शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

अकाउण्ट 'फेक' आहे हे आपण कसं ओळखायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 18:03 IST

फेक अकाउण्ट ओळखायचं कसं? अनोळखी व्यक्तीशी बोलताना काय सावधगिरी बाळगायची? आणि आपण उघडलंच फेक अकाउण्ट तर त्याचे परिणाम काय होतील?

ठळक मुद्देफसवणुकीचा आणि अप्रामाणिक हेतू ठेवून उघडलेले काल्पनिक नावाचे अकाउण्ट मात्र कायदेशीर गुन्हा मानले जाते.

- मुक्ता चैतन्य  

एक 19 वर्षाची मुलगी. हुशार. करिअर ओरिएंटेड. अचानक आजारपण येतं आणि घरात अडकते. दीड-दोन महिने घरात बसायचं असतं. अशावेळी वेळ जावा म्हणून अर्थातच ऑनलाइन जाण्याचं प्रमाण वाढतं. सोशल मीडियावर नेहमीपेक्षा वावर वाढतो. तिथेच एका मुलाशी ओळख होते. चॅटिंगमध्ये झालेल्या गप्पांमधून तो मुलगा तिला खूप डिसेंट वाटतो. चार्मिगही. तिच्याशी खूप छान गप्पा मारायचा. कधी फ्लर्टिग नाही की काही नाही. सहज सुंदर मैत्री झालीये आपली असं तिला वाटायला लागलं होतं. गप्पागप्पात एक दिवस त्याने तिचा फोटो मागितला. तिनेही सहजपणो तो दिला. मग नवीन काय बघतेस वगैरे गप्पांमध्ये सुरू झाल्या. त्याने काही सिरिअल्स मेन्शन केल्या. त्यातल्या काही न्यूड आणि सेक्स सिन्सबद्दल तो जनरल बोलायला लागला. तोवर तिच्या दृष्टीने त्याच्याशी गप्पा हा कम्फर्ट झोन होता त्यामुळे या सगळ्याबद्दल अचानक चर्चा का सुरू झाली वगैरे प्रश्न तिला पडले नाहीत. तीही तिची मतं शेअर करायला लागली. काही दिवसांनी तिच्या लक्षात आलं त्याला तिच्याविषयी आकर्षण आहे. जे त्याच्या चॅटिंगमध्ये अधून मधून डोकवायला सुरुवात झाली होती. तिलाही तो आवडत होता त्यामुळे त्यावरही तिने आक्षेप घेतला नाही. हळूहळू जनरल गप्पा रोमॅण्टिक गप्पांमध्ये बदलायला लागल्या.  रोमॅण्टिक गप्पा सेक्सटिंग हे सगळं इतकं सहजपणो होत होतं की, त्यात तिला काहीच चुकीचं घडतंय असं वाटलं नाही. मग व्हिडिओ कॉलिंग. एकमेकांशी जरा सेक्सी फोटो शेअर करणं हेही सुरू झालं, दोघं वेगळ्या शहरात असल्याने भेट शक्य नाही, विरह सहन होत नाही तर तुझा एखादा सेक्सी न्यूड पाठव म्हणून त्याने गळ घातली आणि ती गळाला लागली. पुढे पुढे काय झालं असेल हे वेगळं सांगायला नको. तिने एकच सेमी न्यूड फोटो पाठवला आणि काहीतरी गडबड आहे असं तिला वाटलं. पण त्या एका फोटोवरूनही त्याने तिला त्रस द्यायला सुरु वात केली. हे सगळं इतकं तपशिलाने सांगायचं कारण, अर्थातच ते प्रोफाइल खोटं होतं. मुलामुलींना फसवण्यासाठी, पैसे लुबाडण्यासाठी, एखाद्याला ट्रोल करून त्रस देण्यासाठी किंवा इतरही अनेक कारणांसाठी माणसं सोशल मीडियावर खोटी प्रोफाइल्स तयार करतात आणि अनेक लहान मुलं, तरु ण-तरु णी, मोठी माणसं त्यात अडकतात. फेक माहितीचा बाजार 78 बिलियन डॉलर्स इतका प्रचंड मोठा आहे. यात खोटय़ा, चुकीच्या बातम्यांचा, माहितीचा भरणा जसा असतो तसाच फेक प्रोफाइल्सचाही असतो हे आपण मागच्या आठवडय़ात बघितलं आहे. फेक प्रोफाइल्स ओळखायची कशी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सगळेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेक प्रोफाइल्स शोधत असतात. मोठय़ा संख्येने काढून टाकत असतात. पण आपण सर्वसामान्य यूजर्स फेक प्रोफाइल्स कशी ओळखायची हे महत्त्वाचं आहे. 

