शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

महाराष्ट्र आणि गोव्यातल्या ‘फर्स्ट टाइम व्होटर्स’च्या डोक्यात काय शिजतंय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 16:00 IST

या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच बोटाला शाई लावणार्‍या ‘तिचं’ आणि ‘त्याचं’ पहिलं मत र्‍ लोकमत टीम पोहचली राज्यभरातल्या कॉलेज कॅम्पसवर! काय लागलं हाताला? जनरेशन Z- हिंमत आणि हतबलता! कन्फ्यूजन आणि किचाट!

ठळक मुद्देराजकीय व्यवस्थेवर निम्म्या मुलांचा विश्वास, उरलेल्यातल्या निम्म्यांना ही व्यवस्थाच फिजूल वाटते!मुलांना वाटतं, नागरिकांच्या ‘मता’ला ‘किंमत’ अर्थातच आहे; पण ‘माझ्या एका मता’ला ती आहे का, याविषयी मात्र शंका!निम्म्याहून अधिक तरुण-तरुणींना वाटते, मतदारांच्या गरजा आणि अपेक्षा बदलल्या आहेत; राजकारणालाही बदलावेच लागेल!

- ऑक्सिजन टीम

1. आजच्या एकूण राजकीय व्यवस्थेवर तुमचा विश्वास आहे का?2. तुम्ही कोणती राजकीय विचारसरणी मानता? उजवी की डावी?3. तुमच्या मताला लोकशाहीत किंमत आहे, असं वाटतं का?4. तुम्ही उमेदवार पाहून तुमचं मत देणार? की पक्षाला मत देणार?5. तुमच्या राजकीय नेतृत्वाकडून तुमची सगळ्यात ‘पहिली’ अपेक्षा (प्रायॉरिटी) कोणती?6. जात-धर्म हाच आजच्या राजकारणाचा आधार आहे, असं वाटतं का?7. जात-धर्माच्या आधारावर केलं जाणारं राजकारण यापुढच्या काळात यशस्वी होईल, असं वाटतं का?8.  मतदार यादीत तुमचं नाव आहे का?9. तुम्ही यंदा मतदान करणार का?- असे एकूण नऊ प्रश्न होते.ते घेऊन महाराष्ट्र आणि गोव्यातली ‘लोकमत’ची टीम कॉलेजा-कॉलेजांमध्ये गेली. आयुष्यात पहिल्यावहिल्यांदाच मत देणार्‍या कोर्‍या-करकरीत ‘फस्र्ट टाइम व्होटर्स’चं एकूण म्हणणं, त्यांची निराशा आणि उमेद, त्यांचा कंटाळा आणि उत्साह, त्यांचा राग आणि समजूत, त्यांचं अज्ञान आणि शहाणपण.. हे सगळंच शोधून पाहणं हा या सगळ्या खटाटोपामागचा उद्देश होता.

- आधी ‘हे काय?’, ‘कशाला?’, ‘त्याने काय होणार?’, ‘आमच्याकडून उत्तरं घेऊन त्याचं तुम्ही काय करणार?’ - असे कितीतरी आढेवेढे आले; आणि मग मात्र कॉलेजचे कॅम्पस उत्साहाने प्रश्नावली भरणार्‍या मुलामुलींच्या चर्चानी, वादविवादांनी आणि उलटसुलट मतांमधून उसळलेल्या भांडणांनी भरून गेले.दुसरा प्रश्न होता र्‍ तुम्ही कोणती राजकीय विचारसरणी मानता? उजवी की डावी? की अन्य?- त्यावर बहुतेकांचं घोडं अडलं!राजकीय विचारसरणी नावाची गोष्ट असते, तिच्यात उजवी-डावी अशी एक भानगड असते, हेच यटाक बहुतेकांना माहिती नव्हतं! ( त्याबद्दल अधिक तपशील पुढच्या अंकात)बाकीच्या प्रश्नांवर उत्तरं तयार होती. काही प्रश्नांनी मुला-मुलींना त्रास दिला. वाद घडवले.. पण एक नक्की र्‍ ‘माझा काय संबंध?’ असं कुणीही-कुणीही म्हणालं नाही!या प्रश्नांना मिळालेल्या उत्तरांचं विश्लेषण करून हाती आलेलं एकून चित्र मांडणार्‍या विशेष अंकाचा हा पूर्वार्ध!आणखी एक महत्त्वाचे!ऑक्सिजनच्या टीमने 2009 मध्ये - म्हणजे बरोब्बर 10 वर्षापूर्वी 15व्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अशीच पाहणी केली होती. तेव्हा ना सोशल मीडिया होता, ना फेसबुक ना व्हॉट्सअ‍ॅप. म्हणजे फेसबुक होतं; पण आजच्या इतकं लोकप्रिय नव्हतं, प्रत्येक फोनवरही नव्हतं. तरुण मुलं स्मार्टच होती, मात्र त्यांच्या हातातले फोन काही ‘स्मार्ट’ झालेले नव्हते. इंटरनेट ही गोष्ट त्याकाळी सायबर कॅफे नावाच्या गूढ अंधार्‍या जागी जाऊन चुपचुपके नेट वापरण्यापुरतीच मर्यादित होती.दहा वर्षापूर्वीचं हे चित्र आता किती बदललं.तरुणांचं आयुष्य बदललं, संदर्भ बदलले, प्रश्न बदलले, देशातले सत्ताधारीही बदलले.- पण दहा वर्षापूर्वी तरुण मुलं-मुली जे म्हणत होते, त्यात गेल्या 10 वर्षात किती फरक पडला आहे, हेही आम्हाला या पाहणीच्या निमित्ताने तपासता आलं. त्याची एक स्वतंत्र चौकट प्रत्येक प्रश्नोत्तराच्या विश्लेषणात दिली आहे.

