शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
2
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
3
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
4
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
5
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
6
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
7
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
8
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
9
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
10
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
11
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
12
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
13
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
14
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
15
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?
16
Jio चा धमाका! २०० रुपयांपेक्षा कमी दरात अनलिमिटेड 5G डेटा आणि कॉलिंग; 'हे' २ स्वस्त प्रीपेड प्लॅन्स लॉन्च
17
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
18
IND vs AUA 1st T20I : सूर्यकुमार यादव अन् शुबमन गिल जोडी जमली; पण शेवटी पाऊस जिंकला!
19
रणबीर कपूरनंतर आता प्रभासही देणार न्यूड सीन? संदीप रेड्डी वांगा यांच्या 'स्पिरीट'ची चर्चा
20
वयाच्या ७० व्या वर्षी पिता बनला हा अभिनेता, पत्नीसह केलं आठव्या मुलाचं स्वागत

इसरो...देसी माणसाची ग्लोबल झेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2017 17:09 IST

इसरोच्या बंगलोर कार्यालयात पोहचले. सगळीकडे सुरक्षा यंत्रणेची बारीक नजर. अवतीभोवती मात्र तरुण मुलामुलींची गर्दी.

- ऑक्सिजन टीम 

आकाशी झेपावणा-या भारतीय महत्त्वाकांक्षेचं आणिगुणवत्तेचं एक हायटेक रूप.आकाशी झेपावणारे इसरोचे रॉकेट्स तर आपण नेहमीच पाहतो,पण थेट इसरोत जाता आलं तर?- जायचंय?बघायचेत कसे बनतात उपग्रह आणि सॅटेलाइट लॉँचर्स?कसं करतात शास्त्रज्ञ काम?मग लोकमत दीपोत्सवचा अंक चुकवू नका,कारण थेट इसरोचीच प्रत्यक्ष सफर घडवून आणणारा लेख तरत्यात आहेच; पण देसी माणसाची ग्लोबल झेप काय असू शकतेयाची एक विलक्षण कहाणीही आहे..आणि याशिवायभेटा आलिया भटला.ती तेच सांगतेय, की आपल्याला जमतं हा एक ट्रॅप आहे,यशस्वी व्हायचं असेल तर हा ट्रॅप तोडायला हवा!कसा?त्याचीच ही एक झलक..इसरोच्या बंगलोर कार्यालयात पोहचले. सगळीकडे सुरक्षा यंत्रणेची बारीक नजर. अवतीभोवती मात्र तरुण मुलामुलींची गर्दी. एखादं कॉलेज कॅम्पस असावं इतके तरुण चेहरे. काही टिपिकल मेट्रोपॉलिटन वळणाचे; पण त्यांची संख्या तुरळक. बाकी बहुसंख्य चेहरे दक्षिण भारतीय. साधेसुधे. मध्यमवर्गातून आलेले. चापूनचोपून वेणी, केसांत माळलेले अबोली-मोग-याचे गजरे, कपाळी चंदन टिळे, कुंकू, हातात बांगड्या अशा मुली आणि मुलंही अगदीच साधेसे. ही तरुण माणसं इसरोमध्ये शास्त्रज्ञ आहेत, यावर एरवी कुणी सांगितलं असतं तरी विश्वास ठेवला नसता... पण समोर दिसतच होतं!इसरोच्या सुरुवातीच्या काळाबद्दल डॉ. कलाम नेहमी सांगत, ‘मी इंजिनिअर म्हणून काही फार हुशार नव्हतो, एरॉनॉटिक्सही मला जेमतेम कळायचं; पण डॉ.साराभार्इंना वाटलं हा मुलगा सिन्सिअर आहे, कष्ट करतो, एकच गोष्ट चांगली जमेपर्यंत पुन्हा पुन्हा करतो, म्हणून त्यांनी मला सोबत घेतलं. नुसतं हुशार असून भागत नाही, नवीन काहीतरी करून पाहण्याची ऊर्मी साराभार्इंना फार मोलाची वाटे..’- ही आजची तरुण मुलं त्याच ऊर्मीनं, उमेदीनं इथं येत असतील का?प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर देतील अशी इसरोत काम करणारी तरुण मुलं समोर होती; पण इथं शिस्त अशी की, परवानगीशिवाय कुणी पत्रकारांशी बोलत नाही, की पत्रकार म्हटलं म्हणून कुणी उगाचच हरखून जात नाही. प्रसाद यांच्या भेटीची वेळ होतच आली होती.