शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

नास्ता करताय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 14:41 IST

नास्ताच करत नाही, सकाळी बराच वेळ उपाशी राहता मग तुमच्या कंबरेचा घेर वाढणारच..

- निकिता राणे

तुम्ही नास्ता करता का?रोज करता का?- नसाल करत तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. जे लोक नास्ता करत नाहीत त्यांचं वजन झपाट्यानं वाढतं, ते लवकर लठ्ठ होतात. आणि त्यांचा कंबरेचा घेरही इतरांपेक्षा जास्त मोठा असतो..हे ऐकून धक्का बसेल; पण आपलं वजन जर वाढलेलं असेल तर त्याचं कारण आपण कायमच न केलेल्या नास्त्यात आहे हे समजून घ्या. मुख्य म्हणजे नास्ता केला, भरपूर खाल्लं म्हणून हे वजन वाढलं असं नाही तर उपाशी राहिल्यानं वाढलं हे जास्त दुर्दैवी आहे...आठवून पहा, आपल्याला रोजच घाई असते. सकाळी उशिरा उठायचं, मग आवरायची घाई. वेळेवर पोहचायची घाई, सकाळी खावंसंच वाटत नाही हा स्वत:च मनाशी केलेला भ्रम अशी अनेक कारणं असतात. त्यातून नास्ता करणं मात्र राहून जातं.पण अमेरिकेतल्या मायो क्लिनिकने २०१५ ते २०१७ या वर्षांत केलेल्या ओबेसिटीच्या अभ्यासाचा निष्कर्ष मात्र काहीतरी वेगळंच सांगतो. या अभ्यासात ओबेसिटीची कारणं आणि लोकांच्या सवयी असाही एक अभ्यास झाला. त्यात असं दिसून आलं की, जे लोक नास्ता करतात त्यांचं वजन झपाट्यानं वाढत नाही, त्यांच्या कंबरेचे घेरही झरझर वाढत नाहीत. उलट जे नास्ता करतच नाहीत ते वेगानं जाड होतात. बराच वेळ उपाशी राहणं आणि मग एकदम भरपेट जेवणं यातून शरीरात चरबीसंचय वेगानं होत असावा असा या अभ्यासाचा तर्क आहे.यात पुन्हा स्त्रीपुरुष असा भेद नाही. म्हणजे जाड होण्याचा वेग स्त्रीपुरुष दोघांचाही सारखाच दिसतो.त्यामुळे आता हे क्लिनिक ब्रेकफास्ट करा, सकाळी उठल्यावर अर्धा तासापेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नका, असा प्रचार करतं आहे.यावरून आपल्या वजनवाढीचा विचार करायचा तर ज्यानं त्यानं स्वत:लाच विचारलं पाहिजे की, आपण सकाळी नास्ता करतो का?नास्ता न केल्याचा संबंध मूड बिघडण्याशी, मूड स्विंगशी असतोच; पण तो वजनवाढीशीही असतो हे लक्षात ठेवलेलं बरं.