शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कमॉन विदर्भ!

By meghana.dhoke | Updated: January 11, 2018 08:47 IST

आपण खेळतो आणि आपण जिंकू शकतो, जिंकतो.. या दोन वेगळ्या गोष्टी. दोन वेगळ्या भावना. खेळाची संस्कृतीच नाही, तर खेळाडूंची मानसिकताच बदलून टाकणारा विक्रम तेव्हा घडतो. विदर्भानं रणजी जिंकणं ही त्या बदलाची सुरुवात आहे..

 

शेवट गोड झाला की त्या आनंदात थिजून जावं काही दिवस. विजयाच्या प्रवासातले बारकेबुरके क्षण पुन्हा पुन्हा आठवत राहावेत आणि ‘साजरा’ करत राहावा तो आनंद..असं वाटणं काही चूक नाही. पण ज्या भयानक वेगवान जगात आपण जगतोय तिथं ‘काल’ महत्त्वाचा उरलेलाच नाही. कालचा उत्तुंग विजय कितीही मोठा असला तरी ‘भूतकाळ’ असतो आणि ‘आज’ नवीन आव्हान घेऊन समोर उभा असतो..रणजी विजेत्या विदर्भ क्रिकेट संघाची ही गोष्ट. खरंतर काही महिने सतत साजरा करावा अशी विक्रमी कर्तबगारी या संघानं करून ठेवली आहे.त्याविषयी बोलावं असं बरंच काही आहे. मात्र हा लेख लिहायला घेतला तेव्हा आपल्या ‘फेअरी टेल’ कर्तबगारीचा ऐतिहासिक आनंद आणि कधीकाळी चिकटलेलं ‘अण्डरडॉग’ लेबल घरी ठेवून विदर्भाचा संघ पुढचं आव्हान पेलण्यासाठी मैदानात उतरलाही होता. सेण्ट्रल झोन सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेण्टी स्पर्धेत छत्तीसगढला भिडलाही होता.हे मान्यच करायला हवं की, अतिक्रिकेटच्या चालू वर्तमानकाळात रणजीचं महत्त्व तसं कमी होत चाललं आहे. मात्र तरीही देशात फर्स्टक्लास क्रिकेटची अत्युच्च कर्तबगारी सिद्ध होते ती रणजीतच. देशात तळागाळात, छोट्या शहरांत क्रिकेट झिरपायला लागलं तेव्हा या छोट्या संघासमोर आणि त्यात खेळणाºया खेळाडूंसमोर एक प्रश्न वारंवार आला..रणजी कितीदा जिंकलंय?- याचं उत्तर जे असो ते असो, पण रूढार्थानं त्याचं उत्तर हेच असतं की, साधं रणजी जिंकता येत नाही, चाललेत भारतीय संघात स्थान सांगायला. गुणवत्तेची मातब्बरी मानणाऱ्या या खेळात आजही ‘झोन’चं मोल हे रणजी करंडकाच्या विक्रमावर ठरतंच. उदाहरणार्थ मुंबई. रणजीच्या इतिहासात आजवर ४१ वेळा ‘चॅम्पिअन’ ठरण्याची कमाल मुंबई संघानं करून दाखवली आहे.आणि त्यांच्या त्या विक्रमासमोर अन्य झोन आणि संघ हे खुजेच वाटत राहणार असं वातावरणही क्रिकेट जगानं अनेक वर्षे पाहिलं आहे.विदर्भ क्रिकेटनंही ५० वर्षे झगडल्यानंतर आता पहिल्यांदा रणजी करंडकरावर आपलं नाव कोरलं. आणि रणजीचीच नाही तर क्रिकेट गुणवत्तेची मिरासदारी मोडून काढत आपल्या क्रिकेट जगतातल्या ‘अरायव्हल’ची घोषणा केली.विदर्भानं आजवर भारतीय क्रिकेटला अनेक गुणवान खेळाडू दिले; पण ते खेळाडू खेळत असलेल्या विदर्भ संघाला रणजीच्या फायनलमध्ये खेळण्याचं भाग्य लाभलं नाही.यंदा रणजी खेळणाऱ्या फैज अ‍ॅण्ड कंपनीने इतिहास घडवला तो हा!दिल्लीविरुद्ध मॅच जिंकल्यावर जिवाच्या आकांतानं त्यांनी ‘कम ऑन विदर्भ’ असा जो गजर झाला तो भारतीय क्रिकेटसाठी नवीन होता. इंदूरच्या होळकर स्टेडिअममध्ये विदर्भाकडून खेळणाऱ्या वासिम जाफरने विजयी चौकार मारला आणि सायंकाळी ५ च्या सुमारास सूर्य अस्ताला जात असताना विदर्भ क्रिकेटसाठी एक नवीन पहाट होत होती.