वाट पाहत स्वागतकक्षात बसले तर समोर एक फलक टांगलेला होता त्यावर लिहिलं होतं,‘वॉण्ट हॅपिनेस फॉर अ लाइफटाइम? लर्न टू लव्ह व्हॉट यू डू!’- सहज नजर फिरवून पाहिलं की इथल्या माणसांचे चेहरे त्रासलेले दिसताहेत की प्रसन्न?तेवढ्यात एक जण आला. नम्रपणे म्हणाला, ‘इथं तुम्हांला आवाजाचा त्रास होऊ शकतो, आम्ही ड्रिल मशीन लावतोय, दुसरीकडे बसता का?’ड्रिल कसलं? काय काम असेल?- ते पाहायचं म्हणून मुद्दाम तिथंच बसले, तर दुस-या दिवशी असलेल्या गणेश चतुर्थीनिमित्त सजावट सुरू होती. तेवढ्यात निरोप आला. प्रसाद यांच्या केबिनमध्ये गेले तर समोर ठळक अक्षरांत लिहिलेलंच होतं -मोअर यू आस्क, मोअर यू लर्न..इसरो समजून घेण्याचं मिशन सुरू झालं, ते अशा वाट्टेल ते प्रश्न विचारण्याच्या मोकळ्या स्वातंत्र्यातून!‘व्हॉट इज मोअर इम्पॉर्टण्ट? - पॅशन. फर्स्ट यू नीड पॅशन इन स्पेस.’ - प्रसाद त्यांच्या कानडी वळणाच्या इंग्रजीत सांगत होते,‘इसरोच नाही तर अंतराळ संशोधनात काम करण्यासाठी पहिली अत्यावश्यक गोष्ट म्हणजे झपाटलेपण. डॉ. साराभार्इंनी हे झपाटलेपणाचं बी इसरोत रोवलं, ते इथं येणाºया प्रत्येकात ही संस्था रुजवत राहिली. रॉकेट आम्ही कधी कधी उडवतो, बाकी रोजच्या आयुष्यात उपयोगी पडतील अशी वेगवेगळी अ‍ॅप्लिकेशन्स स्पेस टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तयार करणं, मुक्त वापरासाठी तंत्रज्ञान मोफत वाटणं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहचवणं; हे आमचं काम आहे.’इसरोत गेलं की, ‘देशांतर्गत समस्यांसाठी उच्च तंत्रज्ञान वापरून प्रभावी उत्तरं शोधणं’ हे वाक्य वारंवार कानावर येतं. त्या वाक्याच्या पोटात बरेच तपशील आहेत, इसरोत आत आत शिरावं तसे ते तपशील उलगडू लागतात. मात्र ते सारे तांत्रिक तपशील समजून घ्यायचे तर प्रसाद म्हणतात तसं इसरोत एक चक्कर मारून, जिथं सॅटेलाइट असेम्बल होतात, ती क्लिन रूम आधी पाहून यायला हवी.इसरोच्या आवारात पाय ठेवल्यापासून आपल्याला उपग्रह आणि रॉकेट लाँचर यांची पितळी प्रतीकात्मक लघुरूपं खुणावत असतात. पण उपग्रह जुळणी थेट करतात, जिथं साक्षात उपग्रह बनतो, एकेक बारकासा स्क्रूही अत्यंत कठोर परीक्षांतून जातो, तिथं प्रत्यक्ष जाणं मोठं रोमांचक आहे.वैज्ञानिक वनिता तितक्यात आल्याच. त्यांच्यासोबत मी क्लीन रूमकडे निघाले. ‘स्वच्छ खोली’ नावाची ही भानगड पहिल्या झटक्यात आपल्याला कळत नाही आणि त्या खोलीत आपल्याला जाताही येत नाही. ही क्लीन रूम तळ मजल्यावरच होती; पण ती पाहायची म्हणून मी आणि वनिता थेट दुसºया मजल्यावर गेलो. काचा लावलेल्या एका खोलीतून उंचावरून या क्लीन रूममध्ये डोकावलं तर एक मोठ्ठा ऐसपैस वºहांडा दिसतो, मोठी लांबच लांब आयताकृती खोली आणि डोक्यावरच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत शब्दश: संपूर्ण शरीर झाकून घेणारा विशिष्ट पोशाख घातलेली काही माणसं... उपग्रहाची बांधणी-जुळणी करणारे हे शास्त्रज्ञ!!दूर पलीकडे एक मोठ्ठं धूड दिसत होतं, वायरींचं जंजाळ. सोनेरी कागदाच्या वेष्टणात गुंडाळलेला काही भाग. ते काय असं विचारलं तर वनिता म्हणाल्या, ‘हेच तर चांद्रयान-दोन. त्याचं काम आता अंतिम टप्प्यात आहे.’भारतीय अंतराळ विज्ञान संस्था. इसरो. वय जेमतेम ४० वर्षं!अंतराळ विज्ञान अभ्यासात तर हे वय अत्यंत कमी.मात्र यशाचा आलेख रॉकेट स्पीडचा, हे कसं काय घडलं?सर्वार्थानं आणि पूर्णत: ‘देसी’ असलेल्या इसरोच्या यशाचं रहस्य काय?- असे मूठभर प्रश्न घेऊन मी इसरोत येऊन पोहचले होते.मंगळयानासारखं यश पाठीशी असताना आजहीकाही टीकेचे सूर प्रश्न विचारतातच की,ज्या देशात लोकांना जेवायला अन्न आणि परसाकडेला जायला शौचालयं मिळण्याची मारामार आहे, तिथं ही अंतराळ उड्डाणांची उधळपट्टी, एवढा सोस, कशासाठी?खरंच अवकाश मोहिमांपलीकडे भारतीय माणसांच्यारोजच्या जगण्यात इसरोचं काही योगदान आहे का?आणि असलंच तर ते नक्की काय?- हेच तर शोधायचं होतं...