शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कृषिक्रांतीचा कल्पक प्रयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 08:35 IST

अहमदनगरचे तीन तरुण. त्यांनी ठरवलं, शेतकऱ्यांच्या व्यथाकथांविषयी किती दिवस बोलणार? आपण त्यावर तोडगा काढायला हवा, त्यासाठी त्यांनी बनवली एक वेबसाइट जी शेतमालाची जाहिरात करतेय...

- साहेबराव नरसाळे

‘शेतकरी माल पिकवतो. बाजारात विकायला आणतो. पण, त्याला त्याच्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार नसतो. दलाल भाव ठरवतो. त्याबदल्यात दलाली घेतो. हमाली, मापाई शेतकऱ्याच्या माथी मारून व्यापारी नफा कमावतो; पण जो पिकवतो तो शेतकरी मात्र रिकाम्या हाताने परत जातो. त्याला नफा मिळत नाही. हे चित्र बदललं पाहिजे, असं मी लहानपणापासून ऐकतोय; पण परिस्थिती बदलली नाही. शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत, शेतकºयांच्या डोक्यावरील कर्जाचा भार उतरला नाही; त्याला सरकारी अनास्था जबाबदार आहे, अशी वाक्य सतत कानावर आदळत राहिली. सरकार विरोधात आंदोलने झाली. आजही होतात़ आंदोलनातून क्रांती होते हे शाळेत, महाविद्यालयात शिकवलं जायचं. पण, शेतीत का नाही क्रांती झाली? शेतकºयांची परिस्थिती का नाही बदलली?’- तो प्रश्नांचा भडीमारच करतो, कळकळीनं. खर ंतर मी त्याला साधा प्रश्न विचारला की, ही कृषिक्रांती नावाची वेबसाइट तू का सुरू केलीस, ही वेबसाइट, हे अ‍ॅप त्यानं नक्की काय बदलेल असं वाटतं?

त्यावर तो ही कथा मांडतो. ही कथा-व्यथा महाराष्टÑाला नवीन नाही, पण त्याचं वैशिष्ट हे की रडत न बसता त्यानं स्वत: काहीतरी करायचं ठरवलं. किरण अरुण सुपेकर हे त्या तरुणाचं नाव. अहमदनगरमधील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्ट्स महाविद्यालयातील एक तरुण शिक्षक़ बीबीए (सीए) विभागात असिस्टंट प्रोफेसर आहे़ रोजच संगणकाशी खेळणं, विविध अ‍ॅप्लिकेशन्स तयार करणं हे त्याचं काम़ हे काम करता करता त्यानं शेतकºयांसाठी कृषिक्रांती नावानं वेबसाइट आणि अ‍ॅप तयार केलं. ज्याचे आज सुमारे तीन लाख वापरकर्ते आहेत़

नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट हे त्याचं मूळ गाव़ तो वडिलोपार्जित शेतीत रमणारा़ शेतीतून पीक काढलं की ते बाजार समितीच्या दारात नेऊन मांडायचं आणि दलाल त्याचा भाव ठरवणार, व्यापारी विकत घेणाऱ पण बापानं या सौद्यात काही बोलायचं नाही, हे किरणनं पाहिलं होतं़ किरण सांगतो, आपण जे शिक्षण घेतलंय, त्याचा वापर करून शेतकºयांसाठी काय करता येईल, असा विचार मी रोज करत होतो़ फॅक्टरीत तयार होणाºया प्रत्येक मालाची जाहिरात होते़ जाहिरात पाहून लोक वस्तू विकत घेतात़ पण शेतकºयाच्या कांद्या-बटाट्याची कधी जाहिरात पाहिली आहे का? शेतीसाठी वापरला जाणाºया युरियाची जाहिरात असते, पण शेतकºयाच्या टमाट्याची कधी जाहिरात वाचली का? मग वाटलं असं काहीतरी केलं पाहिजे की शेतकरीच त्याच्या मालाचा भाव ठरवेल. तो कोणाला दलाली देणार नाही़ शेतकºयाच्या मालाचीही जाहिरात होईल़ मी कामाला लागलो. प्रारूप तयार झालं; पण ते प्रत्यक्षात येण्यासाठी मोठा खर्च होता. मला अशी वेबसाइट तयार करायची होती, जेथे शेतकरी त्यांच्या कांद्या-बटाट्याची जाहिरात फुकट टाकील आणि ग्राहक त्या शेतकºयाला थेट संपर्क करून त्याच्याकडून माल खरेदी करेल़ हा सरळसरळ शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीचा प्रकाऱ दलालाची गरजच नाही़ वेबसाइट तयार करण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून मग मीच ती तयार केली. ही वेबसाइट यूझरफे्रण्डली असेल आणि मोबाइलवर सहज रन होईल हे माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. साधारण सहा महिने त्यावर काम केले़ आणि या कृषिक्रांती वेबसाइटचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते केलं. या वेबसाइटचे आज सुमारे तीन लाख वापरकर्ते आहेत.’

