शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

काली-पिलीच्या छतावरची चित्रं पाहिलीत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 16:44 IST

रेचल लोपेज. या तरुणीला वाटलं. काळी-पिवळी टॅक्सी मुंबईची शान आहे. त्या टॅक्सीच्या टपावरच्या कलेचं जतन केलं तर?

ठळक मुद्दे‘काली-पिली’मध्ये बसा आणि सीलिंगच्या सौंदर्याचा फोटो नक्की काढा!

- रंजन पांढरे

सिटी ऑफ ड्रीम्स, लोकल, गर्दी, पाऊस, खाद्यसंस्कृती, गेट-वे ऑफ इंडिया, समुद्रकिनारा आणि बॉलिवूड असे काही शब्द उच्चारले की पहिलं नाव आपल्या डोक्यात येत ते म्हणजे अर्थात मुंबई. एक भन्नाट शहर, भारताच्या अर्थव्यवस्थेचे केंद्रबिंदू, महाराष्ट्राची राजधानी, वैविध्य आणि वेग यावर स्वार असलेलं हे महानगर. तशीच मुंबईची एक मुख्य ओळख आहे ती म्हणजे इथल्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी. 1911 मध्ये मुंबई शहरात पहिल्यांदा टॅक्सी संस्कृतीचा उदय झाला. व्हिक्टोरिया म्हणजेच बग्गीची जागा टॅक्सीनं घेतली. तेव्हाच्या मोठय़ा टॅक्सीची जागा 1960 च्या दशकात फियाट कंपनीच्या ‘प्रीमियर पद्मिनी’ने घेतली. या टॅक्सींना काळा-पिवळा रंग  देण्यात आला. 1970 नंतर ‘प्रीमियर पद्मिनी’ मुंबईचा अविभाज्य घटक बनली. प्रवासासाठी आरामदायी, वेगवान, मजबूत पद्मिनी शहराच्या वेगाच्या आणि विकासाच्या साक्षीदार आहेत. सध्याच्या घडीला मुंबईमध्ये फार कमी पद्मिनी आहेत, त्यांची जागा इतर विकसित वाहनांनी घेतली आहे.बदलत्या मुंबईचा हा सारा प्रवास काळ्या-पिवळ्या टॅक्सीत बसून समोर आला तो ‘द ग्रेटर बॉम्बे’ या इन्स्टाग्राम पेजमुळे. मुंबईत एक ‘काली-पिली’ची दिवानी सध्या चर्चेत आहे. तिचं नाव आहे रेचल लोपेज. व्यवसायाने लेखक असलेली रेचल सोशल मीडियाचा वापर मुंबईतील टॅक्सीच्या टपावर असलेल्या विविध आकार, रंग, चित्न, यांचं वैविध्य दाखविण्यासाठी करते. मुंबईत साधारण 55000 टॅक्सी आहेत आणि त्यातील जवळपास 400 टॅक्सींचे  चित्न आपण तिच्या इन्स्टाग्राम पेजवर बघू शकतो. फेब्रुवारी 2017 पासून तिनं या चित्नाचं संकलन सुरू केलं. मूळची मुंबईकर असल्यामुळे अगदी लहानपणापासून तिनं टॅक्सीमध्ये प्रवास केला; पण या कलेकडे फार कधी लक्ष दिल नाही, अचानक एक दिवस तिला एक कल्पना सुचली. आपला अर्धा झाकलेला चेहरा आणि वरती टॅक्सीचं सीलिंग ज्यामध्ये फुलं, प्राणी, फळ, अगदी गब्बर अशी चित्नं तिनं संग्रह करायला सुरुवात केली. सर्फेस डिजाइन, क्र श पॅटर्न, इटालीयन आणि अरेबिक डिजाइन, भाज्या, लहान मुलांची चित्न, भडक आणि अतिशय विद्रूप चित्नदेखील इथे बघायला मिळतात.रेचलच मुंबई शहरावर प्रचंड प्रेम आहे आणि  म्हणून तिने या पेजचं नाव ‘द ग्रेटर बॉम्बे’ ठेवलं, हळूहळू हे पेज लोकप्रिय होत गेलं. आपल्या शहराची कला जतन झाली पाहिजे, त्याचं योग्य पद्धतीने दस्तावेजीकरण झालं पाहिजे, ज्यामुळे भविष्यातील पिढीसाठी ते उपयोगी आणि माहितीपूर्ण ठरेल. या सीलिंगचा उपयोग चालकांना वाहन स्वच्छ ठेवण्यासाठीदेखील होतो, प्लॅस्टिक कवर असल्यामुळे धूळ सहज साफ होते, आणि टॅक्सी आकर्षकसुद्धा दिसते. मुंबईतील चालकांच्या पिढय़ा या व्यवसायात रुजल्या आहेत, कदाचित त्या कारणामुळे काळ्या-पिवळ्या टॅक्सीमध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते. जेव्हा रेचलकडे पाहुणे किंवा मित्न येतात, ती आवर्जून त्यांना तिच्या लाडक्या काली-पिलीमध्येच घेऊन जाते. ‘वर्ल्ड हिस्ट्री’ हा रेचलच्या वाचनाचा आवडीचा भाग राहिला आहे, इतिहासाबद्दलच्या आवडीमुळेदेखील तिच्या संकलनाला विशेष महत्त्व आहे.रेचलच्या संग्रहाची नोंद अमेरिकेतील एनपीआर या जगप्रसिद्ध रेडिओ चॅनलने घेतली. या मुलाखतीमध्ये मुंबईच्या अणि टॅक्सीच्या कलेविषयी विशेष चर्चा झाली आणि तिचं कौतुकदेखील झालं. अमेरिकेतील एका प्रतिष्ठित प्रकाशनातर्फे लवकरच रेचलच्या कामाचं ‘फोटोबुक’ प्रकाशित करण्यात येत आहे, या पुस्तकात प्रत्येक सीलिंगच्या कलेविषयी विस्तृत माहिती मांडण्यात येणार आहे. अशी माहिती तिच्या इन्स्टाग्राम पेजवरसुद्धा दिलेली असते, पुस्तक येईर्पयत तरी ‘द ग्रेटर बॉम्बे’ हे पेज आपल्याला नवनवीन टॅक्सीचं सीलिंग दाखवत राहिलंच. मुंबईतील किमान 25000 टॅक्सीची कला दस्तावेज करण्याचा रेचलचा मानस आहे. या पेजवर इतर कोणीही टॅक्सीत प्रवास करतानाचा फोटो पाठवला तर रेचल त्याचं आवर्जून स्वागत करते. मुंबईतील एका प्रसिद्ध संग्रहालयाने तिच्या कामाची दाखल घेत तिला प्रदर्शन आयोजित करण्याची जागा देऊ केली आहे.

रेचल म्हणते ‘हे शहर खूप सुंदर आहे, टॅक्सी इथली शान आहेत, यातील कला जतन करण्याचा मी छोटासा प्रयत्न करतेय’.  सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे जे रेचलने निवडलं, ते ती अत्यंत कल्पकतेनं आणि विधायक दृष्टीनं वापरतेय. फॉरवर्ड मारणार्‍या गर्दीत तिचं हे काम म्हणूनच उठून दिसतं. पुढच्या वेळेस मुंबईला आलात की ‘काली-पिली’मध्ये बसा आणि सीलिंगच्या सौंदर्याचा फोटो नक्की काढा!