शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

किती भास मारतात..सतत शो-आॅफ करतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2017 11:03 IST

प्रत्येकालाच वाटतं की, ती अमकी, तो ढमका काय भास मारतो. त्याला त्याच्या अमक्या, तमक्या गोष्टीचा गर्व आहे. सगळं कसं नीट आहे त्यांच्या आयुष्यात, वेळ आहे.

- प्राची पाठककाहीजण फार भास मारतात,सतत शो-आॅफ करतातअसं आपल्याला वाटतं.म्हणजे खरंच ते भास मारत असतात, कीआपल्यालाच तसं वाटतं?का वाटतं?आपण मारतो का कधी भास?कशासाठी मारतो?प्रत्येकालाच वाटतं की, ती अमकी, तो ढमका काय भास मारतो. त्याला त्याच्या अमक्या, तमक्या गोष्टीचा गर्व आहे. सगळं कसं नीट आहे त्यांच्या आयुष्यात, वेळ आहे. म्हणून भास मारत फिरतात. याच्या त्याच्या सोबत फोटो काढ. ते सोशल साइटवर टाक. कुठे फिरायला जा, चांगलंचुंगलं खा, महागड्या वस्तू विकत घ्या आणि त्याच्या जाहिराती करत फिरा. थोडं काही यश मिळालं तरी एकदम हरबºयाच्या झाडावर बसतात. सगळ्यांना तेच सांगत सुटतात जणू, दुसरे एकदम फालतू आणि हेच कोणी ग्रेट.हे असं येतं की नाही आपल्याही मनात. येतंच.बरेचदा ब-याच लोकांना हे अनेकांबद्दल सतत वाटत असतं. पण हे असं आपल्याला का वाटतं? म्हणजे समोरची व्यक्ती भास मारतेय, असंच सतत आपल्याला का वाटत असावं? आपण का ठरवतो की ते भास मारताहेत हेदेखील जरा तपासून पहायला हवं. कदाचित कोणी अगदी सरळ आणि फॅक्ट म्हणून एखादी गोष्ट सांगत असेल. पण आपण त्याला भास मारणं या एकाच शिक्क्यानं झोडपत बसतो. आपल्याला असं का करावंसं वाटतं तेही बघितलं पाहिजे.म्हणून या शो-आॅफ करण्याबद्दल काही जाणून, समजून घ्यायला हवं.समजा आपण नवीन वर्ष सुरू होताना जाहीर करतो की, ‘मी ना आजपासून व्यायाम करणार.’म्हणजे काहीतरी एक दिवस ठरवून आपण मनात पक्कं करतो, आजपासून हे करणार. आजपासून ते बदलणार. आता असं वागणं बंद. आता ते आपण मनाशीच ठेवलं तर काहीच प्रश्न नसतो. पण अगदी घरात जरी कुणाला सांगितलं तरी ते काय म्हणणार, ‘या, तुझ्याच्यानं काय होतेय?’, ‘नुसतीच बोलाचीच कढी’ , ‘आरंभशूर’, ‘बोलेल तो करेल काय?’, ‘फक्त बोलून भास मारणं. पाहिलेय आजवरचे सगळे प्लॅन्स’ असं बरंच काही बोलून आपलं पार खच्चीकरण होऊन जातं.मग लोक सांगतात, काय असेल ते सांगत जाऊ नका. आधी करा आणि मग बोला. मुद्दा म्हणून बरोबर असला तरी, काही करणं ही गोष्ट गुप्तपणे करायची गोष्ट आहे, अशी सवय लागते. तिच्याबद्दल मनमोकळे बोललं तर कुणाची नाट लागेल. कोणाची नजर लागेल, कामात अडथळे येतील असंच ते घेतलं जातं. आपण व्यक्त होणे मोजून-मापून-चोरून-लिमिटेड करून टाकतो मग. आपण काहीतरी धडपड करतोय आणि त्याला जशी नजर लागू शकते, हे आपल्या मनात येतं. पण तशीच कोणाची खरोखर चांगली मदत होईल, काही टिप्स मिळतील, हे मात्र आपण लक्षात घेत नाही. ‘फार कुठे बोलू नकोस’, अशीच आपली संवादाची स्टाइल होऊन जाते मग.