शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

गुंता! खेड्यापाड्यातला मुलींची कॉम्प्लिकेटेड लव्हस्टोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2018 4:28 PM

आणि मग तिचं प्रेम ‘प्रेम’ राहत नाही..

खेड्यापाड्यातल्या मुली उच्चशिक्षणासाठी शहरात येतात. एक लढाई तिथंच जिंकलेली असते. इथं ‘लूक’ बदलून शहरी होतात. कुणीतरी आवडायला लागतं. ‘नातं’ निर्माण होतं. पण तरी काहीजणींच्या डोक्यात हे पक्कं असतं की प्रेम ही एक भावना आहे. लग्न हा व्यवहार. प्रेमात पैसा, नोकरी, जातधर्म, लाइफस्टाइल, सुरक्षितता येत नाही. लग्नात समाज आणि घरच्यांसह हे सारे येतात.. आणि मग तिचं प्रेम ‘प्रेम’ राहत नाही..

प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी ‘सेम’ असतं !या मंगेश पाडगावकर यांच्या कवितेच्या ओळी कितीही खºया असल्या तरी ते ‘सेम’ असतं का? मुलींसाठी तरी?मी शिक्षणानिमित्त पुण्यात आले. इथं हॉस्टेलमध्ये राहते. माझ्या हॉस्टेलमध्ये ग्रामीण भागातूनच आलेल्या मुली बहुसंख्य. उच्चशिक्षण घेण्यासाठी त्यांनी घराचा, गावाचा उंबरठा ओलांडला. पुण्यात शिकायला येणं म्हणजे काय असतं खेड्यापाड्यातल्या मुलींसाठी याची गोष्ट तर मोठी संघर्षाची, अप्रूपाचीही. किती लढाया लढून अनेकजणी इथवर पोहचतात.शिक्षणासाठी गावाबाहेर पडल्या म्हणजे त्यांना लगेच स्वत:च्या आयुष्याचे निर्णय घ्यायची मुभा मिळते का? उच्चशिक्षण घेतात म्हणजे आपल्या शिक्षणाचा उपयोग करून स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगतात का? हे प्रश्न विचारणंसुद्धा अवघड आहे. ‘मुलींच्या जातीला’ असे प्रश्नच खरं तर पडू नयेत असं आजचंही वास्तव आहेच. त्या विचित्र वास्तवात काहीजणींना तरी एखादी फट सापडते आणि त्या पुण्यासारख्या शहरात शिकायला येतात. त्यांचे पालक त्यांना येऊ देतात.इथं हॉस्टेलमध्ये ग्रामीण, निमशहरी भागातून आलेल्या अनेक मुली. शिकायला येतात. पुण्यात वातावरण मोकळं, घरच्या पेक्षा तुलनेनं स्वातंत्र्य जास्त. ओळखीच्या नजरा पाठलाग करत नाहीत. मग कुणीतरी आवडतंही. प्रेमातही पडणं होतं. पण मग हळूच लक्षात येतं की प्रेमात पडलेल्या प्रत्येकीसाठीही लिंग, जात, धर्म, वर्ग, ठिकाण या सर्व गोष्टीनुसार प्रेमाची व्याख्या बदलत जाते. आपल्या समाजाने प्रेमाला कधी डोळसपणे पाहिलंच नाही उलट प्रेमालाच आंधळं ठरवून मोकळा झाला. त्या पट्ट्या डोळ्यावर बांधलेल्या मुली प्रेमात पडतात तेव्हाही काही ठोकताळे असतात, काही मोडतात.हॉस्टेलमध्ये राहताना कळतं की मुली घरी जशा राहतात त्याहून हॉस्टेलमध्ये किती वेगळ्या असतात. शहरात आल्यावर आपला पेहराव बदलणं, भाषा बदलणं हे तर होतंच. ‘लूक’ बदलून शहरी होतात. मग कुणीतरी आवडायला लागतं. प्रेमाची कबुली दिली जाते. ‘नातं’ निर्माण होतं. पण तरी काहीजणींच्या डोक्यात हे पक्कं असतं की प्रेम ही एक भावना आहे. ती आपण जगतोय. प्रेम आणि लग्न यादेखील दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम ही भावना आहे तर लग्न हा व्यवहार. सांस्कृतिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती, त्यातली विषमता यांचा प्रेमावर परिणाम होत नाही. काही गोष्टी खटकतात; पण डाचत नाहीत. किंवा लक्षातही येत नाही. प्रेमाचे विषय असतात. त्यातून फोनवर सतत बोलणं सुरू होतं. फिरायला जाणं, आउटिंग, मोकळेपणा हे सारं येतं. प्रेम त्यातच गुरफटून जातं.एकीकडे आपण ज्या मुलीवर प्रेम करतो ती आपल्या मालकीची झाली असा समज मुलांचा होतो. अनेकदा मुलींनाही वाटतं आता हाच आपलं सर्वस्व. त्याची मालकी त्याकाही अंशी मान्यही करतात. मुलं सांगतील तसे कपडे घालायचे, प्रत्येक गोष्ट त्याला सांगून किंवा विचारून करायची. फोन उचलला नाही किंवा मेसेजला रिप्लाय केला नाही तर चिडायचं. तोही चिडतो अनेकदा तर या फोनवरून तिच्यावर संशय घेतला जातो. सतत भांडणं होतात. अनेकदा गोष्टी ब्रेकअपही होतात. काही मुली त्यातून सावरतात. काही जीव देण्यापर्यंत जातात. काही नुसत्याच कासावीस होत राहतात.