शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...धिस इज व्हॉट आय हॅव टू डू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2018 12:12 IST

'आय वॉज होमलेस, बट आय टोल्ड हर, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !’ मला डान्सरच व्हायचं होतं. पण आईचं एकच पालूपद. कॉलेजात जा, शिक.

- जेनीफर लोपेझ

‘आय वॉज होमलेस, बट आय टोल्ड हर, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !’ मला डान्सरच व्हायचं होतं. पण आईचं एकच पालूपद. कॉलेजात जा, शिक. माझं शिकण्यात काही मन रमत नव्हतं, ना डोकं चालत होतं. खूप वाद झाले. शेवटी मी घरातून बाहेर पडले. राहणार कुठं? काही सोयच नव्हती. त्यात माझं स्वप्नही छळायचं. मला फुलटाइम डान्सरच व्हायचं होतं. एका डान्स स्टुडिओत मला नोकरी लागली. कशीबशी. साधीशीच; पण त्यांनी मला त्या स्टुडिओत राहायची परवानगी दिली. म्हणजे काय तर स्टुडिओतल्या सोफ्यावर मी रात्री झोपत असते. आईला ते कळलं, वाईट वाटलं. पण मी तिला स्पष्टच सांगितलं की, हाल होताहेत माझे; पण हेच मला करायचं आहे. धिस इज व्हॉट आय हॅव टू डू !काही महिन्यांनतर मला डान्सिंग जॉब मिळाला. थेट युरोपात. मी तिकडे गेले. नाचले. शिकले. वर्षभरात परत आले तर मला ‘इन लिव्हिंग कलर’ हा शो मिळाला. त्यातली मी प्लाय गर्ल झाले. लॉस एंजिलीसला राहायला गेले. एका वर्षात सारं बदलून गेलं. जगणंही. नशीबही.न्यू यॉर्कमधलं माझं आयुष्य साधंसुधं होतं, हॉलिवूडचं जग वेगळं. तिथला चकचकाट वेगळा. पण मी टिकले कारण त्या वर्षभरानं मला जे शिकवलं ते कायम सोबत होतं. जेव्हा जेव्हा अडले, अडथळे, संकटं आली. अपयश आलं किंवा मन हार मानायला लागलं तेव्हा तेव्हा मी आईला सांगितलेलं वाक्य स्वत:ला सांगते, धिस इज व्हॉट आय हॅव टू डू!(गायिका, हॉलिवूड अभिनेत्री, निर्माती आणि जगातल्या अत्यंत श्रीमंत महिलांपैकी एक)