शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
2
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
3
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
4
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
5
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
6
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
7
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
8
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
9
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
10
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
11
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
12
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
13
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
14
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
15
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
16
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
17
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
18
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
19
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
20
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास

पायात मणामणाच्या बेड्या

By admin | Updated: October 2, 2014 20:10 IST

जाऊ का पळून’? हे एका मैत्रिणीची खंत माडणारं पत्र १२ सप्टेंबर २0१४च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं.

ऑक्सिजन - 
‘जाऊ का पळून’? हे एका मैत्रिणीची खंत माडणारं पत्र १२ सप्टेंबर २0१४च्या अंकात प्रसिद्ध झालं होतं. त्या पत्राला प्रतिक्रिया देत अनेक मित्रमैत्रिणींनी फोन करुन, पत्र लिहून आणि फेसबूकवर मेसेज टाकून कळवलं की, आमचाही हा प्रश्न आहे. जातीपातींनी घेरलंय. घरचे इमोशनल ब्लॅकमेल करताहेत आणि पळायचं म्हटलं तरी पळता येत नाही. अनेकजणांनी आपला प्रश्न फोनवरही तपशिलात सांगितला. काय उत्तर देणार त्या प्रश्नांना? पळाच ! किंवा अजिबात पळू नका, घरचे म्हणतील तसंच करा, असं तरी कसं सांगणार? मात्र या चर्चेतून कळलं इतकंच की, प्रेमात पडलेल्या मुलांसाठी जातीपातीचे आणि घरच्यांच्या विरोधाचे प्रश्न हिमालयाएवढे मोठे आहेत.
जे सुटता सुटत नाहीत, काहीजण तर म्हणतात की, पळून जाऊन लग्न केलं तरी हे प्रश्न पिच्छा सोडत नाहीत. अस्वस्था व्हावं, प्रसंगी हताश वाटावं अशा या कहाण्या.
इतरांनी केलेल्या प्रेमभंगाच्या. त्यातल्याच या काही निवडक प्रतिक्रिया नक्की वाचा.
 
आहे उत्तर?
मी इंजिनिअर. ती ही. 
आम्ही दोघं एकाच कंपनीत नोकरी करतो.
त्यात आमची जातही एकच आहे. पण तरीही माझ्या आईला मुलगी पसंत नाही. खूप खोदून खोदून विचारल्यावर म्हणाली, ‘केस कापलेली, नोकरी करणारी मुलगी आपल्या घरात नको.ती डोक्यावर बसेल.!’
किती समजावलं पण तरीही ती ऐकतच नाही. आता तर ब्लॅकमेल करतेय की तू केलंच तिच्याशी लग्न तर मी जिवाचं बरंवाईट करेन.
काय करावं आणि कसा सोडवावा प्रश्न?
डोकं फुटून चाललंय, मी एकुलता एक. वडील नाहीत. आईनंच मला लहानचं मोठं केलं, आता तिच्या विरोधात कसं जायचं? आणि या मुलीवर जीवापाड प्रेम आहे, हिला तरी कसं सोडून द्यायचं?
आहे उत्तर?
- आदिनाथ, पुणे
 
पळून गेले पण.
‘जाऊ का पळून’?
असं विचारत न बसता मी पळून जाऊनच लग्न केलं. दोन वर्षे झाली लग्नाला. तू आम्हाला मेलीस म्हणून घरच्यांनी टाकलं मला. नुकतंच लहान बहिणीचं लग्न झालं. त्या लग्नालाही बोलावं नाही. 
आणि इकडे मी ज्याच्याशी लग्न केलं, त्याच्या घरचे मला छळतात. त्यांना माहितीये मला माहेरचा आधार नाही. नवरा म्हणतो, तू समजुतदार आहे, घे सांभाळून.
आता माझा हा प्रश्न मी कुणाला सांगायचा आणि आता कुठं पळून जायचं?
- प्रियांका,  नागपूर
 
ती पळाली,
मी अडकले !
माझी मोठी बहीण. तिनं पळून जाऊन लग्न केलं.
त्यावेळी घरात इतकी रडारड.  मुलीनं खालच्या जातीत लग्न केलं म्हणून, हा सारा आक्रोश. मला हे काही पटत नव्हतं. पण घरात माझं कुणी ऐकलंच नाही. त्यांचं एकच आम्हाला बाहेर तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. ‘त्यांची मुलगी पळून गेल्याची चर्चा’ तर होतीच. पण मी ही तशीच असेन असं लोक म्हणू लागले. टवाळ पोरं माझ्या मागे फिरू लागली.
तिकडे माझी बहीण सुखात आहे. माझे मेहुणेही चांगले आहेत. मात्र अजूनही माझं घर त्या धक्क्यातून सावरायला तयार नाहीत. नातेवाईक अजून आम्हाला त्यांच्याकडच्या लग्नाला बोलावत नाहीत. आईबाबा गेलेच क्वचित कुठं त्यांच्याकडे तरी लगेच टोमणे मारतात. धाकटीचं लग्न लावून टाका म्हणतात लवकर.
खरंतर माझं कुणावर प्रेम नाही, ना मी पळून जाईन.
पण तरी लोकांना काळजी.
आता घरचे माझ्यासाठी स्थळं पाहताहेत.
कुणाकुणाला काय काय समजावणार.?
पळून जाणं इतकं सोपं थोडंच असतं.
अनेक माणसांच्या जगण्याची फरफट होते त्या पळण्यात.
आणि मुख्य म्हणजे, चूक पळण्याची नसली तरीही.
- अपर्णा कुलकर्णी, 
हडपसर
 
TTMM म्हणजे काय?
TTMM म्हणजे  टेन्शन-टेंगळं-मस्ती- मॅजिक.
म्हणजे काय?
तर तेच जे जे तुमच्या मनात, जगण्यात, बोलण्यात, कट्टय़ावर धुमाकूळ घालतं, ते ते सारंच!
म्हणजे तेच सारं, जे तुमच्या डोक्यात वळवळलं, तुम्हाला छळायला लागलं की वाटतं, लिहावं, आणि पाठवून द्यावं ‘ऑक्सिजन’कडे!
मग वाट कसली पाहता.?
लिहा बिंधास्त.
आणि पाठवून द्या ‘ऑक्सिजन’कडे.
आम्ही वाट पाहू.
आणि तुम्ही लिहिलेलं एकदम ‘कडक’ असेल तर ते तुम्हाला या पानावर नक्की वाचायला मिळेल.
पत्ता?
ऑक्सिजन, लोकमत भवन, बी-३, एमआयडीसी अंबड, नाशिक, ४२२0१0