शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
2
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
3
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
4
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
5
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
6
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
7
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
8
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
11
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
12
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
13
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
14
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
15
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
16
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
17
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
18
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
19
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचा डिटॅचेबल ड्रेस, थर्टीफस्टसाठी नवा ड्रेसिंग फॉर्म्युला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 16:33 IST

दीपिकाचा रिसेप्शन ड्रेस पाहिला, यंदा न्यू इअर पार्टीसाठी ती बिंधास्त स्टाइल आपणही वापरू शकतो!

ठळक मुद्देडिटॅचेबल ड्रेस असं सर्च करा, भरपूर माहिती मिळेल. ते शिवूनही घेता येतात. त्यामुळे हवी तशी स्टाइल आपली आपण करूच शकतो.

- श्रुती साठे

दरवर्षी न्यू इअर पार्टीसाठी तरुण मुलामुलींचा थवा एका पार्टीमधून दुसर्‍या पार्टीसाठी जाताना आपल्याला दिसतोच दिसतो. मुली चक्क महिनाभर आधीपासून पार्टीसाठीच्या तयारीला लागतात. त्यात जर पार्टी तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही होस्ट असाल तर मग काय तयारीला अंतच नसतो. अशावेळी 2-3 ठिकाणी जायचं असल्यास तोच तोच एखादा ड्रेस नको वाटतो. हाय हिल्स घालायची हुक्की येतेच; पण मग पूर्णवेळ तेही नको वाटतात. पाय अगदी अवघडून जातात, मनाजोगं नाचता येत नाही. बरं हा प्रॉब्लेम फक्त आपलाच होतो असं नाहीये बरं का! खुद्द दीपिका पदुकोणसुद्धा याला अपवाद नाहीये. दीपिका आणि रणवीरचं लग्न, रिसेप्शन यांची जोरदार चर्चा झाली. सोशल मीडियावर तर त्यांच्या फोटोज आणि व्हिडीओज्चा पूर आला. त्यांचे कपडे अर्थातच खूप विचार करून निवडलेले होते- त्यामुळेच दीपिकाने केली अशी आयडिया आपल्या सगळ्यांनाच न्यू इअर पार्टीसाठी उपयोगी ठरणार आहे.दीपिका-रणवीरच्या मुंबईत झालेल्या रिसेप्शनमधला तिचा लाल रंगाचा ड्रेस अतिशय मोहक होता. झुहैर मुराद या सेलिब्रिटी डिझायनरची निर्मिती असलेला दीपिकाचा ड्रेस कुठल्याही मुलीसाठी ड्रीम ड्रेस नक्कीच असेल. या ड्रेसची खासियत म्हणजे त्याची डिटॅचेबल ट्रेन अर्थातच काढता येणारा घेर. दीपिका रिसेप्शनच्या सुरुवातीला या पायघोळ ड्रेसमध्ये सुरेख दिसली, या सोबत तिने मॅचिंग लाल रंगाच्या स्टिलेटोज म्हणजेच हाय हिल्सचा वापर केला. रिसेप्शननंतर डान्स फ्लोअरवर जाताना मात्न तिनं तोच डिटॅचेबल घेर काढून त्याचा शॉर्ट ड्रेस केला आणि चक्क पांढर्‍या रंगाचे स्नीकर्स घातले. ही डिटॅचेबल ड्रेसची कल्पना पार्टीसाठी नक्की वापरता येण्यासारखी आहे. एकाच ड्रेसमध्ये 2 वेगळे लूक्स तयार करा. आणि हो, डान्स फ्लोअरवर मनमोकळेपणानं नाचायचं असल्यास हिल्सला पर्याय म्हणून  तुमच्या बरोबर फ्लॅट्स, सॅण्डल्स किंवा स्नीकर्स शूजची जोडी नक्की असूद्यात.डिटॅचेबल ड्रेस असं सर्च करा, भरपूर माहिती मिळेल. ते शिवूनही घेता येतात. त्यामुळे हवी तशी स्टाइल आपली आपण करूच शकतो.