या पाहणीत तरुण-तरुणींना तर समान प्रतिनिधित्व मिळावंच; पण ग्रामीण आणि शहरी तारुण्यालाही समसमान संधी मिळावी, असा प्रयत्न आमच्या टीमने केला आहे. (सोबतची आकडेवारी पाहा)- या सगळ्या खटाटोपानंतर हाती आलेल्या मतां-मतांची सांगड घातली, तर सतराव्या लोकसभेसाठी भारतात पहिल्यांदाच मतदान करणार्‍या  ‘मिलेनियल्स’च्या अंतरंगाचा काही ठाव घेता येतो का? जग बदललं, तरी आपल्या मतदारांबाबत पारंपरिक पद्धतीचे ठोकताळे बदलायला अजूनही तयार नसलेल्या राजकीय पक्षांसाठी आणि विशेषकरून तरुण नेत्यांसाठी या   ‘जनरेशन झेड’चा काही ‘खास मेसेज’ यातून घुसळून काढता येतो का? शहरी आणि ग्रामीण भागातले ‘फस्र्ट टाइम व्होटर्स’ एकमेकांपेक्षा वेगळा विचार करतात का? मुलांच्या आणि मुलींच्या अपेक्षा/मतांमध्ये काही मूलभूत फरक दिसतात का? - असे अनेक प्रश्न यातून तयार होतात.त्यांची उत्तरं र्‍ दिनांक 18 एप्रिलच्या अंकात!एकच झलक इथे नोंदवून ठेवायला हवी र्‍ मतदार यादीत नाव नोंदवलं आहे का? नोंदवलं असेल तर ते आलं आहे याची खात्री केली का?- या प्रश्नाची सगळ्यात निराशाजनक उत्तरं आम्हाला मुंबईत मिळाली. मतदार यादीत नाव नसलेल्या/नोंदवलं; पण ते आलं आहे का हे न तपासलेल्या तरुण मतदारांची ( ?) संख्या मुंबईत सगळ्यात जास्त आहे!- आणि राज्याच्या प्रगत राजधानीपासून सगळ्यात लांब असलेल्या आणि विकासाच्या वाटेवर अजूनही कुचंबत रखडलेल्या गडचिरोलीत मात्र या पाहणीत सहभागी झालेल्यांपैकी मतदार यादीत नाव नसलेल्यांची संख्या सगळ्यात कमी आहे!महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यात आणि गोव्यातही मुलामुलींना प्रत्यक्ष भेटणार्‍या ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी या प्रश्नोत्तरांच्या आकडेवारीच्या पलीकडचं बरंच काही समजून घेतलं आहे, त्यांचे अनुभवही पुढच्या अंकात वाचायला मिळतील.तेव्हा, ते म्हणतात ना, स्टे टय़ूण्ड!

***

ओन्ली फॉर अ‍ॅडल्ट्सवयात आलेल्या तरुण भारतीय मतदारांचा कल काय सांगतो, हे तपासण्यासाठी ‘लोकमत समूहा’ने केलेल्या पाहणीत सहभागी मुला-मुलींचे प्रमाण

भौगोलिक क्षेत्रमहाराष्ट्र आणि गोवा ....................................

एकूण सहभागी ‘मिलेनियल्स’ - 4180                                             तरुण र्‍ 2084 - 49.86 %

तरुणी र्‍ 2096 - 50.14 %.............................

शहरी  तरुण-तरुणींची संख्या - 2426 (58.04})

ग्रामीण तरुण-तरुणींची संख्या - 1754 (41.96})

वयात आलेल्या सतराव्या लोकसभेचा ‘तरुण चेहरा’

* देशभरातल्या एकूण नोंदणीकृत मतदारांची संख्या -  सुमारे 90 कोटी* पहिल्यांदाच मत देणार्‍या तरुण मतदारांची संख्या - 8 कोटी 43 लाख* 18 ते 19 या दरम्यान वय असलेल्या मतदारांची संख्या - 1 कोटी 50 लाख* लोकसभेसाठी पहिल्यांदाच मत देणारे सर्वात जास्त तरुण मतदार असलेली राज्ये र्‍ उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, राजस्थान आणि महाराष्ट्र* या पाच राज्यातल्या लोकसभेच्या एकूण जागा - 235* म्हणजेच सतराव्या लोकसभेतल्या तब्बल 43 % जागांच्या निर्णयात पहिल्यांदाच मत देणार्‍या तरुण मतदारांची भूमिका निर्णायक ठरू शकेल.