शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
"याला तर तडीपार करायला हवं…"; निवडणूक निकालापूर्वी माधवी लता ओवेसींवर भडकल्या, काय घडलं?
3
पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
4
ब्लू, ग्रीन, व्हाईट, पिंक...; WhatsApp होणार रंगीबेरंगी, लवकरच येणार 'हे' भन्नाट फीचर
5
'मेरा सामी...' पुष्पा 2 चं कपल साँग रिलीज; रश्मिका-अल्लू अर्जुनचा हटके डान्स एकदा पाहाच
6
“काही ठिकाणी निवडणुका जिंकल्यावर काँग्रेसने EVMवर शंका घेतली नाही”; अमित शाह यांनी सुनावले
7
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट, 'या' रकमेच्या ट्रान्झॅक्शनसाठी SMS येणार नाही
9
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधींचा घोटाळा झाला, प्रशासक नेमा; राजू शेट्टींची मागणी
10
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
11
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
12
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
13
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
14
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
16
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
17
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
18
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
19
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
20
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!

इको-फ्रेण्डली कपडे, फॅशनच्या दुनियेतला हा नवा  ट्रेंड काय म्हणतोय ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 3:23 PM

कपाटात कपडय़ांचा ढीग आणि घालायला कपडे नाहीत, अशी अवस्था तशी नवी नाही; पण आता खिशाची ताकद कमी झालेलीच आहे तर जरा आपल्या कपडय़ांनाही शिस्त लावू.

ठळक मुद्देकपडय़ांचा ढीगही पर्यावरणाला घातकच आहे.

- भाग्यश्री मुळे

कोरोनाने तसं म्हणायला आपल्याला भानावरच आणलं.पर्यावरणाची यानिमित्तानं चर्चा झाली. सक्तीच्या लॉकडाऊनमध्ये आपलंच कपाट आवरताना अनेकांना समजलं की, केवढे कपडे घेतो आपण? याची खरंच काही गरज होती का?अनेकांनी ठरवलं की आपली जीवनशैली पर्यावरणस्नेही करण्यावाचून पर्याय उरलेला नाही.त्याचं अजून एक कारण म्हणजे खिसा रिकामा. आता अनेकांकडे फार पैसेही उरले नाहीत, दरमहा जास्तीचे खर्च करायला.  आताच पाहा ना, पर्यावरणाने दणका दिलाच आहे. व्हायरसने जगभरातल्या माणसांना पळायला पृथ्वी शिल्लक ठेवली नाही.आता तर चर्चा अशीही आहे की जागतिक कार्बन उत्सर्जनास अतिरेकी फॅशनही जबाबदार आहे.अतिरिक्त कपडे, सौंदर्यप्रसाधनं वापरणं, ती पाण्यात सोडणंही घातक आहे.फॅशन जगतातील आपल्या आवडीनिवडी क्लायमेट चेंजला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे आता आपण भारंभार कपडे घ्यायचे की नाही याचाही विचार करायला हवा.आपण आपल्या कपडय़ांबाबत पुनर्वापर, जुन्यापासून नवे आणि  दीर्घकाळ वापरणं अशा सूत्रंचा अंगीकार करायला हवा.त्यासाठी काही खास अशा गोष्टी आपण करू शकतो. 

1. सर्वप्रथम ठरवावं की कपडय़ांची खरेदी खरंच गरजेची आहे का?2. आपल्याकडे नसली तरी परदेशात व्हिंटेज दुकानं असतात. त्यामुळे अगदी खरेदी करायची झाली तर तिथूनही करता येईल.3. कपडे पुरवून, नीट धुऊन वापरता येतील. साठवण्याची गरज नाही.4. तसेही आता अवस्था अशी आहे की कपाटातील कपडे इंच इंच जागेसाठी भांडू लागले आहेत. 5. तो कपडा घालेर्पयत ती फॅशन  निघून जाऊन दुसरी फॅशन तिची जागा घेत आहे. त्यामुळे आउट ऑफ फॅशनच्या कपडय़ांचे ढीग दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. 6. कापडाचा कचराही वाढत आहे.7. त्यामुळे फॅशन, ट्रेण्डप्रमाणो कपडे न घेता आपल्या बजेटनुसार, दीर्घकाळ टिकणारे, साधे कपडे खरेदी करण्यावर आपण भर दिला पाहिजे.8. आपल्याला नको असलेले कपडे उत्तमरीतीत असतील तेव्हाच मित्रंना, गरजूंना देऊन टाकणं. 9. तुम्ही तुमचे कपाट पर्यावरणस्नेही करू शकता. शिवाय यामुळे नकळत आर्थिक बचतही झालेली असेल. 10. आणखी एक पर्याय म्हणजे कपडय़ांचा पुनर्वापर. आपल्या घरातील जुन्या कपडय़ांपासून कुशन कव्हर, पायपुसणो, दुपटे, बस्कर अशा अगणित वस्तू तयार करता येतीलच.11. आपल्या जुन्या कपडय़ांपासून थोडे कौशल्य वापरून नवीन कपडे तयार करू शकतो. पांढ:या शर्टवर तुम्ही भरतकाम, रंगकाम करू शकता, रंगीत कपडय़ांचे तुकडे वापरून नक्षी तयार करू शकता. 12. आई किंवा आजीची भरजरी साडी घेऊन तुम्ही टोप, ड्रेस तयार करू शकता. पैसेही वाचतील, आणि मायेचं कापडही सोबत असेल.

( भाग्यश्री मुक्त पत्रकार आहे.)