कृषिक्रांती वेबसाइटवर लॉगइन केलं की शेतीशी संबंधित कोणत्याही सामग्रीची जाहिरात मोफत अपलोड करता येते़ याबाबत शेतकºयांना जसजशी माहिती मिळत गेली तसेतसे शेतकरी या वेबसाइटवर यायला लागले़ धान्य, फळे, भाजीपाला, जमीन, पशुधन आणि शेती उपयुक्त साहित्य अशा अनेक गोष्टींच्या जाहिराती शेतकरी या वेबसाइटवर पोस्ट करू लागले़ त्यावरून ज्याला जे पाहिजे, तो ते खरेदी करू लागला़ ना दलाली, ना हमाली, ना मापाडी़ जो फायदा मिळेल तो थेट शेतकºयाला़ या वेबसाइटवरून कोणी किती माल विकला किंवा कोणी काय खरेदी केले, याचा लेखाजोखा आमच्याकडे नाही़ कारण खरेदीदार थेट शेतकºयाला संपर्क करतो़ आमची वेबसाइट फक्त शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधील दुवा आहे, असं किरण सांगतो़

कृषिक्रांती हे मोबाइल अ‍ॅपही विकसित केले होते़ वेबसाइटच्या मर्यादा ओळखून किरणने कृषिक्रांती हे अ‍ॅप शेतकºयांच्या सेवेत रुजू केले़ गुगल प्ले स्टोअरवरून हे अ‍ॅप सहज कोणालाही डाउनलोड करता येतं.या अ‍ॅपवरून तुम्हाला थेट व्हॉट्सअ‍ॅपशी कनेक्ट होता येते़ त्यामुळे तातडीने माहिती मिळवणे किंवा अ‍ॅपवरील माहिती शेअर करणे सुलभ झाले़; पण किरणचे काम प्रचंड वाढले होते़ त्यामुळे किरणला सहकारी मित्रांची गरज होती़ ती गरज किरणचा विद्यार्थी अनंत आंधळे आणि मित्र विशाल जोशी यांनी पूर्ण केली़अनंत आंधळे हा बीडचा. सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे़ तो त्याचं काम सांभाळून कोणत्याही मोबदल्याशिवाय हे काम करतोय. वेबसाइट व मोबाइल अ‍ॅपच्या अपडेशनची जबाबदारी अनंत सांभाळतो़ शेतकºयांनी वेबसाइटवर टाकलेल्या जाहिराती तपासणं, कटेण्टची खात्री करणं, फोटो-व्हिडीओ विशिष्ट साइज व लांबीनुसार मागवून घेणं, ते एडिट करणं, व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सर्वांना पाठवणं, हे सारं अनंत करतो. विशाल जोशी हा नगरचा़ तो स्वत:चा जॉब सांभाळून कृषिक्रांती वेबसाइट आणि मोबाइल अ‍ॅपमध्ये नवनवीन बदल आणतोय़ अगदी शेतात उभे राहून शेतकºयांना त्यांच्या मालाची जाहिरात वेबसाइटवर अपलोड करता येईल, एवढी सोपी ही वेबसाइट असावी, असा त्याचा हट्ट़ तो त्याने पूर्ण केलाय़ त्यामुळे आता कृषिक्रांतीची वेबसाइट तब्बल २८ भाषांमध्ये दिसते़या धडपड्या तरुणांमुळे एक नवीन प्रयत्न आकार घेतो आहे..http://krushikranti.com

sahebraonarasale@gmail.com