शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

हुंडा तरुण मुलांना हवाच असतो का?

By admin | Updated: January 29, 2016 13:37 IST

एरवी स्वतंत्र, डॅशिंग, बिन्धास्त आणि निडर असलेले तरुण ‘हुंडा नको’ असं का म्हणत नाहीत? का ते वडीलधा-यांच्या मागे लपतात आणि हुंडा घेऊन लग्न करतात?

हुंडा द्यायला पैसे नाहीत या कारणापायी बहिणीचं लग्न मोडलं.
हे दु:ख सहन न झाल्यानं नांदेडमधल्या 19 वर्षाच्या सतीश कामतने आत्महत्त्या केली.
***
लातूर जिल्ह्यातली 18 वर्षाची मोहिनी भिसे. तिच्यासाठी घरचे स्थळं पाहत होते. नव-यामुलाकडची मंडळी हुंडा म्हणून 4 ते 5 लाख रुपये मागत. दुष्काळपायी घरात आर्थिक चणचण. मुलीचं लग्न जमत नाही म्हणून वडील हताश. शेवटी त्यांनी शेती विकण्याचा निर्णय घेतला. आपल्यामुळे घरादारावर हे संकट कोसळणार या काळजीनं या मुलीनं राहत्या घरात गळफास लावून आत्महत्त्या केली. माझ्या मृत्यूनंतर धार्मिक विधींवरसुद्धा पैसे खर्च करू नका, आणि ही दु:खदायक हुंडा प्रथा संपवा, अशी तिनं चिठ्ठी लिहून ठेवली.
***
गेल्या आठवडय़ातल्या या दोन बातम्या तुम्हीही वाचल्या असतील.
त्या वाचून निव्वळ हळहळ किंवा फार तर दु:ख व्यक्त करण्यापेक्षा स्वत:लाच काही प्रश्न विचारायला हवेत.
विशेषत: तरुणांनी. 
कारण मुलींचा हुंडय़ापोटी छळ, हुंडय़ापायी आत्महत्त्या या गोष्टी आजही आपल्या समाजात सर्रास घडतात. मुली त्या छळाच्या कहाण्या सांगतात. हुंडाबंदी असूनही आपल्या समाजात आजही हुंडा दिला घेतला जातोच. हुंडा नको फक्त मुलीच्या अंगावर काय ते घाला आणि लगA थाटामाटात, आम्हाला साजेसं करून द्या असं म्हणणारे आणि आम्ही मुलीकडच्यांकडून काहीही घेतलं नाही, आम्हाला काहीही नको, आमच्याकडे काय कमी आहे असा टेंभा मिरवणारे सुशिक्षित आपल्या आसपास भरपूर आहेत.
त्यात त्यांची तरुण मुलंही आलीच. ही तरुण मुलं एरवी स्वतंत्र असतात. पण लगAात मुलगी एकदा पसंत केली की बाकीचे निर्णय ते आपल्या घरच्यांवर सोपवतात आणि लगA ठरवण्याच्या बैठकीत गप्प बसतात. काय ते घेणंदेणं करा म्हणत निमूट बोलणी होऊ देतात.
असं का करतात हे आजचे शिकले-सवरलेले, सुशिक्षित आणि स्वतंत्र तरुण?
की ‘हुंडा’ या तरुण मुलांनाही हवाच असतो.
आणि आपण लगA करतोय त्या मुलीशी, तिला उपकृत करतोय तर हुंडा घ्यायलाच हवा, असं आजही तरुण मुलांना वाटतंच. आणि म्हणून ते हुंडा सर्रास घेतात आणि त्याचं त्यांना काही दु:ख, खेद, अपराधभाव वाटत नाही!
किंवा असं होतं का, की लगA करताना वडीलधा:यांसमोर काही चालत नाही, समाज-नातेवाईक यांच्यासमोर मान तुकवावीच लागते.
पण मग तसं असेल तर एरवी विरोध करण्याची हिंमत असणारे तरुण याचवेळी अशी माघार का घेतात?
- असे अनेक प्रश्न आहेत.
आपण बोलू त्याविषयी मोकळेपणानं आणि थोडं, स्पष्ट. स्वच्छ आणि रोखठोकही!
त्यासाठीच ही चर्चा.
तरुण मुलांच्या मनातलं जाणून घ्यायचा एक प्रय}.
 
