शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

टच स्क्रीनची काळजी कशी घ्याल

By admin | Updated: April 2, 2015 18:00 IST

आजचा जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट हेसुद्धा टचस्क्रीनचे यायला लाग

- टेक टॉक
- अनिल भापकर
आजचा जमाना टचस्क्रीनचा आहे. स्मार्टफोन तर टचस्क्रीनचे आहेतच पण आजकाल कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब्लेट हेसुद्धा टचस्क्रीनचे यायला लागलेत. टचस्क्रीन मोबाइल हे इतर फिजिकल किबोर्ड मोबाइलपेक्षा वापरायला सोपे आणि फास्ट असतात. हल्लीच्या विविध डिक्शनरी अँपमुळे, मोबाइलच्या ऑपरेटिंग सिस्टिममध्ये असणार्‍या डिक्शनरीमुळे टचस्क्रीनचा टायपिंग स्पीड हा जास्त असतो. त्याचप्रमाणे टचस्क्रीनमुळे स्मार्टफोनचा स्क्रीन साइजदेखील वाढली आहे. कारण पूर्वी मोबाइलचा खालचा अर्धा भाग हा  किबोर्डसाठी असायचा आता टचस्क्रीनमुळे  मोबाइलचा पूर्ण भाग हा स्क्रीन म्हणून वापरता येतो.
एकेकाळी टचस्क्रीन मोबाइल नको रे बाबा म्हणणारेदेखील आजकाल सर्रास टचस्क्रीन मोबाइल आनंदाने वापरताना दिसत आहेत. अगदी दोन-अडीच हजारांपासूनसुद्धा टचस्क्रीन मोबाइल बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे टचस्क्रीन मोबाइल वापरण्याची संख्या ही सर्वाधिक आहे. त्यामुळे मोबाइलच्या टचस्क्रीनची काळजी कशी घ्यायला हवी हेही माहिती असायला हवे.
टचस्क्रीन? एवढं कराच.
१) नखाचा वापर करू नका
आपल्यापैकी अनेकांना मोबाइल वापरताना नखाने टचस्क्रीन वापरायाची सवय असते. टचस्क्रीन  हे बोटांसाठी बनविलेले आहे त्यामुळे नखांचा वापर हा टचस्क्रीनवर व्हायलाच नको. त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. 
 
२) हळूच टच करा
अनेकांना टचस्क्रीनचा अर्थच कळलेला नसतो. ते मोबाइल स्क्रीनचा वापर टचस्क्रीन म्हणून न करता प्रेसस्क्रीन म्हणून करतात. टचस्क्रीनवर अगदी हलक्या हाताने बोटांचा फक्त स्पर्श करायचा असतो; मात्र ही मंडळी एवढय़ा जोरात टचस्क्रीन प्रेस करतात की, त्यामुळे अनेकांचे टचस्क्रीन खराबदेखील झाले आहेत. त्यामुळे टचस्क्रीनला कधीही जोराने प्रेस करून वापरू नका. अगदी आल्हाद स्पर्श केला तरी टचस्क्रीन काम करतो.
३) सूर्यकिरणांचा संपर्क टाळा
टचस्क्रीन मोबाइल स्क्रीन जास्त वेळ सूर्यकिरणांच्या संपर्कात येऊ देऊ नका. कारण टचस्क्रीन तंत्रज्ञानामध्ये पातळ लिक्विडचा लेअर असतो. डायरेक्ट सूर्यकिरणांच्या जास्तवेळ संपर्काने तुमचा टचस्क्रीन खराब होऊ शोकतो. त्यामुळे चारचाकी गाडीमध्ये प्रवास करताना मोबाइल ज्या ज्या दिशेने ऊन येते त्या ठिकाणी ठेऊ नका.
 
४) छोटा कपडा नेहमी जवळ बाळगा
टचस्क्रीन व्यवस्थित काम करण्यासाठी तो स्वच्छ असणे गरजेचे असते. धूळ किंवा इतर काही कारणाने टचस्क्रीन अस्वच्छ झाला असल्यास त्याला त्वरित चांगल्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्या. त्यासाठी मऊ, स्वच्छ कपडा नेहमी जवळ ठेवा, तसेच दिवसातून दोन-तीन वेळेस टचस्क्रीन साफ करण्याची सवय लावून घ्या.
 
5) मोबाइल कव्हर वापरा
टचस्क्रीन मोबाइल असेल तर अशा मोबाइलला कव्हर लावून वापरा. कारण अनेकांना मोबाइल खिशात ठेवायची सवय असते. खिशात जर आणखी काही वस्तू असतील जसे की किचन, क्वाइन त्यामुळे टचस्क्रीन खराब होऊ शकतो. आजकाल अनेक कंपन्यांच्या मोबाइलसोबत फ्लिपकव्हर येतेच; मात्र नाही आल्यास विकत घेऊन फ्लिपकव्हर लावा. कारण त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण मोबाइल हातात पकडतो त्याचा दबावही टचस्क्रीवर येत नाही. 
6) स्क्रीनगार्ड 
नवीन स्मार्टफोन विकत घेतला की लगेच दुकानदाराकडून स्क्रीनगार्डची मागणी करा. (विकत घ्या) कारण स्क्रीनगार्डमुळे टचस्क्रीनचे लाइफ वाढण्यास मदत होते. हल्ली अनेक महागड्या स्मार्टफोनचे टचस्क्रीन हे स्क्रॅचप्रुफ असतात त्यामुळे त्यांनी स्क्रीनगार्ड नाही वापरले तरी चालते.