फ्लोरल
By admin | Published: April 27, 2017 05:34 PM2017-04-27T17:34:50+5:302017-04-27T17:34:50+5:30
यंदाच्या उन्हाळ्याच्या फॅशनचं एका वाक्यात वर्णन - फ्लोरल!
Next
>-ऑक्सिजन टीम
यंदाच्या उन्हाळ्यात कपडय़ांचं फॅशन स्टेटमेण्ट काय?
-फ्लोरल.
या एका शब्दात उन्हाळी फॅशनचं यंदाचं सारं सार सामावलेलं आहे. समर ट्रेण्डची चर्चा नेहमीच असते. अनेक बडय़ा कंपन्या आपली समर कलेक्शन्स या काळात विक्रीला आणतात. आता आपल्या खिशात काय एवढे पैसे नसतात की आला उन्हाळा की घे उन्हाळी कपडे. आला पावसाळा की भलतेच आणि विण्टर कलेक्शनची जाहिरात पाहिली की सुटायचं पळत!
आपण तेच ते कपडे वर्षभर पुरवून वापरतो. पण त्यातही फॅशन स्टेटमेण्ट करता येणार नाही असं कोणी सांगितलं?
म्हणून तर यंदाच्या उन्हाळ्याच्या फॅशनचं एका वाक्यात वर्णन केलं आहे.
फ्लोरल!
म्हणजे फुलाफुलांची नक्षी.
गेले दोन उन्हाळे फ्लोरल प्रिण्ट फॅशनेबल मानले जात आहेत. यंदाही समर कलेक्शनमध्ये फ्लोरल प्रिण्ट्सचीच चलती आहे.
आपणही या फ्लोरल प्रिण्टचे काही प्रयोग आपल्यासाठी करुच शकतो.
1) बारीक फुलांच्या नक्षीच्या पलाझो, थ्री फोर्थ, लॉँग स्कर्ट सध्या अगदी स्ट्रीट शॉपमध्येही मिळत आहेत. ते स्वस्तात मस्त मिळतात.
2) शॉर्ट कुर्तीही फ्लोरल प्रिण्टमध्ये घेता येतील किंवा कटपिसच्या दुकानात जाऊन फ्लोरल प्रिण्टचे कटपिस आणताच येतील. आपल्या मापाचे कुर्ते शिवूनही घेता येतील.
3) हे ही नसेल करायचं तर आपले दुपट्टे आणि स्ट्रोल कधी कामाला येणार? फ्लोरल प्रिण्टचे दुपट्टे, स्ट्रोल, स्कार्फ वापरा, नेहमीच्याच कपडयांवर, समर लूक येईल आपोआप.
4) याहून सोपी आयडिया म्हणजे फुलापानांचे कानातले, गळ्यातले घालणे. बोटात फुलांच्या अंगठय़ा ही तर सध्याची लेटेस्ट फॅशन.
5) आता याहूनही अतीसोपा पर्याय. नेलपेण्ट वापरताच तुम्ही. आपल्या नखांवर छान फुलांची नक्षी काढा.
6) ठरवलंच तर अशा एकसे एक आयडिया तुम्हालाही सुचू शकतील. उन्हाळा ट्रायआऊट करुन पाहण्याचाच मौसम आहे, हे नक्की!