शहरं
Join us  
Trending Stories
1
"मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकता?"; झेलेन्स्की यांच्या सोबत झालेल्या सिक्रेट बैठकीत ट्रम्प यांनी तयार केला खतरनाक प्लॅन!
2
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
3
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
4
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
5
'मी मज हरपून...' आशा भोसलेंची नात जनाई आहे खूपच बिनधास्त अन् 'ब्यूटिफूल', पाहा तिचे ग्लॅमरस Photos
6
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
7
‘’महाराष्ट्रातील सर्वजण मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
8
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
9
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
10
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
11
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
12
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
13
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
14
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
15
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
16
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
17
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
19
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
20
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश

ग्रुपीचं वेड

By admin | Updated: January 29, 2015 16:23 IST

काय काय जाहीर सांगतात, मुलं आपल्या ग्रुपीतून? आपण जे करू त्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ते शेअर करण्याचं वेड स्मार्टफोन वापरणार्‍या तरुण मुला-मुलींमध्ये प्रचंड दिसतं. ते किती टोकाचं आहे, हे समजून घेतलं तरी धास्ती वाटावी इतकं आपलं जगणं लोकांना सांगण्याची उर्मी भयंकर आहे.

काय काय जाहीर सांगतात, मुलं आपल्या ग्रुपीतून?
आपण जे करू त्या प्रत्येक गोष्टीचे फोटो काढून ते शेअर करण्याचं वेड स्मार्टफोन वापरणार्‍या तरुण मुला-मुलींमध्ये प्रचंड दिसतं. ते किती टोकाचं आहे, हे समजून घेतलं तरी धास्ती वाटावी इतकं आपलं जगणं लोकांना सांगण्याची उर्मी भयंकर आहे.
१) आपले कॉलेजचे, पिकनिकचे, बर्थ डे सेलिब्रेशन, बायकिंग, ट्रेकिंग या ग्रुप फोटोंचं आभासी जगात सर्वाधिक शेअरिंग होतं. अनेक माणसं, त्यावर अनेक माणसांच्या अनेक कॉमेण्ट्स, त्यावरच्या चर्चा यासगळ्यात मजा येते म्हणून तरुण मुलं ग्रुप फोटो काढकाढून शेअर करतात.
२) काही मुलं स्वत:चे फोटो अगदी आपला आवडता कपडा, आरसा, कॉफी मग याबरोबर काढूनही सतत शेअर करतात. त्या  फोटोत एकच जीवंत माणूस असला, तरी त्यांच्या मते त्या फोटोत ते एकटे नसतात.
३) आता तर फॅड आहे ते बाथरूम सेल्फीज्चं. खरं तर बाथरूम ही अत्यंत व्यक्तिगत वापराची जागा. मात्र, तरीही बाथरूमध्ये जाऊन आपला रिलॅक्स मूड जगाला सांगण्याची होड अनेकांमध्ये दिसते.
४) तिसरा प्रकार सतत पाटर्य़ा करणार्‍यांचा. हे म्हणजे आपण किती हॅपनिंग लाइफ जगतो, कुठं-कुठं फिरायला जातो, हे सतत लोकांना सांगत रहायचं. त्यातून आपण किती सुखी आहोत हे जगाला दाखवत रहायचं.
५) आपल्या इण्टिमेट आयुष्यातले फोटोही अनेक कपल्स शेअर करतात. शरीरसंबंधांपूर्वीचे चेहरे आणि नंतरचे चेहरे असं शेअर करण्याचा ट्रेण्ड पाश्‍चिमात्य तरुणांमध्ये प्रचंड मोठा आहे.
६) आणि सगळ्यात ज्या सेल्फीज आणि ग्रुपींची सध्या पाश्‍चिमात्य जगात भयंकर स्फोटक चर्चा सुरू आहे, ते म्हणजे थायगॅप सेल्फी आणि ग्रुपी. अनेक गोलमटोल मुली इतर मुलींचे फोटो पाहून आपण बारीक व्हायचा चंग बांधतात. आणि  कंबरेचे दोन हाडं दिसण्याइतपत बारीक झाल्या की, त्याचे फोटो काढून शेअर करतात. अनेक मुली तर ग्रुप बनवून असे फोटो शेअर करतात.
या भयंकर वेडाची आणि नस्त्या धाडसाची तिकडेही प्रचंड चर्चा आहे.
 
ही चटक, धोकादायक.
 
१) इतर व्यसनांची जशी चटक लागते तशीच ही फोटो काढण्याची आणि शेअर करण्याचीही चटक लागते. 
२) अनेक मुलं पाटर्य़ांना जातात, एकत्र येऊन काही तरी उद्योग करतात ते असले ग्रुपी काढता यावेत म्हणून. आपण जे करतोय त्यात काही मजा येत नाही; मात्र त्याचा फोटो काढून तो शेअर करण्यात आणि त्यावर चर्चा करण्यातच अनेकांना मजा वाटते.
३) आपल्या अत्यंत खासगी गोष्टी आपण जगाला सांगतो, आपण काय करतो याची जाहीर डायरीच लिहितो याचं भान राहत नाही, आणि मग अनेकदा नको ती माहिती जगाला पुरवल्यानं घोळ होऊन आयुष्यच चावडीवर येतं.
४) अनेकांच्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो, होतो. आणि मग त्यातून मनस्तापही होतोच होतो.
५) अनेकजण आपलं प्रत्यक्ष जगणं विसरून फक्त ऑनलाइन जगातच हरवून जातात.
६) आज जगभरात या विषयावर अभ्यास तर सुरू आहेच, पण अनेक तरुण मुलं ब्लॉग लिहून आपला अनुभव सांगत आहे.