नियती ही असते. ३९ वर्षांचा जाफर आजवर मुंबईकडून खेळला. ही त्याची नववी रणजी फायनल. मात्र विजयी चौकार मारायची संधी कधी मिळाली नव्हती, ती विदर्भानं दिली, तीही वयाच्या या टप्प्यात आणि ऐतिहासिक.महानगरी क्रिकेटकडून ‘स्मॉल टाउन’कडे होणारा हा भारतीय क्रिकेटचा प्रवासच विदर्भाच्या विजयानं अधोरेखित केला. नाहीतर फैज फैजल, रजनीश गुर्बानी, १९ वर्षे वयाचा मध्यमगती बॉलर आदित्य ठाकरे हे सारे सर्वदूर भारतात कुणाला माहिती होते? ही मुलं रणजी जिंकतील असं एरव्ही कुणाला सांगितलं असतं तर ‘अण्डर डॉग’ म्हणूनही त्यांना कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नसतं.पण ते घडलं. कारण ही गुणवान मुलं झपाटल्यासारखी खेळली म्हणून..पण तेवढंच या यशाचं कारण नाही.‘आपण काय जिंकणार? आपण खेळतोय तेच फार आहे’ या भावनेपासून ‘आपण जिंकू शकतो’ ते ‘आपणच जिंकणार’ या भावनेपर्यंत झालेला हा प्रवास आहे.‘आपणच जिंकणार’ ही जिद्द जागवली ती या संघाचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांनी. पंडित हे मुंबई क्रिकेटमधलं जानमानं नाव. रणजीविजेत्या मुंबई संघाचे ते तीनदा प्रशिक्षक होते, चारदा फायनलपर्यंतही मुंबई संघ पोहचला होता. मागच्या वर्षी गुजरातबरोबरचा अंतिम सामना हरल्यानं मुंबईनं पंडितांना नारळ दिला. आणि विदर्भानं त्यांच्यासाठी दार उघडलं.बदल इथून सुरू झाला. जे विदर्भात पन्नास वर्षे घडलं नाही ते यावर्षी घडलं. त्याचा आरंभ, ‘आपला संघ जिंकू शकतो’ यावर विश्वास ठेवायला पंडितांनी या संघाला भाग पाडलं. संघ जिंकला तर बक्षिसाच्या रकमेचं काय करणार, असं पंडितांनी विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रशांत वैद्य यांना या मौसमाच्या सुरुवातीला विचारलं होतं. त्यावर कुठली इनामी रक्कम हे वैद्यांच्या क्षणभर लक्षात आलं नाही हा किस्सा सध्या गाजतोय. मात्र पंडित ठाम होते की, आपण जिंकू शकतो.अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत चंद्रकांत पंडित सांगतात तो जिंकण्या-हरण्याच्या दृष्टीचा फरक. ‘या विजयानं हा विदर्भ संघच बदलणार नाही, तर विदर्भात खेड्यापाड्यात क्रिकेट खेळणाऱ्या १४-१६ वर्षांच्या मुलांनाही असं वाटू लागेल की आपण जिंकू शकतो. आपण खेळतो आणि आपण हा खेळ जिंकू शकतो, जिंकतो या दोन भावनांमधला फरक हा एक फार मोठा सांस्कृतिक बदल आहे. आणि तो बदल विदर्भातल्या क्रिकेटमध्ये घडण्याची शक्यता या विजयानं निर्माण केली आहे!’ते म्हणतात ते खरंय. म्हणून तर फैज फैजल, रजनीश गुर्बानी, आदित्य ठाकरे, शुभम कापसे, रवि ठाकूर, सुनिकेत बार्इंगवार नावाचे हे खेळाडू आता मॅच विनर म्हणून चर्चेत आहेत. लवकरच आयपीएलचा लिलाव सुरू होईल आणि नवीन मालामाल संधीही या मुलांच्या स्वागताला उभी राहील..पंडित म्हणतात तसं, आपण जिंकू शकतो, जिंकतो..या एका भावनेनं बदलाला आरंभ होतो..रणजी जिंकण्याचा हा एक विक्रम त्या बदलाची सुरुवात आहे..फक्त विदर्भासाठीच नाही, तर झारखंड, छत्तीसगड या शेजारी राज्यांसाठीही! तिथल्या तरुण खेळाडूंसाठीही..