शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

हिल युवर लाइफ- हे पुस्तक वाचलंय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 17:35 IST

मनाची सकारात्मक ताकद शोधायला मदत करणारं एक पुस्तक.

 - प्रज्ञा शिदोरे 

‘अगर तूम किसी चीज को दिल से चाहो, तो पुरी कायनात तुम्हे उस चीज से मिलाने मे जूट जाती हैं.’हे वाक्य म्हणजे काय भारी डायलॉग आहे असं वाटेलही.  पण हा फक्त बॉलिवूडमधला रोमॅण्टिकपणा नाहीये बरका! म्हणजे वाटत असलं फिल्मी तरी ते फिल्मी नाहीये.पण लुईस हे यांचं यू कॅन हिल युवर लाइफ हे पुस्तक मात्र तसं म्हणत नाही. आपलं मन ही खरंच खूप कमाल गोष्ट आहे. शास्त्नज्ञही मेंदूचा काही टक्केच भाग समजू शकले आहेत. पण, आपल्या मनाची खोली त्याची शक्ती, क्षमता नक्की किती आहे, हे आपल्याला माहितीच नाहीये अजून. आपलं कॉन्शस आणि सबकॉन्शस मन मिळून आपल्याकडून काहीही गोष्टी करवून घेऊन शकतं!  हेच लुईस हे यांच्या पुस्तकांचं सार आहे. खरं तर या विषयावर अनेक पुस्तके लिहिली गेली; पण लुईस हे जगभर लोकप्रिय आहे. ‘यू कॅन हिल युवर लाइफ’ या पुस्तकानंतर ती जगातल्या बेस्टसेलर ऑथर्सच्या यादीत अग्रेसर ठरली.आपलं मन आणि शरीर हे एकमेकांशी जोडलेले असतात. त्यामुळे आपले शारीरिक आजार बरेचदा आपल्या मनाशी निगडित असतात. आपण जर आपल्या मनावर काम केलं तर आपण आपल्या शारीरिक व्याधींवर विजय मिळवू शकतो. हे या पुस्तकाचं साधारण मर्म आहे. अर्थात हे कसं करायचं, आपल्या या अथांग मनावर ताबा कसा मिळवायचा? त्याला वळण कसं लावायचं? या सार्‍या गोष्टी लुईस या पुस्तकात सांगते. यात मनाचे काही व्यायामही तिनं सांगितले आहेत. अर्थात अनेक मानसशास्त्नज्ञांनी आणि वैद्यकीय शास्त्नज्ञांनी तिच्या या प्रयोगाला ‘सुडो सायन्स’ म्हटले आहे. म्हणजे जे शंभर वेळेला बरोबर येऊ शकेल अशी खात्नी कुणी देऊ शकत नाही. पण. आपल्या मनाची सकारात्मक विचार करण्याची ताकद समजून घ्यायची तर हे पुस्तक पहायला हरकत नाही. हे पुस्तक ऑडिओ बुक स्वरूपात यू टय़ूबवर ऐकताही येतं. त्याचबरोबर याच विषयावर डाना पेचर हिचा टेड एक्स टॉकही ऐकण्यासारखा आहे.