शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

दत्तू -त्याच्या जिद्दीचा प्रवास सोपा कधीच नव्हता....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 15:07 IST

आशियाई स्पर्धेत आजारपणामुळे त्याचं वैयक्तिक पदक हुकलं; पण सांघिक प्रकारात त्यानं जिद्दीनं सुवर्ण पटकावलंच.

ठळक मुद्देखेडेगावात लहानाचा मोठा झालेला दत्तू. रिओ ऑलिम्पिकचं त्याचं पदक केवळ सहा सेकंदानं हुकल्यामुळे सार्‍या जगाला तो माहीत झाला.

- राकेश जोशी

दत्तू भोकनळ.  अंगात जिगर आणि मनात ऊर्मी असली की काय घडू शकतं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्तू.हातातोंडाची गाठ घालता घालता आणि परिस्थितीशी झगडताना मेटाकुटीला येत असताना गरीब घरातील दत्तू आंतरराष्ट्रीय पातळीवर काही कामगिरी करील असं कोणाच्याच ध्यानीमनी नव्हतं. त्याच्या गावातल्याच काय, पण घरातल्यांनाही तसं कधी वाटलं नव्हतं. कोणाला माहीत होता हा दत्तू? पण 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये नौकानयनात त्याचं पदक सहा सेकंदांनी हुकलं आणि दत्तू अख्ख्या दुनियेला माहीत झाला. त्यामुळेच आत्ता आशियाई स्पर्धेतही सार्‍या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या; पण त्याचं वैयक्तिक पदक हुकलं. सहाव्या क्रमांकावर तो फेकला गेला. अर्थात याचं कारण होतं त्याची तब्येत. ऐन स्पर्धेच्या वेळी तो आजारी पडला होता. त्याच्या अंगात ताप होता. यशानं त्याला हुलकावणी दिली.याच कारणामुळे दत्तूला सांघिक प्रकारातूनही संघाबाहेर ठेवण्यात येणार होते, पण जिद्दी दत्तू हार मानायला तयार नव्हता आणि संघ व्यवस्थापनाचाही त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे दुसर्‍याच दिवशी झालेल्या सांघिक नौकानयन स्पर्धेत दत्तूला सहभागी करून घेण्यात आलं आणि दत्तूनंही आपल्यावरील विश्वासाला मग तडा जाऊ दिला नाही. या संघानं सुवर्णपदक जिंकलं आणि भारताच्या खात्यावर आणखी एका सुवर्णाची नोंद झाली.पण दत्तूला कोणतंच यश सहजासहजी मिळालं नाही. त्याचा आजवरचा प्रवास कायमच संघर्षानं भरलेला राहिला आहे. तळेगाव रोही हे नाशिकच्या चांदवड तालुक्यातील जेमतेम दहा हजार लोकसंख्येचं गाव. गावात कोणत्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत. अशा वातावरणात वाढलेल्या दत्तूचा एकमेव आधार म्हणजे त्याचा स्वतर्‍वरचा विश्वास. आत्मविश्वास. त्याच बळावर त्यानं लहानपणीच आपल्या अंगावर पडलेल्या जबाबदार्‍या केवळ समर्थपणे पेलल्याच नाहीत, तर या आत्मविश्वासाचं, जिद्दीचं रूपांतर यशातही केलं.त्याचे प्राथमिक शिक्षण गावातीलच प्राथमिक शाळेत झालं. पाचवी ते बारावीर्पयतचं शिक्षण संत ज्ञानेश्वर विद्यालयात झालं. दहावीत असतानाच वडील वारले. कर्तेपणाची जबाबदारी अंगावर आलेल्या दत्तूनं मग ‘ज्येष्ठाची’ भूमिका पार पाडताना आईच्या मदतीने घरगाडा हाकला. मिळेल ते आणि पडेल ते काम करत घराचा गाडा हाकताना मेहनत आणि कर्तृत्वाच्या जोरावर 2012 मध्ये लष्करात नोकरी मिळवली. त्यावेळी त्याचं फारसं शिक्षणही झालेलं नव्हतं. सैन्य दलात असतानाच त्यानं बारावीची परीक्षा लासलगाव येथून दिली. लष्करात कठोर परिश्रम, चिकाटी, जिद्दीच्या बळावर त्यानं नुसते प्रशिक्षणच नव्हे तर पुणे येथे नौकानयनाचे धडेही तितक्याच एकाग्रतेने गिरवले. खरं तर लष्करात सरावाचा भाग म्हणून दत्तू बास्केटबॉल खेळायचा. मात्न त्याची उंची आणि शरीरयष्टी पाहून वरिष्ठांनी त्याला नौकानयन संघात समाविष्ट केले. इथूनच