शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

भिजून विरलेलं नातं..

By admin | Updated: August 1, 2014 11:40 IST

नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो.

नेमका दिवस आठवत नाही. पण सकाळपासून रिमझिम सुरू होती. आदल्या दिवशी आमचं कडाक्याचं भांडण झालं होतं. प्रचंड उदास आणि अस्वस्थ होतो. तिला फोन केला तर तिचीही तशीच गत होती. तिला म्हणलो भेटायचंय तुला ती पण लगेच हो म्हणाली. नेहमीच्या  आईस्क्रीम पार्लरवर गेलो. ती आली. पण पार्लर बंद होतं. आमच्यामधील शांतता भयाण. तिला म्हणलो, ‘चल   लाँग ड्राइव्हला जाऊ.’ ती पण तयार झाली. तिच्या स्कूटीवर मी पुढे आणि ती मागे. ती माझ्यामागे बरंच अंतर ठेवून बसली होती. ते आमच्या नात्यामध्ये पडत चाललेलं अंतर होतं. फिरताना हळूहळू बोलायला लागलो आणि पावसात भांडण विरघळून गेलं. भर पावसात रस्त्यावर आमचीच गाडी.  पेट्रोल संपेपर्यंत खूप फिरलो. 
पावसाला त्यावेळी खूप धन्यवाद दिले. आधीच आवडणारा पाऊस त्यावेळी जिगरी दोस्त वाटू लागला. आमच्या नात्याला नवसंजीवनी मिळाली होती.
पण आता परिस्थिती बदलली आहे. त्यानंतर आमचं ब्रेकअप झालंच. त्यालाही आता दोन वर्षं झाली आहेत. ती कुठं आहे मला माहीत नाही. तिच्या आठवणी मी खोलवर पुरून टाकल्या आहेत. पण हा पाऊस आला की त्या आठवणी उफाळून येतात. कधीकाळी जिगरी असलेला पाऊस जानी दुश्मन वाटायला लागतो. पाऊस आला की मनात उदासी भरते. पावसाबरोबर डोळेही अखंड बरसू लागतात. तोंड लपवून मी खूप रडतो.
आता पावसात भिजणं टाळतो. पाऊस आला की दारं-खिडक्या लावून अस्वस्थपणे एकांतात बसून रहातो. पाऊस पडलाच नाही तर बरं असं वाटतं.  निदान माझ्या परिसरात तरी त्यानं पडूच नये, अशी भाबडी आशा करतो. 
पण पावसात आजही एकच प्रश्न छळतो, या पावसासोबतच तिलाही माझी आठवण येत असेल का? 
- किरणकुमार, पुणे