शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

डिग्री  आहे , भरेल  पोट  हे  विसरा , लाईफ  स्किल्स  आहेत  का  तुमच्याकडे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 18:30 IST

एक पदवी आहे, तिच्या जोरावर पोट भरता येईल असं वाटण्याचे दिवस सरले. आता जगायचं तर आपल्याकडे लाइफ स्किल्स हवीत. ती कशी शिकणार?

ठळक मुद्दे सृजनशीलता वाढीस लागेल. सृजनशील असणं, विविध बाजूंनी बॅलन्स साधता येणं, हेही एक स्किलच असतं! 

- प्राची पाठक

‘नोकऱ्या  मिळत नाहीत’ - हा एक सर्वकाळ चर्चेत असणारा विषय आहे. अमुक कोणी कसा/कशी इतकं शिकून बेरोजगार बसलेला आहे, याच्या अनेक कहाण्या लोक सांगत असतात. किंवा खूप शिकूनसुद्धा काहीच काम न मिळाल्याने त्यांना कधी मोलमजुरी करावी लागते.हे सुरू असताना दुसरीकडे हीदेखील चर्चा असते की, कामाला चांगली माणसंच मिळत नाहीत. ‘लायक’ उमेदवार नोकरीसाठी नाहीत.कितीतरी लोकांना चांगले मेकॅनिक्स हवे असतात. चांगले गवंडी, सुतार, माळी, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, वेल्डर, फिटर इत्यादी हवे असतात. अगदी कार्यालयीन कर्मचा:यांपासून ते मोलमजुरीर्पयत काम करणारे स्री-पुरु ष हवे असतात. पण सचोटीने काम करणारे, रास्त दरात वेळेत काम सफाईदारपणो पूर्ण करणारे प्रोफेशनल्स मिळत नाहीत. एकदा काम सुरू केलं की दिलेल्या वेळेत सुतारकाम, रंगकाम पूर्ण होईल याची काही शाश्वती नाही.एकीकडे चांगल्या कारागिरांची, चांगल्या कर्मचा:यांची कमतरता भासते. तर, दुसरीकडे शिक्षण असूनही बेरोजगार असलेले खूपच तरुण जगभर असतात. त्यात, भारतात शिक्षण पद्धती अधिकाधिक व्यवसायाभिमुख होण्याची गरज आहेच. आपण जे मरत - मरत, रट्टा मारत शिकलो, त्यातलं काहीही विशेष आपण नोकरीच्या ठिकाणी वापरत नाही, असं मजेत सांगणारे खूपच लोक असतात. शिकवण्याची पद्धत कधी सदोष असते. तोच विषय अधिक रंजक करून शिकवता येतो, जेणोकरून विद्याथ्र्याचा त्यातील इंटरेस्ट वाढेल. अशा अनेक टेक्निक्स, स्किल्स आत्मसात करणं गरजेचं असतं.  - अर्थात हे सारं काही नवीन नाही. सततच बोललं जातं.पण मग यातून मार्ग काढायचा कसा? आणि आता कोरोनाकाळात आपल्या हातांना काम मिळवायचं कसं?पहिला मुद्दा आपण जे शिकलो, ज्या विषयातली पदवी घेतली त्या विषयात पदवीसह त्यातलं ज्ञान तर हवंच.सोबत अनेक विषयांत थोडं थोडं ज्ञान, कामचलाऊ का होईना असायला हवं.त्यापुढे जाऊन काही छोटी छोटी स्किल्स शिकून घ्यावी लागतात. त्या कौशल्यांना लाइफ स्किल्स म्हणता येईल. त्यातून आपण जास्त चांगल्या पद्धतीने जगायला शिकतो. विविध परिस्थितीत तगायला शिकतो. सध्याच्या कोविड-19 साथीच्या रोगाच्या काळात तर असेल त्या परिस्थितीत चांगले मार्ग शोधणं, खंबीर राहणं, आपली लाइफ स्किल्स वाढवणं अत्यंत आवश्यक झालेलं आहे. जे येईल, ते आव्हान पेलू, हा धीर ही जीवनावश्यक कौशल्यच आपल्याला देतात.भरवसा देतात की, परिस्थिती कशीही आली तरी आपण तगून जाऊ. आपण जगू, झगडू!पण मग त्यासाठी कोणती कौशल्य सोबत हवीत? ढोबळमानाने लाइफ स्किल्सचे काही भाग करता येतील. हे स्किल्स नेमके असे कुठे शिकवले जातीलच असं नाही. ते लहान-मोठे कोर्सेस करून संपूर्ण शिकताही येतीलच, असंही नाही. परंतु, आपण आपल्या जगण्याला समृद्ध करायच्या प्रोसेसमध्ये त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊ शकतो. स्व-मदत करू शकतो. आजकाल तर आपल्या हाताशीच जगातील सर्व माहिती गुगल केली की उपलब्ध असते. तिचाही आपण चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी वापर करू शकतो.तर, आपल्याकडे कोणती स्किल्स आहेत, ते एकदा तपासा. शैक्षणिक प्रमाणपत्रं जसे आपण चकाचक ठेवत असतो, नवनवीन कोर्सेस करून त्या त्या विषयांत अपडेट होत असतो, तसेच आपल्यातले जीवनावश्यक स्किल्सदेखील तपासत राहिलं पाहिजे. ते आपलं आपल्यालाच ठरवून शिकून घ्यावं लागेल.

