शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
6
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
7
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
8
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
9
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
10
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
11
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
12
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
13
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
14
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
15
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
16
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
17
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
18
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
19
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
20
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?

गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 10:05 IST

शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

- मयूर देवकर

कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहून चलबिचल सुरु झाली. दरम्यान, त्यानं दिल्लीच्या ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’मध्ये रीन्यूएबल एनर्जी विषयात एम.टेक.साठी प्रवेश घेतला. तिथं त्याला त्याच्यासारखेच ग्रामीण विकासाच्या ध्येयानं प्रेरित झालेले दोन मित्र भेटले. पीयूष सोहनी आणि शंकर रामकृष्णन.एका ‘एनजीओ’सोबत काम करताना ते सिरोही नावाच्या एका खेड्यात गेले. दिल्लीपासून फक्त ३५ किमी दूर असलेल्या या गावात ९० टक्के घरांत साधा स्वयंपाकासाठीचा गॅस नव्हता. ७० टक्के घरांमध्ये उपजीविकेची साधनं नव्हती. आपल्या शिक्षणाचा ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असं डोक्यात चक्र सुरू झालं.मध्यंतरी ‘हस्क पॉवर सिस्टिम’मध्ये इंटर्नशिप करत असताना कौशिकची ग्यानेश पांडेशी भेट झाली. ग्यानेश अमेरिका सोडून बिहारच्या गावांमध्ये वीज आणण्यासाठी काम करतो. त्याच्याच सल्ल्यानुसार एम.टेक .पूर्ण झाल्यावर या तीन दोस्तांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. त्यासाठी पीयूष आणि शंकरची स्कॉलरशिप आणि आयआयटी मद्रास रिसर्च पार्कच्या विलोग्रो इनोव्हेशन फाउंडेशनची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.किशोर सांगतो, ‘ग्रामीण भागातील सुमारे आठ कोटी कुटुंबांकडे गुरे-ढोरे आहेत. त्यापैकी अर्ध्या जणांच्या घरी दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणाºया बायोगॅसची निर्मिती करण्याइतपत जागा आणि शेणखत आहे. तरीदेखील भारतातील ८६ टक्के लोक सरपण आणि शेणाच्या गोवºया इंधन म्हणून वापरतात. मग आम्ही ठरवलं की कमी खर्चात बायोगॅस निर्मितीचं तंत्र विकसित करायचं !’२०१३ साली या तिघांनी स्टार्टअप सुरू केलं. त्याला नाव दिलं, ‘सस्टेनअर्थ एनर्जी सोल्यूशन्स’. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका यासारख्या गुरांची संख्या जास्त असणाºया दहा राज्यांचा सहा-सात महिने सखोल अभ्यास केला. त्यातून लक्षात आलं की, बायोगॅस तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज नाही. जे आहे ते वापरणं अवघड असल्याने लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना पटकन विकत घेऊन लगेच वापरता येणारी, जास्त किचकट नसणारी वस्तू आवडत असते हे लक्षात घेऊन त्यांनी एक प्री-फॅब्रिकेटेड फ्लेक्सिबल बॅगसारखा बायोगॅस प्लँट तयार केला. कोणाच्याही मदतीशिवाय दोनच दिवसांत तो बसवता येतो. २०१५ साली त्यांनी ‘गौगॅस’ नावाचा पहिला प्रकल्प तिरुपतीजवळील एका खेड्यातील शेतकºयाकडे बसवला. तिथून त्यांचं हे गौगॅसचं काम जोरात सुरु झालं. सध्या कौशिक आणि टीम मेक्सिकोच्या ‘सिस्टिमा बायोबोल्सा’ कंपनीसोबत मिळून काम करते.कौशिक म्हणतो, एकीकडे आपण मेट्रोमधून फिरतो, सर्व सुखसुविधांवर जगतोय आणि खेड्यांमध्ये लोक अन्न, पाणी, वस्त्र, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. समाजातील ही दरी भरून काढणं आपली नैतिक जबाबदारी आहे’.

भविष्यात स्कोप काय?आॅर्गेनिकची चलती असणाºया नव्या जगात अशा ‘देशी’ उद्योगांना स्कोप आहे. फक्त नजर नवी हवी.

कौशल्य काय हवीत?खरं तर इच्छाशक्ती हवी आपणआपल्या अवतीभोवतीची साधनं कल्पकेनं वापरण्याची?डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग, बी.टेक. झालेल्यांनी थोडा कल्पक विचार केलातर अशा आयडिया सुचू शकतात.