या साºयात एक बदल महत्त्वाचा असतो. शहरातलं खुलेपण. ते ग्रामीण भागात मुलींनी अनुभवलेलंच नसतं. प्रेम तर लांबची गोष्ट. मुलांशी बोललं तरी गावभर चर्चा होत असते. अशा वातावरणातून आलेल्या मुली शहरात आल्यावर मुलांशी बोलू लागतात. मैत्री होते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. पुण्यासारख्या शहरात खूप मोकळं वातावरण असतं. झेड ब्रिज किंवा इम्प्रेस गार्डनसारखी ठिकाण असतात. जिथं प्रेमीयुगुल निवांतपणे बसू शकतात. छोट्या शहरात कुठं भेटणं, बोलणं ही खूप अवघड असतं. काही संस्कृती रक्षकांनी ठेका घेतलेला असतो की मुलगा आणि मुली एकत्र दिसले की ठोकायचं.अशा वातावरणात शहरात हे मुलींचं प्रेम फुलतं. तेव्हा प्रश्न असतोच मनात दबा धरून की पुढं काय? या प्रेमाचं पुढं काय होईल किंवा शिक्षण संपल्यावर गावाकडे परत जावं लागलं की घरी काय सांगणार? घरचे म्हणतील तिथंच लग्न करावं लागेल अशी मनात भीती असतेच. या सगळ्याची जाणीव असूनसुद्धा प्रेम करत असतात. लहानपणापासून वडील, भाऊ अशा पुरुषांवर अवलंबून राहण्याची शिकवण असल्यानं प्रेम करतात तेव्हा त्या प्रियकरवर अवलंबून राहू लागतात. त्यानं आपल्याला कधी सोडूच नये अशी भावनापण निर्माण होते. मुलांमध्ये इतक्या गुंतून जातात की त्यानं मग फोन उचला नाही किंवा केला नाही तरी अस्वस्थ होतात. यातून मग तो मुलगा चुकीच्या पद्धतीने वागत असेल, संशय घेत असेल, आपला फायदा घेतोय असं वाटत असेल तरी त्याला सोडण्याची हिंमत होत नाही. अशा प्रकारातूनच जीव देण्यापर्यंत घटना घडल्या आहेत.मात्र हे प्रेमाचे दिवस अनेकींना खुला श्वास घेऊ देतात. हिंमत देतात, कौतुक देतात आणि त्या मनाप्रमाणं काही गोष्टी करतातही. अगदीच मोकळेपणाने जगण्याचा प्रयत्न करत असतात. धर्म, शिक्षण, वय अशा कोणत्याच गोष्टींचा त्यांना त्यावेळी अडथळा वाटत नसतो. त्यांच्यात एक बंडखोरीची ताकद निर्माण झालेली असते. इतके दिवस ज्या गोष्टी चुकीच्या, अनैतिक वाटत असतात त्याच किती योग्य आहेत हे आता त्याच पटवून सांगू लागतात.खरं तर हल्ली आपल्याला बॉयफ्रेण्ड असणं हीपण मुलींसाठी एक प्रतिष्ठेची बाब झाली आहे. एखाद्या मुलीला किती मुलांनी प्रपोज केलं हे तीच काय तिच्या मैत्रिणीही अभिमानानं सांगतात. अशा वातावरणात एखाद्या मुलीला बॉयफ्रेण्ड नसेल तर ती दिखावा करण्यासाठी एखाद्या मित्राला स्वत:चा बॉयफ्रेण्ड बनवते. किंवा एखाद्या मुलानं प्रपोज केलं तर लगेच होकार देऊन मोकळी होते. त्या नात्यात प्रेम नसतंच, तेवढ्यापुरतं मिरवणं असतं. ते मिरवणं लग्नाच्या विचारापर्यंतसुद्धा पोहचत नाही.याच टप्प्यावर मैत्रिणी फार महत्त्वाच्या बनतात. मुली एकमेकींना सारं सांगतात. सल्ले देतात. (जे अनेकदा चुकतात. इमोशलन असतात.) एकमेकींची सिक्रेट्स जपतात. अनेकदा भरीसही घालतात. प्रेमाच्या चक्रात मैत्रीचं एक सल्ला केंद्र जोरात असतं.हे सारं काही दिवस चालतं. प्रेमात पडलेल्या साºयाच मुलींची ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न होतात का?उत्तर नाही असंच द्यावं लागतं.प्रेम ही भावना, लग्न हा व्यवहार हे समीकरण डोकं वर काढतं. घर, पालक, समाज, जात-धर्म, आर्थिक स्थिती, मतांचा आणि विचारसरणींसह लाइफस्टाइल यांचे बोचरे काटे टोचायला लागतात. त्या काट्यांचे भाले झाले की प्रेम विरतं..लग्नाच्या रूळलेल्या वाटेवर ‘घरचं म्हणतील तसं’ वागण्याचा मुलींचा त्याग मोड ऑन होतो..याचा दोष मुलींना देणं सोपं; पण त्यांच्या जगण्याचा गुंताच असा की त्या एकाक्षणी हतबल होऊन सोय स्वीकारतात किंवा तिला बळी पडतात...

- इमरोज