंच.शहरातील वनराजीबद्दल बोलताना ती सांगते, सर्व लोकांनी एकत्र येऊन ही वृक्षसंपदा टिकवणं गरजेचं आहे. आपल्या आसपासच्या जैवविविधतेची एक सूची तयार केली पाहिजे. नक्की कोणतं झाड कोठे आहे, त्याची जागा कोणती हे, ते निरोगी आहे की नाही आपल्याला माहिती हवं. ही माहिती असल्यामुळं विनाकारण होणारी वृक्षतोड थांबवता येईल. बहुतांशवेळा लोकांच्या अज्ञान आणि दुर्लक्षामुळं झाडांची तोड होते. यासाठी झाडांची माहिती असणं आवश्यक आहे असं तिचं मत आहे.

कचरा कमीच केला तर..शहरी पर्यावरणाचा विचार करताना कचऱ्याचा मोठा प्रश्न सर्वदूर दिसतो. याबद्दल गौरी सांगते, आपल्या घरातील कचरा बाहेर नेऊन टाकणं आणि शहरातील कचरा शहराबाहेर नेऊन टाकणं यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. तर मुळातच कचरा कमी केल्याने, त्याचा पुनर्वापर कमी केल्यामुळे ती समस्या सोडवण्यास मदत होऊ शकते, पैसे आहेत म्हणून मी वाट्टेल ते खरेदी करीन आणि टाकून देईन ही वृत्ती पर्यावरणपूरक नाही, असं तिला वाटतं.