शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

कार्पोरेट जगाचा एण्ट्री पास

By admin | Updated: April 30, 2015 16:57 IST

भारतातली कुठलीही टॉप कंपनी घ्या, कुठलंही बडं नाव, ते समर इण्टर्नशिप स्वत:हून ऑफर करताहेत! -तेही ऑनलाइन!! काही कंपन्या काम पाहून पैसेही देतात काही फक्त अनुभव आणि सर्टिफिकेट!

 
बडय़ा कंपन्यांची ऑनलाइन आवतणं; इण्टर्नसाठी खास वेबसाइट
 
 
 
मार्केट बदललं, आता खूप संधी आहेत, अनलिमिटेड अपॉच्यरुनिटीज् आहेत, फक्त आपल्यात धमक पाहिजे.
अशी डायलॉगबाजी आपण खूपदा ऐकतो; पण आपल्या अवतीभोवती आपल्याला त्या संधींचं वातावरण काही दिसत नाही ! (ते का दिसत नाही हा विषय वेगळा)
आपल्याला जाणवत नाही की, आपल्यालाही संधी आहे, बडय़ा कार्पोरेट जगात शिरकावाला जागा आहे. उलट अनुभव असा की दार वाजवायला गेलं की आपल्याच डोक्यावर काहीतरी आदळतं. अनेकांना तर चार-पाच हजाराची नोकरी मिळणं अवघड !
असं होतं याची कारणं खरं तर दोन. एकतर आपल्याकडे स्किल्स नसतात आणि दुसरं असलेली स्किल्स योग्य ठिकाणी आपल्याला वापरता येत नाही आणि ती वापरून नवीन स्किल्स शिकता येत नाहीत!
आनंद एवढाच की, पूर्वी अनेकांसाठी ही गोष्ट इथंच संपत असे; आज ती संपत नाही!
कारण ज्यांच्याकडे स्किल्स आहेत, बेसिक काही गोष्टी आहे, खटपट करून पुढे सरकण्यासाठी आवश्यक मेहनत आहे त्यांच्यासाठी बडय़ाबडय़ा ब्रॅण्डच्या कंपन्या स्वत: ऑनलाइन लाल कारपेट टाकून बसल्या आहेत.
विश्वास नाही बसणार, पण भारतातलं आजच्या घडीला कुठलंही बडं नाव घ्या, कुठलीही टॉप कंपनी घ्या, ते समर इण्टर्नशिप स्वत:हून ऑफर करताहेत!
-तेही ऑनलाइन !!
काही कंपन्या स्वच्छ सांगतात की, काम पाहून स्टायपेण्ड ( म्हणजे विद्यावेतन, मानधन म्हणू) देऊ, काहीजण सांगतात की, मानधन नाही, पण आमच्या कंपनीत काम करण्याची संधी आणि प्रमाणपत्रं फक्त देऊ तर काही कंपन्या एकरकमी थोडासा स्टायपेण्डही ऑफर करत आहेत!
काही कंपन्या तर वर्क फ्रॉम होमही ऑफर करत आहेत !
अर्थात ही समर इण्टर्नशिप मिळणं इतकं सोपं नाही, नोकरीसाठी मुलाखती देता, तसंच त्याच किचकट आणि अवघड प्रक्रियेतून तावून सुलाखून जावं लागतं !
पण ते जमलं तर ऐन कॉलेजात असताना भारतातल्या बडय़ा कंपनीत आपण काम केलंय या एका सर्टिफिकेटनी नोकरीच्या बाजारात आपली काय पत असेल याचा विचार करा !
आता मुख्य प्रश्न असा की, या बडय़ा कंपन्या अशा कट्टेकरी मुलांना कशासाठी पंधरा दिवस ते तीन-सहा महिन्यांचं काम ऑफर करत असतील? त्यात त्यांचा काय फायदा?
सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कमी पैशात त्यांची त्या त्या काळातली छोटीमोठी कामं होतात. जी कामं स्किलबेस्ड आहेत ती कामं ते सहज फ्रेश मुलांकडून करून घेऊ शकतात. नवा उत्साह, नव्या आयडियाही त्यांना सापडतात.
दुसरं म्हणजे ताजं, नव्या दमाचं मनुष्यबळ मार्केटमधून थेट आपल्याकडे वळवता येऊ शकतं का, त्यांना भविष्यात आपल्याकडे काम देऊन काही नवीन प्रोजेक्टचा विचार करता येऊ शकतो का, याचाही अंदाज घेतला जातो.
त्यातून काही टॅलण्ट जाणवलं तर नोकरीची ऑफरही दिली जाते. कारण तेच, स्वस्त आणि तरुण मनुष्यबळ सहज उपलब्ध होतं !
समर इण्टर्नशिपचे मॉल पोर्टल
काही कंपन्या रेफरन्समधून किंवा थेट कॉलेजमधून समर इण्टर्न निवडतात. पण आता ऑनलाइनच्या जमान्यात तर समर इण्टर्न ऑफर करणारे काही खास पोर्टलही तयार झाले आहेत !
आपण कसे शॉपिंग साइट्सवर जातो आणि आपल्याला हव्या त्या ब्रॅण्डचे कपडे विकत घेतो. तसंच हे, मॉलसारखंच!
तमाम टॉप कंपन्या आपापले समर जॉब्ज या ऑनलाइन साइट्सवर अपलोड करतात. कंपनीचं नाव, कामाचं स्वरूप, काम कुठल्या शहरात आहे, किती दिवस, स्टायपेण्ड कसा आणि किती देणार, मुख्य म्हणजे देणार की नाही ही सारी माहिती त्यांनी दिलेली असते.
आपलं शिक्षण, आपल्याला हवं असलेलं काम, हवं असलेलं शहर असे सर्च देऊनही इथं समर इण्टर्नशिप शोधता येते.
सध्या समर इण्टर्नशिप मिळवण्याचा हा सगळ्यात मोठा आणि सोपा ट्रेण्ड आहे. प्रोफेशनल जगात पाय ठेवण्याचा अनुभव, मुलाखतीचा सराव ते प्रत्यक्ष काम हवं असेल तर या ऑनलाइन साइट्सवरून समर इण्टर्नशिप मिळवण्याचा प्रय} करायला हवा!
स्किलबेस जॉब, क्रिएटिव्हिटीला वाव
1) या साइट्सवर जाऊन पाहिलं तर मुख्यत्वे आयटी जॉब्ज जास्त दिसतात. अॅप डेव्हल्प करण्यापासून ते थेट इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर या टेक्निकल गोष्टींर्पयतचे जॉब अनेक आहेत.
2) दुसरे म्हणजे क्रिएटिव्ह जॉब्ज. कण्टेट रायटिंग, सोशल मीडिया, जाहिरात, मॅगङिान्स, वर्तमानपत्र, इव्हेण्ट याक्षेत्रतले जॉबही मोठय़ा प्रमाणात दिसतात.
3) स्किल पक्के असतील, बोलण्याचा स्मार्टनेस असेल आणि आपलं काम उत्तम येत असेल तर हे जॉब कुणालाही मिळू शकतात.
अधिक माहितीसाठी या साइट्स
पहा.
1) www.internshala.com
2) www.letsintern.com
चिन्मय लेले
 
