शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

मी काहीच करत नाही !

By admin | Updated: September 4, 2014 17:21 IST

कुणी जग बदलयाचा प्रयत्न करतय , कुणी समाज. कुणी व्यवस्था आणि आम्ही ?

विनोद कटारे, औरंगाबाद
 
देशात सगळीकडे बरंच काही, ब-याच जणांसाठी बदलतंय. पण आमच्यासाठी काहीही बदलत नाहीये. म्हणायलाच तरुणांचा देश, तरुणांचा संताप, 50 टक्के जनता तरुण, पण इथं आमच्या आयुष्यात बदलत काही नाही.
काहीजण करतातही बदलांसाठी प्रयत्न. रस्त्यावर उतरतात, जाब विचारतात, माहिती मिळवतात, हक्क मागतात. पण काहीजण मात्र फक्त शांत बसतात. सहानुभूती व्यक्त  करतात. 
त्या शांत बसणा-यातला मी ‘एक’.
काय करतो मी, मला देशातले बरे वाईट बदल दिसतात. बलात्काराच्या घटना दिसतात. दलितांवरचे अत्याचार दिसतात. शोषण दिसतं. गरिबी, लाचारी दिसते. ते सारं नुस्तं दिसत नाही, तर जाणवतंही.
पण हे सारं दिसूनही मी रस्त्यावर नाही उतरु शकतं. मी नुस्ता पाहतो. माङयासारखेच अनेक तरुण आहेत ज्यांनी अवतीभोवतीच्या परिस्थितीची माहिती आहे. पण त्या परिस्थितीला विरोधही ते करु शकत नाहीत. ते काहीच करु शकत नाहीत.
कारण जग बदलायच्या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी ¨हंमत लागते ती आपल्यात आहे हे आम्हाला पक्कं माहिती आहे. पण त्या हिमतीचं करायचं काय, आम्ही पार अडकलोय आमच्याच जबाब दा-यांमध्ये.
जगाचा विचार मग करू, आधी स्वत:चे प्रश्न सोडवू, आधी आहे त्या कटकटी निस्तरू म्हणत आम्ही आमच्याच आयुष्यातले गुंते सोडवतो आहोत. काही गोष्टी ऐकायला, बोलायला ब:या वाटतात. पण प्रत्यक्षात कोणी त्या करत नाहीत, कारण आपले प्रश्न सोडवू लागायला, मदतीलाही कुणी येत नाही. आपलं आयुष्य एका वतरुळासारखं, त्यातून बाहेर पडण्याचाच मार्ग सापडत नाही.
आम्ही आमच्या जगण्याचे, रोजीरोटीचे प्रश्न सोडवण्यातच इतके दमतोय की बाकी काही करायला त्रणच उरत नाही. 
मग आम्ही काय समाजात बदल घडवणार? काय देश बदलणार ? आम्ही फक्त सहानुभूतीच दाखवतो, जे कुणी आमच्यासारखे पिचलेले आहेत, त्यांच्यासाठी !
आणि पुरे पडतोय अपेक्षांना. घरच्यांच्या नोकरीच्या, करिअरच्या, चांगल्या पगाराच्या नोकरीच्या अपेक्षा पु-या करता करताच जीव जातोय. काय रस्त्यावर उतरता आणि व्यवस्था तोडतामोडता?
घरच्यांची जबाबदारी आहेच, कुटुंबाचा चरितार्थ चालवायचा आहेत, बहीण-भावाची जबाबदारीही आहेच अनेकांवर. हेच सारं धड जमत नाही म्हणून अवतीभोवतीची माणसं नाराज असतात. त्यांच्या नाराजीलाही उत्तरं सापडत नाहीत. मग सांगा, कितीही वाटलं तरी कसं सामील व्हायचं बदलाच्या प्रक्रियेत. कसं नी काय सांगायचं स्वत:ला?