शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

तडकफडक उडता टॅटू

By admin | Updated: June 17, 2016 07:50 IST

उडता पंजाबचा वाद कितीही चिघळला आणि चघळलेला असो, सिनेमा कसाही असो, त्या साऱ्याहून एक एकदम स्ट्रायकिंग गोष्ट दिसलीये का तुम्हाला ? उडती उडती नाही, तर ठळक दिसतेय ती गोष्ट! रटाळ चर्चा करण्यापेक्षा ती गोष्ट पहा, काहीतरी स्टायलिश सापडेल!

उडता पंजाबचा वाद कितीही चिघळला आणि चघळलेला असो, सिनेमा कसाही असो, त्या साऱ्याहून एक एकदम स्ट्रायकिंग गोष्ट दिसलीये का तुम्हाला ? उडती उडती नाही, तर ठळक दिसतेय ती गोष्ट!रटाळ चर्चा करण्यापेक्षा ती गोष्ट पहा, काहीतरी स्टायलिश सापडेल!तर शाहीदचे फोटो पहा. टॅटूच टॅटू आहेत त्याच्या अंगावर! जागा मिळेल तिथं टॅटूच दिसताहेत.मानेवर, दंडावर, छातीवर एवढंच काय पण हाताच्या बोटांवरही ते टॅटू दिसताहेत.कुठं १० डिजिट नंबर दिलेला दिसतोय. तर कुठं लिहिलेलं आहे मम्मा दा बॉय, कुठं पंख पसरलेले दिसताहेत..हिरो आहे की टॅटूचं पोस्टर, असा प्रश्न आपल्याला पडूच शकतो.पण आता स्टाईल मारुपणाच करायचा म्हटल्यावर हल्ली टॅटूला पर्याय नाही.तशीही टॅटूची क्रेझ आहे. प्रियांका चोप्रा ते अ‍ॅँजलिना जोली जो तो टॅटू गोंदवून घेत सुटलाय!पण तुम्हाला काय वाटतं, टॅटू काढणं हे काय सोपं काम नाही!एकतर त्यासाठी डेअरिंग लागतं, आपल्या अंगावर काहीबाही चित्तारुन घ्यायचं, ते ही कायमसाठी हे काय सोपं का नाही!हिंमत लागतेच!पण जगात काही दिवाने तर असेही आहेत की, त्यांनी प्रेमात पडून नावं गोंदवून घेतली आणि मग ब्रेकप झाल्यावर तो टॅटू खोडायचा कसा म्हणून वणवणत राहिले.काहींचे टॅटूंचे नावांचे स्पेलिंगच चुकतात मग ते स्पेलिंग दुरुस्त करायचे म्हणून ते जातात आणि जास्त चुकवून ठेवतात.अशा चुकलेल्या टॅटूंच्या अनेक कहाण्या आॅनलाइन पहायला आणि वाचायला मिळू शकतात. आणि तो प्रकार अत्यंत मनोरंजक आहे. खतरनाक विनोदी आहे.शाहीद जरी सिनेमात टॅटूचं चालतंबोलतं पोस्टर दिसत असला तरी अशी सगळ्या अंगावर रंगरंगोटी काही फार बरी दिसत नाही, आता हे त्याला कोण सांगणार म्हणा!-ऋषी कुलकर्णी