शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

ऑलिम्पिकला ‘पात्र’ ठरलेल्या सरडे गावच्या प्रवीण जाधवची गोष्ट.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 6:30 AM

शेतमजूर आईवडिलांचा मुलगा. घरी अत्यंत गरिबी मात्र त्याची जिद्द अशी की, त्यानं ‘लक्ष्यभेद’ करायचं ठरवलं.

ठळक मुद्दे प्रवीण जाधव.  तिरंदाजीत त्याचं नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळून निघालं आहे.

- प्रगती जाधव-पाटील

गरिबी, दुष्काळ... वाचून-सांगून त्याविषयी कळतंही. मात्र जो गरिबीचे चटके भोगतो, त्याला कळतो त्यातला दाह आणि पोटात पेटलेली भूक. मात्र ती भूक हीच आपली ताकद हे ज्याला कळतं, तो हिमतीनं जगणंही पालटवू शकतो. त्याचंच एक उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातल्या सरडे गावचा प्रवीण जाधव.  तिरंदाजीत त्याचं नाव आज आंतरराष्ट्रीय पातळीवर उजळून निघालं आहे. गेल्या आठवडय़ात नेदरलॅण्डमध्ये झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत रजत पदक त्यानं जिंकलंच मात्र त्यासह तरुणदीप राय, अतानु दास आणि प्रवीण या भारतीय संघानं ऑलिम्पिकमध्ये सहभागाचं आपलं एण्ट्री तिकीटही मिळवलं. त्यामुळे आता तो ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.मात्र इथवरचा प्रवीणचा प्रवास सोपा नव्हता.सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात सरडे हे प्रवीणच मूळ गाव. वडील रमेश आणि आई संगीता यांच्याबरोबर प्रवीण सरडेत राहत होता. सरडे जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असताना त्याला विकास भुजबळ हे शिक्षक भेटले. घरची आर्थिक परिस्थिती वाईट, आईवडील शेतमजूर. त्यामुळं आपलं मोठं होणारं पोरगंही काहीतरी कमावून आपल्याला हातभार लावेल अशी त्यांना आशा होती.  शाळेची सोंग करण्यापेक्षा गुपगुमानं शेतात काम करायचं आणि  कमवायला लागायचं हा त्यांचा हेका होता. पण भुजबळ सर त्यांना क्रीडाक्षेत्रातल्या संधीविषयी सांगत होते. त्यात प्रवीणची जिद्द दांडगी. त्यामुळे त्याच्यापुढे वडिलांचं काही चाललं नाही. सातवीत असताना प्रवीण क्रीडा प्रबोधिनीत जाण्यासाठी प्रयत्न करू लागला. तिथं दाखलही झाला.घरी जाऊन खर्च वाढवण्यापेक्षा बाहेर राहून आपली गुजराण करू, असा विचार वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी प्रवीणच्या डोक्यात आला. शिक्षक सांगतील त्या वाटेने निमुटपणे तो चालत राहिला. कुटुंबीयांच्या आठवणीने कित्येक रात्नी रडण्यात गेल्या.मात्र ‘क्रीडा प्रबोधिनी’मध्ये प्रवेश मिळवण्याआधी झालेल्या परीक्षेमध्ये प्रवीण तिरंदाजीसाठी योग्य असल्याचं, प्रशिक्षकांचं मत पडलं. त्याच्या दंडांची ठेवण, शारीरिक ताकद ही या खेळासाठी योग्य असल्याचं तज्ञाचं मत झालं. तो या खेळात रमू लागला. शिक्षण पूर्ण करता करताच तो खेळातही प्रावीण्य मिळवत राहिला. वर्षभरापूर्वी प्रवीण हा स्पोर्ट्स कोटय़ाअंतर्गत भारतीय लष्कर सेवेत रुजू झाला. लहानपणी इतर मुलांच्या गळ्यात गोफात गुंतलेला बदाम त्याला आकर्षित करायचा. फौजेत गेल्यानंतर पहिल्या पगारात त्यानं वडिलांसाठी तसा बदाम आणि आईसाठी मंगळसूत्न केले. आपल्या कर्तृत्वात बहिणीसाठीही तिच्या आवडीचं काही तो आठवणीनं घेऊन आला. मजबुरी सगळं काही करवून घेते, हे तत्त्व मानणारा प्रवीण म्हणतो, ‘मला स्पर्धाचं कधीच टेन्शन येत नाही. लहानपणापासून परिस्थितीनं इतके खतरनाक चटके दिलेत की त्यापुढं नेम धरणं आता ताण देणारं वाटत नाही. माझे मानसिक ट्रेनरही याबाबत माझे कौतुक करत असतात.’ मात्र त्याला आपल्या आईवडिलांच्या कष्टाचीही जाण आहे, तो म्हणतो, ‘वडिलांची कष्ट करण्याची तयारी आणि आईचं परिस्थितीशी दोन हात करण्याचं कसब माझ्यात आलंय. हेच माझं भांडवल. यश मिळवणं आणि त्यात सातत्य टिकवणं हे माझं उद्दिष्ट आहे !’2013 पासून प्रवीणने तिरंदाजी खेळण्यास सुरुवात केली. 2015 साली त्याने बँकॉक येथे आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवली. त्यानंतर वल्र्डकप, एशिया कप, अशा सहा मोठय़ा आंतराष्ट्रीय स्पर्धात तो सहभागी झाला. त्यात दोन पदकंही जिंकली.आता या प्रवासाकडे पाहून काय वाटतं असं विचारलं तर प्रवीण म्हणाला, ‘परिस्थितीच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा विपरीत परिस्थितीलाच घाम फोडण्याची धमक आपल्यात पाहिजे. ही धमक जेव्हा आपल्यात येते ना तेव्हा आपण आपल्या वाटेनं चालायला लागतो!’

(प्रगती लोकमतच्या सातारा आवृत्तीत उपसंपादक आहे.)