‘फार कुठे बोलू नकोस स्वत:बद्दल, आपल्या चांगल्याबद्दल’ याच वातावरणात वाढलेल्या सर्वांना एखाद्यानं त्याच्या त्याच्या आयुष्यातलं काही बरं घडलेलं मांडलं तर आपण ‘भास मारणं’ या अर्थीच आधी घेतो.‘मी आज अमुक सिनेमा बघितला’, असंही कोणाचं एक्प्रेशन असेल तर काय भास मारतोय असं इतरांना वाटू शकतं. जणू काही यालाच मिळाला सिनेमा बघायला. वेळ दिसतोय भरपूर. आम्हीही बघतो सिनेमे; पण असं दाखवत नाही. याला कसा वेळ मिळाला आणि नेहमी असे महागडे सिनेमे कसे बघतो, शोधलं पाहिजे. सारखा भास मारायचा, हे केलं, ते केलं आणि जगावेगळं कोणी आहोत ते भासवायचं. असं सारं आपल्याच मनात सुरू होतं.खरं तर मुद्दा किती छोटासा असतो. कोणी सहजच सांगतं, मी अमुक सिनेमा बघितला. पण तो अनेक अर्थांनी घेतला जाऊ शकतो. कदाचित ती एक सहजच सांगितलेली प्लेन फॅक्ट असू शकते की! पण ती आपण भास मारणं या अर्थी घेतो. कधी कधी अजून वेगळंही होतं. सिनेमा बघायला जायचंय असं नुसतं म्हणूनदेखील भास मारतोय असा शिक्का बसू शकतो. म्हणजे समोरचा काहीतरी करतोय आणि त्याला आपण कसं बघतो, का बघतो, या अर्थी हे भास मारणं लक्षात घ्यावं लागतं.अर्थात हे भास मारणं, तसं इतरांना वाटणं आणि त्यामागची कारणं बरीच आहेत, त्याविषयी पुढच्या अंकात..शो-आॅफ कशासाठी?कधी कधी खरोखर काही गोष्टी ‘शो-आॅफ’ या सदरात टाकता येतात. आपल्याला, इतरांना असं का वागावंसं वाटतं त्याची कारणं शोधता येतात. समोरची गोष्ट शो-आॅफ आहे की कसं, आपणही कळत-नकळत तसं वागत आहोत का, हे समजून घेणं तसं महत्त्वाचंच. बरेचदा एखादी जराशी वेगळी गोष्ट आपल्याला करावीशी वाटते. आपल्याला/ इतरांना सुखाची, लै भारी, यशाची वाटेल अशी ती गोष्ट असते.कधी कधी त्याबद्दल नुसतंच लिहून, बोलून, व्यक्त होऊनदेखील कौतुकाचा भडीमार होऊ शकतो.म्हणजे, एखाद्याने सांगितले, ‘मी आता अमुक एक नावाजलेला डोंगर चढायला जाणार आहे.’ डोंगर चढणं अजून सुरूदेखील झालेलं नाही; पण केवळ ही घोषणा केल्यानंच इतकं कौतुक होतं की डोंगर चढल्यावर जे कौतुक होणार असतं त्याची बरीचशी झलक केवळ अशा घोषणेनेच मिळून जाते. मग प्रत्यक्ष डोंगर चढायची गरजच काय, करू, बघू-होईल अशी टोलवाटोलवी नंतर होऊ शकते.असे अनुभव वाढले, तर माणसं अमुक गोष्टीला केवळ आरंभशूर, फोल घोषणा, नुसतंच आश्वासन असं म्हणू, ठरवू लागतात.तिथूनच सुरू होतो, ‘आधी कर आणि मग बोलून दाखव’ सल्ल्यांचा भडीमार. जो त्या त्या संदर्भात कमी-जास्त प्रमाणात ठीकच असतो. पण एखादी अत्यंत वाईट गोष्ट ‘आधी कर आणि मग बोलून दाखव’, अशा आव्हानानं पुरेसा विचार न करताच घडून जाऊ शकते. म्हणूनच, हे सगळं त्या त्या परिस्थितीत आणि त्या त्या व्यक्तीनुसार बघावं लागतं. सगळे थोर सुविचार, कोट्स, सल्ले एकदम सर्वत्र सर्वांना लागू करता येत नाहीत.