त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागलं. नौकानयन म्हणजे काय, ते कसं करतात, त्याचं तंत्र काय, यातलं ओ की ठो दत्तूला माहीत नव्हतं, पण लवकरच त्यानं ते सारं आत्मसात केलं. अंगातील शिस्तीमुळे थोडय़ाच काळात त्यानं त्यावर वर्चस्व मिळवलं आणि तो त्यात चांगलाच रमलाही. या खेळातील बारकावे, तांत्रिक गोष्टी त्यानं मेहनतीनं शिकून घेतल्या. त्याचा अर्थातच अपेक्षित परिणाम झाला आणि भल्याभल्यांना मागे टाकत 2014 साली त्याने राष्ट्रीय नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई केली. त्यानंतर 2015 साली चीन येथे झालेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत दत्तूने सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावलं. 2018च्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतही त्याने सुवर्णपदक पटकावले.आपल्या कर्तबगारीमुळे आज दत्तू सगळ्यांना माहीत झाला आहे; पण त्याचं बालपण फारच कष्टात आणि गरिबीत गेलं.5 एप्रिल 1991 रोजी तळेगाव रोही येथील गरीब शेतकरी कुंटुबात त्याचा जन्म झाला. वडील बबन. विहिरी खेादाईचे काम करायचे. आयुष्यभर काबाडकष्टाचेच दिवस पाहिल्याने ते आजारी पडले आणि त्यातच त्यांचा अंत झाला. दत्तू आणि आई आशा. यांच्यावरच मग सार्‍या कुटुंबाची जबाबदारी आली. त्यासाठी लवकरात लवकर काहीतरी कमाई करणं, घराला हातभार लावणं गरजेचं होतं. शारीरिक कष्टात कधीच माघार न घेतलेल्या दत्तूनं लष्करात प्रवेश मिळवला. आता आर्थिक आणि मानसिक चिंता मिटेल असं वाटत होतं; पण नशीब हात धुऊन दत्तूच्या मागं लागलं होतं.ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तूची तयारी सुरू होती. दत्तू कोरिया येथे फिसा अशिया अ‍ॅण्ड ओशियाना कॉण्टिनेण्टल ऑलिम्पिक क्वॉलिफिकेशन स्पर्धेसाठी रवाना झाला होता. त्याचवेळी आई (आशाबाई ऊर्फ अक्का) घरात पाय घसरून पडली. अपघात वरवर किरकोळ वाटत असला तरी तसं नव्हतं. मेंदूला मार लागल्याने आईला स्मृतिभंश झाला. कोणालाच ती ओळखू शकत नव्हती.  रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरल्याच्या आनंदात दत्तू जेव्हा आईला पेढा भरविण्यासाठी घरी पोहोचला तेव्हा आईनं दत्तूला ओळखलेच नाही. ज्या आईवर दत्तूचं जीवापाड प्रेम, वडील गेल्यानंतर जिनं आपलं पालनपोषण केलं, ती आई आपल्याला ओळखू शकत नाही याचं दत्तूला खूप दुर्‍ख झालं. हे दुर्‍ख उराशी बाळगत ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दत्तू रवाना झाला. ऐन ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान ही घटना घडल्यामुळे नाही म्हटलं तरी दत्तू विचलित झाला. अर्ध लक्ष सरावाकडे, स्पर्धेकडे आणि अर्ध लक्ष आईकडे, अशी त्याची अवस्था झाली होती. स्पर्धा संपल्या संपल्या दत्तू परत घरी आला. पण लवकरच आई वारली. जागतिक रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत अवघ्या 6 सेकंदांच्या फरकाने पदकाच्या शर्यतीमधून बाहेर पडावं लागल्याचं दुर्‍ख होतंच, त्यात आई गेली. पण त्यातून सावरत दत्तूने नव्या उमेदीने सुरुवात केली. यंदाच्या आशियाई क्र ीडा स्पर्धेत एकेरीच्या पदकानं त्याला हुलकावणी दिली; पण त्यामुळेच जिद्दीनं पेटून उठलेल्या दत्तूनं सांघिक प्रकारात देशाला सुवर्ण मिळवून देण्यात मोलाचा हातभार लावला. हे पदक माझ्या आईसाठी आहे असं दत्तू सांगतो. या पदकानं त्याला पुन्हा नवी उमेद मिळवून दिली आहे. आता त्याचं लक्ष लागलं आहे ते ऑलिम्पिककडे.(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीत उपसंपादक आहेत.)