शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी तारुण्यासाठी नव्या तंत्रस्नेही जगात उघडणारी एक खास खिडकी-गोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 17:56 IST

कोरोनाकाळात सारं जग ऑनलाइन जात असताना ज्यांच्या हातात तंत्रज्ञान नाही ते मागे पडतील का? - तर तसं होऊ नये म्हणून केंद्र सरकारने आदिवासी तरुणांसाठी एक खास उपक्रम सुरूकेला आहे..

- निशांत वानखेडे

आताचे युग हे तंत्रज्ञानाचे आहे, हे नव्याने सांगायला नको. जो तंत्रस्नेही असेल तोच या काळात टिकेल, असे म्हणणो अतिशयोक्ती ठरणार नाही. कोरोनाने ही वेळ थोडी लवकर आणली, हे नक्की. पण मग जंगल-पहाडात, दुर्गम भागात राहणारा आदिवासी तरु ण या तंत्रज्ञानाच्या युगात पुन्हा मागे पडेल का? - हा प्रश्न आहेच.गेल्या कित्येक पिढय़ा दुर्गम भागात जगणा:या आदिवासी समाजाच्या नव्या पिढीतील तरुणाला आता कुठे शहरी धावपळीची ओळख होऊ लागली आहे. डिजिटल जगाची ओळख सांगणारे स्मार्टफोन आता कुठे त्यातील थोडय़ांच्या हातात पोहोचायला लागले आहेत. अशात वेगाने बदलणा:या घडामोडी त्यांच्या हातातून निसटतात की काय, असे वाटणारच. बदलत्या परिस्थितीत डिजिटल साहित्य हे रोजगाराचे महत्त्वाचं माध्यम झालं असताना ही साधनं आदिवासी तारुण्याशीही जोडली गेली पाहिजेत, ते गरजेचं आहे.त्यासाठीच केंद्र सरकारच्या आदिवासी कल्याण मंत्रलयाकडून एक उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला ‘फेसबुक’ची जोड मिळाली आहे. ‘गोइंग ऑनलाइन अॅज लीडर’ अर्थात ‘गोल’ असं या कार्यक्र माचं नाव आहे.या कार्यक्रमातून शासनाचा नेमका ‘गोल’ काय आहे, याविषयी प्रा. डॉ. केशव वाळके यांच्याकडून माहिती जाणून घेतली. डॉ. केशव वाळके हे मातृसेवा संघ समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक आहेत. केंद्र शासनाच्या या उपक्रमाविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आदिवासी तरुणांना सहभागी करण्यासाठी स्वत:हून ‘गोल’चा प्रचार करणं सुरूकेलं. 60- 70आदिवासी तरुणांची या उपक्रमासाठी नोंद केली असून, 31 जुलैर्पयत 2क्क् तरु णांना यात सहभागी करून घेण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘गोल’ नेमकं काय आहे?ग्रामीण आदिवासी तरुणांना डिजिटल साक्षर करणो, तंत्रस्नेही बनविणो आणि त्या माध्यमातून विविध क्षेत्रतील रोजगाराचे, नेतृत्वगुण विकसित करण्याचं प्रशिक्षण दिलं जाणार आहेत.फेसबुकच्या सहकार्याने केंद्रीय आदिवासी मंत्रलयाद्वारे हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. देशातील पाच हजार आदिवासी युवकांना डिजिटली प्रशिक्षित करण्याचं या उपक्रमाचं लक्ष्य आहे.हा संपूर्ण  उपक्रम ऑनलाइन चालणार आहे. आदिवासी तरुणांना ऑनलाइन नोंदणी करायची आहे. नोंदणीनंतर निवडलेल्या तरुणांना सात महिने ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मार्गदर्शनासाठी देशातील 25क्क् मेंटारची नियुक्ती करण्यात येत आहे. हे मेंटार कृषीपासून उद्योग क्षेत्र, समाजकारण ते राजकारण आणि आयटीआयपासून आयटीपर्यंतच्या क्षेत्रचे जाणकार असतील. एक मेंटार (प्रेरक) दोन आदिवासी युवकांना त्यांनी निवडलेल्या विषयावर मार्गदर्शन करेल. हे मेंटार प्रत्येक आठवडय़ाला दोन तास मार्गदर्शन करतील. म्हणजे महिन्यात आठ तास आणि सात महिन्यात 52 तासांचे प्रशिक्षण होईल. यात महत्त्वाची म्हणजे ज्या आदिवासी तरुणाकडे स्मार्टफोन नाही त्यांना फेसबुककडून स्मार्ट फोन आणि वर्षभरासाठी इंटरनेटची व्यवस्था मोफत दिली जाणार आहे.सात महिन्याचे प्रशिक्षण संपल्यानंतर त्यांनी निवडलेल्या क्षेत्रतील कंपनी, एखादी संस्था किंवा इतर ठिकाणी दोन महिने इंटर्नशिप (आंतरवासिता) करण्याची संधी प्रशिक्षणार्थी तरुणांना मिळेल. 18 ते 35 वयोगटातील कोणताही तरुण ‘गोल’च्या प्रशिक्षणात सहभागी होऊ शकेल. त्यासाठी शिक्षणाची कुठलीही अट नाही. चौथा-पाचवा वर्ग शिकलेला तरुणही या कार्यक्रमाद्वारे प्रशिक्षण घेऊ शकतो. प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र, औद्योगिक भेट आणि अन्य गोष्टींचा लाभ दिला जाणार आहे.डॉ. केशव वाळके यांच्या मते, ‘गोल’ उपक्रमातून विविध विषयाचे मार्गदर्शन देण्यात येणार आहे. आजही अनेक आदिवासी तरु णांचे शेती हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. मात्र या कृषिक्षेत्रतही नवीन काही शिकण्याची संधी गोलमध्ये मिळेल. ज्यांना उद्योग करण्याची इच्छा असलेल्यांसाठी स्टार्टअपचे मार्गदर्शन. कृषी, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, राजकारण अशा आदिवासी तरुणांनी निवडलेल्या कोणत्याही विषयाचे मेंटारद्वारे मार्गदर्शन मिळेल आणि इंटर्नशिप करण्याची संधी त्यांना मिळेल. त्यानंतर एकतर ते स्वत: काही करतील किंवा सोबतच्या इतर तरुणांना मार्गदर्शन करतील. त्यांच्यात लीडरशिपच्या क्वालिटी निर्माण होतील.अर्थात दुर्गम भागात इंटरनेट कव्हरेज मिळेल काय, मेंटारशी त्यांचा संवाद नियमित होईल काय, या प्रशिक्षणाचा तरुणांना लाभ होईल का, असे प्रश्न आजही आहेत; पण एका नव्या उपक्रमाची सुरुवात होते आहे, त्याला यश लाभलं तर उत्तमच आहे.अधिक माहितीसाठी ही साइट पहा.https://goal.tribal.gov.in/(निशांत लोकमतच्या नागपूर आवृत्तीत वार्ताहर आहे.)