शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

फॉल इन लव्ह विथ युअर प्रॉब्लेम्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 13:43 IST

आयआयटी मुंबईच्या वतीने अलीकडेच ‘आंत्रप्रिनर्स समीट-2019’चे आयोजन करण्यात आले होते. भावी उद्योजकांना मार्गदर्शन, चर्चा आणि विचार-विनिमय या व्यासपीठावर झाला. त्याचं उद्घाटन देशपांडे सेंटर फॉर टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन या केंद्राचे सहसंस्थापक, भारतीय-अमेरिकन उद्योजक डॉ. गुरुराज देशपांडे यांनी केलं. त्यावेळी त्यांनी एक सूत्र मांडलं. बिग व्हिजन, सिंपल स्टेप्स. ते कसं करायचं, हेच सांगणारं त्यांचं हे संपादित भाषण..

ठळक मुद्देबदल स्वीकारणं ही रिस्क नाही, तर त्यावर स्वार होऊन अवघड प्रश्नांची सोपी उत्तरं शोधणं हे आव्हान आहे, त्याची तयारी करा!

डॉ. गुरुराज देशपांडे 

 

चॉइस इज युअर्स.जग झपाटय़ानं बदलतं आहे. हा बदल एकदम वेग पकडतो आहे. बदलाच्या या लाटेवर स्वार होऊन, तो स्वीकारून काळाबरोबर चालायचं की या बदलाचं नेतृत्व करायचं, हा तुमचा चॉइस असतो. मात्न बदलाचे जे नेतृत्व करतो, तो यशस्वी उद्योजकाचा चेहरा म्हणून समोर येतो. उद्योजकाची मनोवृत्तीच या बदलासाठी तयार असते. रिस्क या शब्दाची त्याला दहशत वाटत नाही. जगाला आज अशा उद्योजकांची गरज आहे. झपाटय़ानं बदलणारं हे जग तुम्हाला भरपूर संधी देत आहे, फक्त त्या बदलांचं नेतृत्व करण्याचा प्रय} करा!

समस्या आहेत? मग प्रेमानं स्वीकारा.शिक्षणप्रणालीतही आता आमूलाग्र बदल झालेत. पूर्वी म्हणजेच 40-50 वर्षापूर्वी शिक्षण संपल्यानंतर काही ठरावीक कोर्सेस केले की चाकोरीबद्ध नोकरीच्या संधी उपलब्ध होत्या. ती नोकरी मिळाली की पुरेसं होतं; परंतु आता तसं नाही. आता शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यात तफावत आहे, अंतर वाढत चाललं आहे. शिक्षणक्र म जरी तुम्ही पूर्ण केला तरी तुम्हाला आणखी एक गोष्ट तुम्हाला शिकावी लागणार आहे, ती म्हणजे समस्या सोडवण्याची क्षमता. तो प्रश्न कसा सोडवायचा हे कौशल्यही शिकून घ्यावं लागेल. यासाठीच ‘फॉल इन लव्ह विथ युअर प्रॉब्लेम!’ हा कानमंत्न लक्षात ठेवा. समस्या सगळीकडे आहेत. तुमच्या-आमच्या, प्रत्येकाच्या आवतीभोवतीच त्या आहेत. जगात सर्वत्न आहेत; परंतु प्रत्येक समस्या, संकट ही संधी असते. ती तुम्हाला शोधता आली पाहिजे. त्यासाठीच समस्येच्या, संकटाच्या प्रेमात पडायला हवं. ते कसं? तर जगाची व्याख्या जर ए असेल तर तुम्हाला ती बीदेखील असू शकते हे जाणवायला हवं. बी नावाचं जग हे ए नावाच्या जगापेक्षा अधिक सुंदर असू शकतं हे तुमच्या मनात भिनलेलं हवं. मग बी हे ए पेक्षा चांगले कसं हे शोधण्यासाठी तुम्ही जी धडपड करता, तुम्ही स्वतर्‍ला झोकून देता तो अनुभव खूप महत्त्वाचा असतो, तो खूप सुंदर असतो. कारण या प्रक्रि येतून जाताना तुम्हाला कोणत्याही परिस्थितीची भीती वाटणं थांबतं. त्या समस्येविषयी फारसा गंभीर, नकारात्मक विचारही मग तुम्ही करत नाहीत. इच्छा तिथं मार्ग. मग एक दिवस तुम्हाला तुमचं उत्तर सापडतं. भलेही ते चूक असू शकतं मात्र प्रत्येक क्षणी, प्रत्येक दिवशी तुम्ही नवीन काहीतरी शिकत असता. समस्येचं उत्तर शोधण्यासाठीची पुढची पायरी चढत असतात. काहीही झालं तरी मी शोधून काढीनच हे तुमचं ब्रीद बनतं. हेच तर गमक आहे समस्येशी दोन हात करण्याचं. मैत्नी करण्याचं. 