- ऑक्सिजन टीम
 
 
तरुण मुलांचा
 अनुभव काय सांगतो?
 
एरवी स्वतंत्र असणारी, वडीलधा:यांना न जुमानणारी, आणि आपलं तेच खरं करणारी तरुण मुलं लगA-हुंडा-देणीघेणी याचवेळी कशी काय एकदम ‘घरचे म्हणतील ते’, ‘घरच्यांचं ऐकायला हवं’ या मोडवर जातात?
नेमका हुंडा मागतानाच वडीलधा:यांविषयीचा हा सोयिस्कर आदर कसा काय निर्माण होतो?
की ही सोय असते?
मिळतो आहे पैसा तर घ्या, कशाला नाही म्हणा?
जितका जास्त हुंडा तेवढी समाजात जास्त पत? तेवढा आपल्याला जास्त भाव आणि तेवढे आपण अधिक कर्तबगार असं  तरुण मुलांना वाटतं का?
हुंडा घ्यावाच लागतो असं काय कम्पलशन तरुण मुलांवर असतं?
म्हणून हे तरुण मुलांसाठी काही प्रश्न की, नेमके हुंडा घेतानाच तुम्ही इतके हतबल का असता? की स्वत:हून सोयिस्कर हे हतबल असणं स्वीकारता?
 
तरुण मुलांवर कसली सक्ती?
तुम्ही मुली पाहत असाल
किंवा नुकतंच तुमचं लग्न ठरलं असेल,
किंवा झालंही असेल,
तुमचं नाही तर मित्रंचं,
तुमच्या ग्रुपमधल्या इतर मुलांचंही लग्न ठरलं असेल,
झालं असेल, पण हुंडा घेऊन!
का घेतलात तुम्ही हुंडा?
घरच्यांचं तुमच्यावर असं काय प्रेशर होतं?
हुंडा नको असं का म्हणता येत नाही?
हुंडा नको, फक्त लगA करून द्या असं म्हणत मुलीच्या वडिलांना आठ-दहा लाख रुपये किमान खर्च करायला भाग पाडणं हे तुम्हाला का अयोग्य वाटत नाही आणि त्याला नकार का देता येत नाही?
हुंडा नको म्हणणा:या मुलात दोष असेल असं खरंच मुलीकडच्यांना वाटतं का? तुमचा असा काही अनुभव आहे का?
की अजूनही हुंडा घेणं हा आपला हक्क आणि मुलीच्या वडिलांनी सगळा खर्च करणं हे त्यांचं कर्तव्यच आहे असं तुम्हाला वाटतं?
हुंडा न घेता, दोन्हीकडचा खर्च दोघांनी मिळून केला असं काही उदाहरण आहे का तुमच्या आसपास? आणि नसेल तर ते का नाहीये असं तुम्हाला वाटतं?
 
***
या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं लिहाल?
तुमचा अनुभव लिहा. तुमच्या वाटय़ाला खरंच 
घुसमट आली असेल तर ते लिहा.
किंवा
हुंडा घ्यायलाच हवा, त्यात काय एवढं असं 
जरी तुमचं मत असेल तर तसं लिहा.
तुमच्या मनात हुंडय़ाचा नेमका काय विचार आहे ते सांगा.
कदाचित त्यातून खूप प्रश्नांची उत्तरं कळतील आणि काय सांगावं
आजवर कुणालाही न समजलेले 
उपवर तरुण मुलांचे प्रश्नही सगळ्यांसमोर येतील.
मनापासून लिहा.
पत्रवर नाव घालायचं की नाही हा निर्णय तुमचा.
पत्ता- नेहमीचाच, शेवटच्या पानावर तळाशी.
अंतिम मुदत- 1क् फेब्रुवारी 2क्16
पाकिटावर
हुंडा
असा उल्लेख करायला विसरू नका.