शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

आपला हेल्थ कोशंट कसा मोजणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

आपण खातोपितो चंगळ करतो, पण आपली तब्येत सुदृढ आहे का? आपण खूश आहोत का?

-निकिता महाजन

आपण आताशा किती सहज लिहितो, टेक केअर. पण या शब्दाचा अर्थ कधी आपल्याला उमगत नाही. कारण असं टेक केअर आपण कधी स्वत:ला म्हणत नाही. गेल्या आठवड्यात जगभर लाइफ कोशंट याविषयावर चर्चा झाली. यूथ डे साजरा झाला तेव्हाही तरुणांचं आरोग्य, त्यांची झोप याविषयी भरपूर चर्चा झाली. आपण किती पोकळ खातो, त्यातून आपल्याला किती पोषक घटक मिळतात याचीही चर्चा झाली; मात्र त्याहून महत्त्वाची एक गोष्ट म्हणजे हेळसांड आणि दुर्लक्ष.

त्यामुळे आपल्याला एरव्ही किरकोळ वाटणार्‍या जर तब्येतीच्या तक्रारी असतील तर हे लक्षात घ्यायला हवं की, त्यामुळे आपला लाइफ आणि हेल्थ कोशंट घसरतो आहे. आणि पुढे जाऊन आपण लवकर म्हातारे होणार आहोत.

1. ओबेसिटी- वजनवाढ.

याविषयावर आपण बोलतो खूप. पण वजन का वेगानं वाढलंय, का वाढतंय याचं निदान होतंय का? ते कमी करण्यासाठी वैद्यकीय सल्ला घेतला जातोय का, हे तपासा.

2. वजन कमी होतंय.

आपलं वजन कमी आहे म्हणून खूश होऊ नका. कारण ते कमी का आहे आणि का कमी होतंय याची माहिती नसेल तर अशक्तपणानं आपण अगदीच ना-काम ठरू.

3. टाइप टू डिसिज

हा शब्द हल्ली सतत वापरला जातो. भारतात डायबेटिसच्या रुग्णांची वाढती संख्या. तरुण वयात होणारा डायबेटिस, वाढती शुगर यातून हा आजार होतोय. त्यामुळे जर शुगर वाढती असेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

4. स्विमर इअर

काही तरुणांचा हल्ली सतत कान दुखतो. सतत ठणकतो. त्याचं कारण कानाला सतत असलेले इअर फोन. त्यानं कानाला दडी बसतात. त्यामुळे आपल्या कानाकडेही पहा, इअर फोनकडेही.

5. ड्राय डोळे

सतत स्क्रीनसमोर असल्यानं बहुतांश तरुणांना डोळे लाल होण्याचा, चुरचुरण्याचा त्रास होतो. डोळ्यातून पाणी येतं. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या.

6. सतत अंगदुखी/डोकेदुखी

सतत अंगदुखी असते, डोकं दुखतं. हा त्रास होत असेल तर आपली लाइफस्टाइल तपासा. व्यायाम किती होतोय ते पहा. आणि त्वरित योग्य डॉक्टरचा सल्ला घ्या.

7. डिप्रेशन

हल्ली जरा उदास वाटलं, चिडचिड झाली की कुणीही म्हणतं मला डिप्रेशन आलंय. पण डिप्रेशनही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपली चिडचिड ही शारीरिक कारणानं होतेय की मानसिक याविषयी डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या.

8. अनियमित पाळी

यासंदर्भात मुली बोलतच नाही. पाळी आली नाही तर कुणाला सांगत नाही; मात्र अनियमित पाळी ही आरोग्यास धोकादायक आहे, त्यावर वेळीच औषधोपचार घ्या.

9. पाठदुखी

हादेखील एक लाइफस्टाइल आजार. सतत पाठ दुखत असेल तर बाम चोळून उपयोग नाही. त्या वेदनेचं कारण शोधा.

10. बी हॅपी

हा आजार नाही, पण सतत असमाधान, सतत चिडचिड, कशातंच आनंद, समाधान न वाटणं असं होत असेल तर मानसोपचार तज्ज्ञांना भेटाच.