शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

सोशल मीडियात पडीक असता? मग तेच तुमचं करिअर होऊ शकतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 12:56 IST

दीड जीबी जाळण्याचा जमाना गेला. आता सोशल मीडिया वापरून उत्तम व्यवसाय आणि रोजगार संधी कमावता येऊ शकतात.

ठळक मुद्देसोशल मीडिया मार्केटिंग: ‘व्यसन’ हाच जॉब!!

अतुल कहाते

समाजमाध्यमांनी आपल्याला पुरता विळखा घातला आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम वगैरेसारखी समाजमाध्यमं सगळे सर्रास सतत वापरत असतात. कित्येक जणांना तर त्यांचं अक्षरशर्‍ व्यसन लागल्याचं दिसतं. याचाच अर्थ लोकांचा जास्तीत जास्त वेळ याच समाजमाध्यमांमध्ये जात असतो. त्यातही तरुणांचा. त्यांच्या वापराची एकदा चटक लागली की ती सुटणं फार कठीण असतं. तरुणांमध्ये असलेली त्याची क्रेझ आणि चटक याची जाणीव राजकारण्यांपासून कंपन्यांर्पयत सगळ्यांनाच आता झालेली असल्यामुळे अत्यंत आकर्षकपणे आपली जाहिरात समाजमाध्यमांवर करण्यासाठी एकच चढाओढ सुरू असते. यासाठी खास तज्ज्ञही नेमले जातात. एकूणच छापील माध्यमापेक्षा लोक या डिजिटल माध्यमांकडे मोठय़ा प्रमाणावर वळत असल्यामुळे जाहिरातींचा ओघही डिजिटल माध्यमांकडे वळताना दिसतो. अत्यंत हुशारीनं या माध्यमांचा वापर करून इतरांना खोटं ठरवण्याचे प्रकार डोनाल्ड ट्रम्पसकट अनेक देशांच्या नेत्यांकडून वारंवार होताना दिसतो. या माध्यमांवर सर्वसामान्य लोकही असल्यामुळे कंपन्यांनाही थेट त्यांच्यार्पयत आपले विचार, आपल्या उत्पादनाविषयीची माहिती, नवनव्या घडामोडींचे तपशील हे सगळं सहजपणे पोहोचवता येतं. पृथ्वीवरच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळपास एक तृतियांश लोक ही समाजमाध्यमं वापरतात. तसंच नवी पिढी अगदी लहानपणापासूनच ही समाजमाध्यमं वापरत असल्यामुळे भविष्यात त्यांचा वापर आणखी वेगानं वाढत जाईल याविषयी अजिबातच शंका घेण्याचं कारण नाही. साहजिकच समाजमाध्यमांचा वापर इथून पुढे आणखी वेगानं वाढत जाईल. लोकांना पारंपरिक माध्यमांपासून दूर खेचून आपल्याकडे ओढण्यासाठी जे शक्य आहे ते ही समाजमाध्यमं करत राहतील. ठिकठिकाणच्या निवडणुकांवर आता समाजमाध्यमांचा मोठा पगडा बसत चालल्याचंही आढळून येतं. स्वाभाविकपणे समाजमाध्यमांची पकड आपल्या हाती ठेवण्यासाठी जो तो धडपडणार हे निश्चित!आता सगळ्याच कंपन्या आपल्या जाहिरातींसाठी मोठय़ा प्रमाणावर समाजमाध्यमं वापरतात. राजकारणी लोकांपासून समाजावर प्रभाव असणारे अनेकजण ट्विटरवरून आपली मतं मांडतात आणि आपल्या विरोधकांना जेरीला आणण्याचा प्रयत्नही त्याच माध्यमावरून करतात. कित्येक लोकांचं ‘वाचन’ फक्त समाजमाध्यमांवर होतं. अनेक कंपन्यांची ग्राहकसेवा आता समाजमाध्यमांद्वारे पुरवली जाते. सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्रिपदी असताना रेल्वे प्रवाशांच्या ट्विटरवरून केलेल्या तक्र ारींची दखल त्यांच्या मंत्नालयाकडून वेगानं घेतली जात असल्याचं दिसून आलं होतं. अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर फक्त ट्विटरवरूनच संवाद साधतात. आपल्या पंतप्रधानांनीसुद्धा मुख्यत्वे ट्विटर आणि रेडिओवरचं भाषण या माध्यमांतूनच गेली पाच वर्षे जनतेशी संपर्क साधला आहे. एकूणच समाजमाध्यमांची ताकद सगळ्यांच्या लक्षात आलेली असल्यामुळे त्यांचा वापर आपल्या वैयक्तिक हितासाठी करून घेण्याकडे बहुतेक जणांचा कल दिसतो. या समाजमाध्यमांच्या रूपामध्ये कालानुरूप बदल होतीलच; पण ‘समाजमाध्यम’ ही संकल्पना मात्न दीर्घकाळ टिकून राहील असं दिसतं.

संधी कुणाला?

समाजमाध्यमांची ताकद ओळखून त्यांचा सुयोग्य वापर करू शकणार्‍या लोकांची गरज खूप मोठय़ा प्रमाणावर सगळीकडे जाणवते. कमी शब्दांमध्ये आणि चित्नं/व्हिडीओ यांचा वापर करून लोकांच्या मनावर आपल्याला हव्या असलेल्या प्रतिमा ठसवण्याचं कसब साधू शकणारे तरुण यात उतरू शकतात. त्यासाठी फार तांत्रिक ज्ञान मिळवण्याची गरज नसते. काही प्रमाणात जाहिरातींच्या क्षेत्नासारखं हे क्षेत्न आहे असं आपण म्हणू शकतो. ज्यांना याच्या पुढे जाऊन या क्षेत्नात काहीतरी करायचं आहे त्यांना ‘सोशल मीडिया मार्केटिंग’शी संबंधित असलेले अभ्यासक्र म करता येतील. उदाहरणार्थ आपलं उत्पादन फेसबुकवर अधिक ठळकपणे कसं झळकवायचं यासाठी फेसबुक काही गोष्टी उपलब्ध करून देतं. 

स्कोप काय?सोशल मीडिया वापरातले बारकावे शिकून घेतले की समाजमाध्यमं आणखी प्रभावीपणे वापरण्याच्या युक्त्या समजतात. काही अभ्यासक्र म खासगी संस्था चालवतात आणि शिवाय ऑनलाइन माध्यमातूनही असे अभ्यासक्र म पूर्ण करता येतात. या प्रकारची कौशल्यं आता सगळ्याच प्रकारच्या कंपन्यांना लागत असल्यामुळे त्यातून रोजगाराच्या संधी मिळू शकतात. स्वतंत्र सोशल मीडिया मार्केटिंग, कंटेट जनरेटर, सोशल मीडिया मॅनेजर म्हणून कामंही मिळू शकतात. मात्र हे काम अजूनही नवीन आहे त्यामुळे पदवीपेक्षा प्रयोग आणि कल्पकतेला अधिक महत्त्व आहे.