शहरं
Join us  
Trending Stories
1
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
2
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
3
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
4
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
5
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
6
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
7
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
8
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
9
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
10
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
11
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
12
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
13
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
14
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
15
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल
16
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
17
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
18
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
19
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
20
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य

ग्रॅव्हिटीलाइट- गावखेडय़ात दिवे लावणारं एक अनोखं तंत्रज्ञान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 17:30 IST

गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीवर वीज तयार होऊ शकते आणि दिवे लागू शकतात, विश्वास नाही बसत? पण हे खरंय !

प्रसाद ताम्हनकर 

ग्रॅव्हिटीलाइट ही एक सुंदर नवकल्पना आहे. ती विकासशील राष्ट्रांच्या बाजारपेठेतील एक स्वस्त प्रकाश स्नेत ठरू शकेल. आज जगात मागास राष्ट्रांनाच नाही, तर विकसनशील राष्ट्रांनादेखील विजेची समस्या मोठय़ा प्रमाणावर भेडसावत आहेत. जगात आजही दोन अब्ज लोकांना वीज उपलब्ध नाही हे भीषण वास्तव आहे. ग्रामीण अथवा मागासलेला माग, आर्थिक अडचणी, विजेचा पुरवठाच उपलब्ध नसणं अशा अनेक कारणांनी लोक वीज मिळण्यापासून वंचित राहिलेले आहेत. जगभरातील शास्रज्ञ या अडचणीवरती मात करण्यासाठी विविध उपाय शोधत आहेत, आणि या ना त्या मार्गाने सर्वार्पयत प्रकाश पोहचावा यासाठी धडपड करत आहेत.ज्युलिया सिल्वरमन, हेमली ठाकरे, जॅसिका लिन आणि जेसिका मॅथ्यूस यांनी एक असा सॉकर बॉल तयार करण्यात यश मिळवलं आहे, जो किक मारल्यानंतर ऊर्जेची निर्मिती आणि साठवण करण्यास सक्षम आहे. सॉक्केट असं नाव असलेल्या या तंत्नज्ञानानं नुकताच संशोधन क्षेत्नातील पुरस्कारदेखील प्राप्त केला आहे. जिम रीव्हज आणि मार्टिन रिकिफोर्ड या दोन संशोधकांनीदेखील अत्यंत स्वस्त दरातलं आणि वीज बनवण्यास सक्षम असं यंत्न बनवण्याचा ध्यास घेतला होता. अखेर चार वर्षाच्या कष्टांनंतर त्यांना हा ग्रॅव्हिटीलाइट बनवण्यात यश आलं. या लाइटला प्रकाश उत्पादनासाठी ना विजेची गरज लागते, ना बॅटरीची, ना सौरऊर्जेची. उलट हा अनोखा दिवा प्रकाशासाठी गुरु त्वाकर्षणाच्या शक्तीचा वापर करतो. या लाइटच्या केसिंगमधून ओवलेल्या दोरीच्या एका टोकाला वजन बांधण्यात आलेलं आहे. दोरीचं दुसरे टोक धरून खाली ओढून सोडून दिल्यानंतर, दुसर्‍या बाजूला लावलेलं वजन, हळूहळू खाली येऊ लागतं. या सगळ्या प्रोसेसमध्ये दोरीच्या घर्षणानं आतले गिअर्स काम करू लागतात आणि दिव्याच्या आतील जनरेटर चालू होऊन दिवा प्रकाशमान होतो. हा प्रकाश तब्बल 25 मिनिटं टिकतो. त्यानंतर पुन्हा एकदा दोरी खाली ओढून ही प्रक्रि या सुरू ठेवावी लागते. ही दोरी पुन्हा खाली ओढायला केवळ तीन सेकंद पुरतात. विशेष म्हणजे हा दिवा, झाडापासून ते घरातल्या कुठल्याही छताला सहजपणे टांगता येणं शक्य आहे.या तंत्नज्ञानाच्या जाहीर चाचण्या करण्यासाठी संशोधकांनी क्र ाउड फंडिंगच्या माध्यमातून पैसा जमा करण्याचं ठरवलं होतं. या तंत्नज्ञानासाठी जनतेच्या मदतीने  ़55 हजार डॉलर्स जमा करण्याचा त्यांचा मानस होता. मात्न प्रत्यक्षात त्यांच्या या शोधाला प्रचंड लोकप्रियता मिळाल्याने त्यांना चार लाख डॉलर्स एवढी कमाई झाली. बिल गेट्स यांनी ग्रॅव्हिटीलाइटचं कौतुक करण्याचं ट्विट केल्यानं तर त्यांना अधिक लोकप्रियता आणि आर्थिक मदत मिळाली. हे तंत्रज्ञान सर्वसामान्यांर्पयत कधी पोहोचतं ते आता बघायचं.

**********

गूगल स्मार्ट असिस्टंट संगणकावरती वापरता येतो का? सध्या स्मार्ट फोन किंवा स्मार्ट स्पीकर्समध्ये असलेल्या स्मार्ट असिस्टंटने गॅझेट्स वापरायची पद्धतच बदलून टाकली आहे. अगदी नवशिका यूजरदेखील सहजपणे मोबाइल आणि त्यातील विविध अ‍ॅप्लिकेशन्स सहजपणे हाताळू शकायला लागला आहे. या स्मार्ट असिस्टंटची आता यूजर्सला इतकी सवय लागली आहे, की त्याचा वापर त्यांना संगणकासाठीसुद्धा करावासा वाटू लागला आहे. गूगल असिस्टंट, अमेझॉन अलेक्सा असे स्मार्ट असिस्टंट आता सहजपणे विंडोजसाठी उपलब्ध झाले आहेत. अमेझॉन अलेक्साने तर विंडोजच्या वापरासाठी खास विंडोज अ‍ॅप उपलब्ध करून दिलं आहे.  गूगल स्मार्ट असिस्टंट सध्यातरी विंडोजसाठी अधिकृतपणे उपलब्ध नसला, तरी कोणत्याही वेब ब्राउझरमध्ये तुम्ही गूगल इन्स्टॉल करून मायक्र ोफोनच्या मदतीने जवळपास गूगल असिस्टंटचाच अनुभव सहजपणे घेऊ शकता. टायपिंग, ईमेल पाठवणं, विविध वेबसाइट्स उघडणं अशा अनेक कामात हे असिस्टंट तुमची मदत करू शकतात.