मी काम कसं शोधायचंय?
 
पण काम शोधायचं कसं? समर जॉबविषयी ही एवढी सारी माहिती वाचूनही अनेकांना प्रश्न पडला असेल की, तर त्यासाठी अजून या काही टिप्स ! अर्थात, हे विसरायचं नाही की, आपलं डोकं आणि हातपाय चालवल्याशिवाय फुकट काही मिळत नाही !
 1) तुमच्या शहरात जर काही ट्रॅव्हल एजन्सी असतील तर त्यांना जाऊन भेटा, याकाळात त्यांच्याकडे काम असू शकतं.
2) हॉटेल्स, दुकानं, छोटय़ामोठय़ा कंपन्या यांनाही भेटून काम मागता येऊ शकते.
3) स्वयंसेवी संस्थांकडे जाता येऊ शकतं.
4) तुम्ही टेक्निकल काम करत असाल, आयटीआय, डिप्लोमा, इंजिनिअरिंगवाले असाल तर जवळच्या कंपन्यांमध्ये जाऊन काम शोधा.
5) खेडे गावात असाल तर आपापला शेतमाल जवळच्या शहरात नेऊन विका.
6) प्रक्रिया उद्योगात जाऊन काम शिकता येईल.
***
सगळ्यात महत्त्वाचं जमाना स्टार्टअप्सचा आहे. आपलं स्वत:चं काम, उद्योग, व्यवसाय सुरू करायला सरकार प्रोत्साहन देतं आहे. 
त्यामुळे डोक्यात काही भन्नाट आयडिया असेल, ट्राय मारायचा असेल, तर लगेच कामाला लागा, वेळ दवडू नकाच !