.तर फेक प्रोफाइल ओळखायची कशी?* फेक प्रोफाइल्सवर ब:याचदा फारच कमी फोटो असतात. किंवा फोटोच नसतात.  *अकाउण्ट उघडून किती वर्ष झाली आहेत हे बघितलं पाहिजे. खूप जुनं प्रोफाइल असेल आणि त्यावर काहीच पोस्ट्स नसतील तर शंकेला जागा आहे. अर्थात अनेक लोक नुसतं सोशल मीडिया अकाउण्ट्स उघडतात. तिथे काहीच पोस्ट करत नाहीत. पण तरीही अशा अनोळखी अकाउण्ट्सपासून दूर राहिलेलंच बरं. * कॉमन फ्रेण्ड्स नसतात किंवा खूप कमी असतात. * आकर्षक फोटो असेल तर तो त्या प्रोफाइलचाच असेल असं नाही. अनेकदा फेक प्रोफाइल्समध्ये दुस:याच कुणाचे तरी फोटो वापरले जातात. * कुणी अचानक चॅटिंग करायला लागलं आणि फारच गोडगोड गप्पा सुरू झाल्या की सावध व्हायला हरकत नाही. * मुळात अनोळखी माणसांशी ऑनलाइन लगेच गप्पा मारायला सुरु वात करू नये. त्या व्यक्तीची प्रोफाइल आणि वॉल चेक केल्याशिवाय संवादाला सुरु वात करताच कामा नये. * एखाद्या प्रोफाइलशी मैत्री करावीशी वाटली तरीही त्या प्रोफाइलला आधी फॉलो करा. काय आणि कशा प्रकारच्या पोस्ट्स पडतायेत ते बघून मगच बोलण्याचा विचार केला पाहिजे. म्हणजे प्रोफाइल खरं आहे की फेक हे समजू शकेल. * विचित्र स्क्रीन नाव असेल तरीही ते फेक प्रोफाइल असण्याची शक्यता असते. * इतरांच्या प्रोफाइल्सवर जाऊन ट्रोल करत असेल, वाईट साईट बोललं जात असेल तर त्या प्रोफाइलबाबत जागरूक राहिलेलं बरं कारण ते प्रोफाइल फेक असू शकतं. 

फोटोवरून फेक आहे की रियल ते शोधा. कसं?

* सोशल मीडिया साइट ओपन करा. * दुस:या विण्डोत गुगल इमेजेस ओपन करा. * आता सोशल मीडियावरचं जे प्रोफाइल तुम्हाला चेक करायचं आहे त्याच्या फोटोवर क्लिक करा. * फोटोचा यूआरएल कॉपी करा. * आता गुगल इमेजेसची विण्डो उघडा. * सर्चमध्ये कॅमे:याचं चिन्ह तुम्हाला दिसेल. त्या चिन्हावर क्लिक करा. * दोन पर्याय येतील. 1) पेस्ट इमेज यूआरएल (म्हणजे तुम्ही जो यूआरएल कॉपी केलाय तो पेस्ट करा.) 2) अपलोड अॅन इमेज (म्हणजे तुम्ही जर फोटो डाऊनलोड केला असेल तर तो फोटो तिथे अपलोड करायचा) आणि सर्च म्हणायचं. * त्या बरोबर तो फोटो खरा आहे का? तो फोटो कुणाचा आहे याचे तपशील गुगल तुम्हाला दाखवेल. त्यावरून तुम्ही सोशल मीडिया प्रोफाइल खरं आहे की खोटं हे ठरवू शकता. * याचा उपयोग एखाद्या माहितीबरोबर आलेला फोटो खरा आहे की खोटा आहे हे शोधायलाही तुम्ही वापरू शकता. * अगदी सोप्या पद्धतीने, फेक प्रोफाइल्सपासून लांब राहता येऊ शकतं. ऑनलाइन जगात प्रत्येक व्यक्ती चांगल्या उद्देशाने येत नाही हे लक्षात घेऊन सतर्क राहायला हवं. 

 फसवणूक हा हेतू असेल तर अटक आणि शिक्षा - अॅड वैशाली भागवत, प्रसिद्ध सायबर लॉ तज्ज्ञ

1. फेक अकाउण्ट काढल्याबद्दल अटक होऊ शकते का? शिक्षा होते का? 

हो, जर फसवणूक हा हेतू असेल तर अटक आणि शिक्षा होऊ शकते. अशा प्रकाराला आयडेंटिटी थेफ्ट म्हणतात. बतावणी किंवा तोतया बनून एखाद्याची फसवणूक केली असेल तर आयटी कायदा कलम 65 डीनुसार तीन वर्षार्पयतची शिक्षा होऊ शकते.फेक प्रोफाइल्स सर्वसाधारणपणो ट्रोलिंग, सायबर बुलिंग, द्वेष पसरवण्यासाठी, लैंगिक छळासाठी, स्टोकिंग आणि सेक्सटोर्शनसाठी वापरली जातात. फेक प्रोफाइल वापरून केलेल्या गुन्ह्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्याबरोबरच आयपीसी अंतर्गतही शिक्षा होऊ शकते.

2) जर काल्पनिक किंवा खोटय़ा अकाउण्टवरून कुणालाही त्रस देण्याचा प्रयत्न होत नसेल, नुसतंच मनोरंजनासाठी किंवा गुप्ततेसाठी अकाउण्ट काढलं असेल तरीही कायद्यात ते गुन्हा ठरतं का?काल्पनिक नावाने अकाउण्ट करण्यामागे कुठलाही फसवणुकीचा हेतू नसेल तर असे अकाउण्ट उघडणो कायद्यानं गुन्हा नाही. पण जाणीवपूर्वक दुस:या व्यक्तीच्या नावाने अकाउण्ट उघडणं, चालवणं मात्र आयडेंटिटी थेफ्ट म्हणजेच कायदेशीर गुन्हा आहे. फसवणुकीचा आणि अप्रामाणिक हेतू ठेवून उघडलेले काल्पनिक नावाचे अकाउण्ट मात्र कायदेशीर गुन्हा मानले जाते.

 

(लेखिका मुक्त पत्रकार/सोशल मीडिया अभ्यासक आहेत.)