इनोव्हेशन!इनोव्हेशन म्हणजेच सृजनशीलता, नवकल्पनांचाच आविष्कार असतो. पण हा आविष्कार घडण्यासाठी किंवा घडवून आणताना तीन प्रमुख अडथळे मार्गात उभे ठाकण्याची शक्यता असते. पहिली समस्या म्हणजे तुम्ही कल्पना करताहेत त्यापेक्षा तुमच्या संकल्पना प्रत्यक्षात आणणं जास्त अवघड असू शकतं. दुसरी समस्या म्हणजे यासाठी तुम्हाला अपेक्षित वेळेपेक्षाही जास्त वेळ लागू शकतो. तिसरी समस्या म्हणजे, तुमच्या अंदाजापेक्षा जास्त आर्थिक पाठबळही लागू शकतं. हे तीनही अडथळे ओलांडून रस्ता पार केल्यावर पुन्हा तुमचे ध्येय गाठायचं हे सगळ्यात महत्त्वाचं. तुमचं व्हिजन इथं मदतीस धावून येतं. तुमची बदल घडवून आणण्याची आंतरिक ऊर्मी उपयोगी पडते. या अडथळ्यांच्या शर्यतीत तुम्ही पैशाचं नियोजन, सांघिक काम, तंत्नज्ञान शिकत जाता. पण त्यासाठी तुम्ही संकटांच्या प्रेमात आकंठ बुडालेले पाहिजे. तरच येणार्‍या संधी तुम्हाला संधी दिसतील.

 संधी

बदलते तंत्नज्ञान हे संकटातून संधीचा सर्वात प्रमुख स्रोत ठरू शकतो. गत 40-50 वर्षामध्ये माहिती-तंत्नज्ञान क्षेत्नात आमूलाग्र बदल झालाय, तो यापुढेही वेगाने होतच राहाणार आहे. त्यामुळे तंत्नज्ञानातून संधी शोधायला शिका. मोबाइलचं, इंटरनेटचंच उदाहरण घ्या. एकेकाळी चैनीच्या, महागडय़ा समजल्या जाणार्‍या या गोष्टी अत्यंत माफक दरात आज जगाच्या कानाकोपर्‍यात उपलब्ध आहेत. त्याचा परिणाम काय झाला? तर त्यातून नवीन संधी निर्माण झाल्या आहेत. या प्रगत तंत्नज्ञानाचा उपयोग करून एखाद्या समस्येवर उपाय शोधून काढण्याचे पर्याय शोधले पाहिजे. यासंदर्भात मुंबईच्याच बी.टेक विद्याथ्र्याचं उदाहरण सांगतो. मुंबईत सतत ट्रॅफिक जाम, खराब रस्ते ही समस्या भेडसावते. त्यामुळे काही वेळेस रुग्णवाहिका पोहोचण्यास उशीरही होतो. साहजिकच  रुग्णास उपचार मिळण्यासही विलंब होतो. या समस्येवर तोडगा म्हणून या विद्याथ्र्यानं मुंबईत चारचाकी सेवा देणार्‍या ऑनलाइन कंपन्यांच्या चालकांनाच मेडिकल किट देऊन त्यांना प्रशिक्षित केल. जेणेकरून उपचार योग्य वेळेत मिळतील. लव्ह फॉर मेकिंग अ डिफरन्स. ही धडपडच नवी संधी शोधू शकते.

सोपं करणं अवघड असतं!हे काय, मी पण करू शकतो, असं म्हणून काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो; पण ती गोष्ट सगळे करूच शकतील असं नाही. आयुष्यात गोष्टी सहज सोप्या करणं अवघड असतं. प्रत्यक्षात ती गोष्ट साध्य करताना खूप मेहनत, कष्ट लागतात. म्हणून थांबू नका. काम करत राहा. जोर्पयत  गोष्ट सोपी होत नाही तोर्पयत काम करा. बिग व्हिजन, सिंपल स्टेप्स हे तंत्न त्यासाठी वापरा. व्हाइट स्पेस हवीच.एक काळ होता की माझ्याकडे सहा महिने काम नव्हतं. ही व्हाइट स्पेस, हेच सहा महिने माझ्यासाठी खूप सृजनशीलतेचे ठरले. कारण या सहा महिन्यांमध्येच मी पूर्वी काय करत होतो आणि भविष्यात काय करता येईल याचा विचार करू शकलो. दर पाच-सहा वर्षानी अशी व्हाइट स्पेस निर्माण करतोय. काहीतरी वेगळं करण्याची जिद्द या स्पेसनेच दिली.

नेटवर्किगनवनवीन कल्पना सुचल्या की त्या तुमच्या समविचारी मित्नांशी शेअर करा. आपली कल्पना दुसरा कोणी वापरेल या मानसिकतेतून बाहेर पडा. कारण तुमच्या कल्पनेवर तुम्ही एकटे पाच-सहा वर्षे जरी काम करत राहिलात तरी यशस्वी व्हालच असं नाही. त्यासाठी समविचारी सहकार्‍यांचं नेटवर्कतयार करा. तुमची संकल्पना पुढच्या स्टेपवर पोहोचण्यासाठी हे एकत्रित प्रयत्न मदत करतील. तुम्हाला मॅनेजमेंट स्किलही शिकवून जातील.

शब्दांकन - सारिका पूरकर-गुजराथी