कोणती लाइफ स्किल्स आपल्याकडे असणं आता ‘मस्ट’ आहे?

1. स्वत:बद्दल स्पष्टता असणंआपल्याला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, याबद्दल नीट दिशा सापडणं महत्त्वाचं असतं. त्यातूनच आपण आपलं व्यक्तिमत्त्व नीट घडवू शकतो. त्यासाठी अगदीच कोणत्या व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेत जायची गरज नसते. व्यवस्थित राहणीमान, मूलभूत वैयक्तिक स्वच्छता-टापटीप, चांगलं संवाद कौशल्य, एटीकेट्स आपण शिकू शकतो. ते शिकवणारे शेकडो सेल्फ हेल्प प्लॅटफॉर्म्स सध्या उपलब्ध आहेत. 

2. सारासार विचार आणि सृजनशीलता आपल्याकडे असलेलं शिक्षण, आपल्याला मिळू शकणारी माहिती यातून परिस्थितीचं नीट आकलन करून योग्य निर्णय घेण्याची क्षमता हेदेखील एक स्किलच आहे. त्यातून आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत प्रगल्भता येते. एकाच परिस्थितीचे विविध पैलू आणि अगदी विरोधी मतंही आपण समजून घेऊ शकतो. त्यातून आपल्याला जगण्याचं चांगलं भान येऊ शकतं. हे स्किल कसं शिकणार? केवळ समविचारी मैत्रीच्या गुंत्यातून बाहेर पडलं पाहिजे. विविध सामाजिक, आर्थिक स्तरातले मित्रमैत्रिणी केले पाहिजेत. त्यांचं विश्व समजून घेता आलं पाहिजे. आपल्याहून वेगळं म्हणजे सगळंच वाईट असं नसतं, ही समज आपल्या विचारांना त्यातूनच येईल. खरं तर, त्यातून आपणही नवनवीन विचार आत्मसात करू शकू. आपल्या विचारांना एकाच साच्यात कोंबून सगळं जग त्याच भिंगातून बघायची गरज नाही, हे आपल्याला कळेल. सृजनशीलता वाढीस लागेल. सृजनशील असणं, विविध बाजूंनी बॅलन्स साधता येणं, हेही एक स्किलच असतं! 

3. सामाजिक विषयांबद्दलची जाण आणि सहानुभूतीजगात काय सुरू आहे, कोणते कळीचे मुद्दे आहेत, आपल्या आसपास काय सामाजिक, आर्थिक स्तर आहेत, याची जाणीव असणं गरजेचं आहे. समाजातील दुर्बल घटकांबद्दल आपण जागरूक असणं आवश्यक आहे. नाहीतर, एरवी अन्यायग्रस्तांबद्दल सहानुभूती बाळगून आपल्याच घरातल्या स्रियांच्या समस्यांबद्दल, आपणच करत असलेल्या अन्यायाबद्दल मात्र तितकीशी जाणीव नसणं, हे सर्वत्र दिसतं. आपली समजशक्ती वाढवली, तर आपल्या नात्यांच्या कुरबुरींमध्येही फरक पडेल. एका सकस मनोसामाजिक वातावरणात आपण राहू शकू. 

4. नात्यांमधील परस्परसंबंध आणि संवाद कौशल्य जसजशी आपली आपल्या समाजाविषयीची एकूणच जाणीव वाढेल, तसतसं आपल्याला हेही कळत जाईल की बाहेरच्या कितीतरी लोकांशी आपण पटत नसूनही पटवून घेतो. तेच थोडय़ाफार फरकाने आपल्याला आपल्याच घरात जुळवून घेता येईल का? आपला सामाजिक आधार आपल्याच घरात असेल, तर त्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही. एकमेकांशी चांगला, मनमोकळा संवाद साधायची सवय लावून घेतली, तर आपण हे साधू शकतो. त्यासाठी मनातलं खरंखुरं बोलायला शिकलं पाहिजे. आपले मुद्दे नीट मांडता आले पाहिजेत. 

5. भावनांचं आणि ताणतणावाचं व्यवस्थापनवरील सर्व स्किल्स एकेक करून ठरवून अवगत करत गेलं की आपल्या भावना आपल्या आटोक्यात राहतील. आपल्यासाठी संवाद माध्यमं मनातलं बोलायला उपलब्ध असतील. घरातच आपल्याला चांगले मित्र मिळालेले असतील. आजकाल सतत आणि सहजच लोक जे सांगत असतात की स्ट्रेस वाढलाय, अमुक कोणी डिप्रेस आहे, कोणी आत्महत्येचं पाऊल उचललं, या सर्व मानसिक समस्यांना आपण आपल्या परीने दूर ठेवू शकू किंवा नीट सामोरं जायला शिकू.

(प्राची मानसशास्नसह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्नची अभ्यासक आहे.)