शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दीपिकाचा एअरपोर्ट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 08:33 IST

प्रवासात, फिरायला जाताना हे ट्राय करता येईल का?

- श्रुती साठेआता प्रवास म्हटलं की चांगले कपडे घालणं आलंच. पण चांगले घालण्याबरोबरच ते कम्फर्टेबलही असले पाहिजेत. मात्र फॅशनच्या नावाखाली तो ‘कम्फर्ट’ आपण जपतो का, हे पाहणं महत्त्वाचं असतं. अलीकडे एक नवीन फॅशन आपण पाहतोय. विशेषत: सेलिब्रिटींची. एअरपोर्ट लूक असं त्याचं नाव.बहुतांशी सेलिब्रिटीज किंवा विमानप्रवासाला सरावलेले लोक एअरपोर्टसाठी स्पोर्टी आणि स्मार्ट कॅज्युअल लूकला पसंती देतात (फार गरज असल्यास फॉर्मल लूकसुद्धा निवडला जातो). नीट पाहिलं तर लक्षात येईल, एअरपोर्टसाठी फार रंगीबेरंगी, प्रिंटची गजबज असलेले कपडे शक्यतो टाळले जातात. क्लासिक आणि सरधोपट असा काळा, पांढरा, करडा, निळा रंग विमानप्रवासात वापरला जातो.फॅशन जगतात सध्या मोनोक्र ोमची चांगलीच चलती आहे. हेच ध्यानात ठेवून दीपिका पदुकोणने अलीकडेच एक ब्लॅक स्वेट पॅण्ट आणि व्हाइट स्वेट शर्ट घातला. ही स्टाइल तिला अतिशय स्पोर्टी लूक देऊन गेली. यामध्ये तिने फॅशन आणि कम्फर्टची घातलेली सांगड उठावदार दिसते.दुसरं उदाहरण अनुष्का शर्माचं. व्हाइट क्रॉप टॉप आणि रीप्ड जीन्सवाला हा एअरपोर्ट लूक तरुणींनी ट्राय करून पाहायला हरकत नाही.अर्थात हे सारं ट्राय करताना काही गोष्टी लक्षात ठेवा..

* जॅकेट किंवा श्रग, एखादा स्टोल बरोबर ठेवणं उत्तम ठरते.* जीन्स किंवा लाउंज, स्वेट पॅण्ट वापरणार असाल पायात शूज मस्त दिसतात.* लेदरची हॅण्डबॅग किंवा बॅकपॅक उठून दिसते.* अगदी साधी हेअरस्टाइल करा. केसांचा बन किंवा पोनीटेल उत्तम.* हलकासा डिओड्रण्ट तुम्हाला नक्कीच कम्फर्टेबल करेल.* वेस्टर्न कपड्यांमध्ये कम्फर्टेबल नसाल, तर कॉटन किंवा लिननचा कुर्तासुद्धा सुरेख दिसतो.

 sa.shruti@gmail.com