शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

अरे, काही कॉमनसेन्स आहे की नाही?

By admin | Updated: August 22, 2014 11:46 IST

तुम्ही मुलाखतीला गेला आहात? मुलाखत घेणार्‍यानं तुम्हाला विचारलं,कॉफी घेणार? काय उत्तर द्याल?

कॉमनसेन्स हा शब्द आपण रोजच्या जीवनात नेहमीच वापरतो. हा शब्द आपल्या एवढय़ा जवळचा आहे की एखादी घटना घडल्यावर चटकन आपल्या जिभेवर हा शब्द येतो. 
‘हा कॉमनसेन्सचा भाग आहे. एवढाही कॉमनसेन्स नाही?’ ‘अरे कुठे गेला तुझा कॉमनसेन्स?’ अशासारखी वाक्यं अगदी क्षणाक्षणाला वापरली जातात. दुसर्‍यांच्या कॉमनसेन्सबद्दल असे सर्रास प्रश्न निर्माण करताना, आपला कॉमनसेन्स मात्र आपण खूपदा वापरत नाही.
जे वैयक्तिक संदर्भात होतं तेच कामाच्या, नोकरीच्या जागी हमखास होतं.
कामाच्या जागी बर्‍याच गोष्टी कॉमनसेन्सवर साध्य होऊ शकतात. करता येऊ शकतात. बर्‍याच किचकट प्रश्नांची उत्तरं अगदी साधी असू शकतात. 
पण असतो काय हा कॉमनसेन्स?
एखाद्या गोष्टीचं, घटनेचं सारासार विवेकदृष्टीनं किमान (कमीत कमी) समज वापरून केलेलं विश्लेषण म्हणजे कॉमनसेन्स. 
अवघड प्रश्न हा आहे की, हा कॉमनसेन्स येतो कसा? 
तो येत नाही चटकन, कमवावा लागतो. रोजच्या अनुभवातून, निरीक्षण शक्तीतून आपण हा कॉमनसेन्स कमवत असतो. 
उदाहरणार्थ, आपण पेपरमध्ये फसवणुकीच्या, दुप्पट तिप्पट व्याज देण्याच्या लॉटरी लागण्याच्या, काहीही न करता अमुक लॉटरी लागल्याचे ईमेल्स येण्याच्या प्रकरणात फसलेल्यांच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. आणि अनेकदा शिकलीसवरलेली मंडळीही या सगळ्यात अडकल्याचं वाचतो. 
का होतं असं? असे फसवणुकीचे गुन्हे नेहमी घडत असताना, आपण वाचत असतानाही लोक का अडकतात या ट्रॅपमध्ये?  आपल्याला नेहमी वाटतं की, जातो कुठं यांचा कॉमनसेन्स? 
म्हणजेच काय कॉमनसेन्स कमवायला नेहमी स्वत:लाच आलेल्या अनुभवाची गरज असते, असं नाही. 
अनेकांचं ऐकून, वाचून, मिळालेली माहिती योग्यवेळी पूर्ण विचारांती वापरू शकतो. तोच हा कॉमनसेन्स.
काही घटना वारंवार घडत असल्या तर मागे आपण अशा परिस्थितीत कसे वागलो होतो हे आठवता येतं. त्यातून आपण स्वत:त सुधारणा करतो. करू शकतो. म्हणजे अर्थात सुधारणा करण्याची तयारी हवी.
रोजच्या आयुष्यात घडणार्‍या खूप घटना असतात. अगदी छोट्या छोट्या. ते छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला असा समजेवर आधारित कॉमनसेन्सच वापरावा लागतो.
‘एमबीए’च्या कोर्समध्ये हा कॉमनसेन्स मात्र शिकवला जात नाही.
तो आपल्यालाच कमवावा लागतो. पण अनेकांना वाटतं की, आपण एमबीए आहोत, आपल्याला काय असले प्रश्न विचारतात?
आता हेच पहा, तुम्ही मुलाखतीला गेलात, मुलाखत सुरू आहे, तुमचा मोबाइल बंद करायचा तुम्ही विसरलात आणि अचानक तुमच्या मोबाइलची रिंग वाजली तुम्ही काय कराल? 
- कधी कधी मुलाखतकर्ता तुमचा कॉमनसेन्स बघण्यासाठी एखादी अशीच परिस्थिती निर्माण करतो. आजकाल अनेक ऑफिसमध्ये ऑफिसबॉय वगैरे नसतात. त्यामुळे चहा, कॉफी स्वत:च घ्यावी लागते. अशा वेळेस एखादा मुलाखतकर्ता तुम्हाला कॉफी ऑफर करत असेल तर काय कराल?
जर तुम्ही खरंच मुलाखतीची नीट तयारी केलेली असेल, तर हे प्रकरण हॅन्डल करणं फारसं कठीण नाही. 
त्यासाठी काही गोष्टी तरी नक्की करता येतील.
तुम्ही मुलाखतीच्या अर्धा तास आधी तरी त्या ऑफिसमध्ये हजर रहायला हवं. तुमच्या निरीक्षणातून ऑफिसचं कल्चर, कामाची पद्धत, लोकांच्या वागण्यातून तुम्ही काही अंदाज लावू शकता.
जर ऑफिसमध्ये इनफॉर्मल कल्चर असेल, ऑफिसबॉईज नाहीत इथं कामाला असं लक्षात आलं तर तुम्ही कॉफी अगदी नम्रपणे नाकारू शकता. 
बर्‍याचदा कॉफी ऑफर करणं हा निव्वळ एक फॉरमॅलिटीचा भाग असू शकतो.
अशा वेळेस आपण कसं वागायचं हे आपला कॉमनसेन्सच आपल्याला सांगतो. तो सदासर्वकाळ एकसारखा नसतो आपण तो डेव्हलप करू शकतो. तो कसा करायचा?
तर त्यासाठी रोजच्या रोज अगदी झोपेतून उठल्यापासूनच्या घटनांचा अभ्यास करायला हवा, आपण कसे वागतो, कसे वागू शकलो असतो हे जरा नीट बारकाईनं पाहिलं तर जमू शकेल.
- विनोद बिडवाईक