शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

लॉकडाउनमध्ये शरीराचं आरोग्य सांभाळत असाल, पण सायबर फिटनेसचं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 13:58 IST

लॉकडाउनमध्ये सायबर सुरक्षितता पाळा, त्यासाठी सायबर साक्षर व्हा आणि पुढचा टप्पा म्हणजे आपला सायबर फिटनेस उत्तम ठेवा, नाहीतर.

ठळक मुद्देसायबर विश्वात वावरताना प्रत्येकाने सायबर विश्वासंदर्भात जागरूक राहणो अपरिहार्य आहे.

लॉकडाउन आहे.हातात इंटरनेट आहे. म्हटलं तर सगळ्या जगाशी आपला कनेक्ट आहे.मात्र त्यातून कळत-नकळतपणो काहींची पाऊलं सायबर गुन्हेगारीकडे वळू लागली आहेत.आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण गुन्हा करून बसतो असं होतंय का यावरही आपण बारकाइनं लक्ष ठेवायला हवं.लॉकडाउनच्या काळात इंटरनेटवर आपण प्रचंड अवलंबून झालो आहोत.ते आपलं कम्युनिकेशनचं साधन आहे. त्यात रिअल-टाइम, डायनॅमिक डेटा यामुळे अनेक यूजर्स ते म्हणजेच सर्वस्व असं म्हणून त्यातच हरवले आहेत.बरं त्याला भौतिक मर्यादा नाही, वापराला स्थळ-काळ-वेळेचं बंधन नाही.त्यामुळे इंटरनेटवर जास्त वेळ जाऊ लागला.मात्र ते करताना आपल्याला नेटवर आलेली माहिती नेमकी कुठून आली? त्याचा स्नेत काय? या माहितीचा खरेपणा काय? माहिती नेमकी किती खरी, त्यात किती गोष्टींशी छेडखानी करण्यात आली आहे?हे सारे प्रश्न आपण स्वत:ला विचारणं, वाचलेल्या माहितीचा चिकित्सक पद्धतीने विचार करणं, तपासून घेणं, जरा मिनिटभर थांबून ती माहिती प्रोसेस करणं इतकं सोपं काम करण्याची तसदीसुद्धा अनेकजण घेत नाहीत.आपण एखादी पोस्ट व्हायरल करताना जास्तीत जास्त लाइक कमेंट कशा पद्धतीने मिळवता येतील याचाच विचार करतो.मात्र तरुण मुलांनी वेळची या विळख्यातून बाहेर पडण्याची आज नितांत गरज निर्माण झाली आहे. ते न केल्यानं समाजात अफवा पसरवतात.  गैरसमज निर्माण करणारा मजकूर, व्हिडीओ यातून धार्मिक तेढ, सायबर बदनामी असे प्रकार केले जातात.त्यातून अनेकांची आयुष्य करपून जातात.सोशल मीडिया हाताळण्याची  संवेदनशीलता, कौशल्य नसल्यानं इतरच कशाला आपलंही नुकसान होऊ शकतं याचाही विचार करण्याची गरज आहे.सायबर साक्षरता आणि सायबर फिटनेस या दोन गोष्टी लॉकडाउनच्या काळात शिकून घ्या.ते नाही केलं तर आपल्या मनाचं आरोग्य तर बिघडेल, आपण समाजाला आाणि सोशल मीडिया आपल्याला घातक ठरू शकेल.त्यासाठी या गोष्टींकडे लक्ष द्या.   1. संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन आणि टॅब्लेटसारख्या डिजिटल उपकरणाद्वारे एखाद्याची बदनामी करणं किंवा अफवा पसरवून  समाजातील शांतता भंग करून तेढ निर्माण करणं ही सायबर गुंडगिरी आहे, हे लक्षात ठेवा.2. व्हॉट्सअॅप, फेसबुक इतर अॅप्सच्या माध्यमातून  एखाद्या व्यक्तीबद्दल, घटनेबद्दल, विशिष्ट समूहाबद्दल नकारात्मक, चुकीची माहिती प्रसारित केली जाते त्यातून समाजाचा एकोपा, सोहार्द धोक्यात येऊ शकतं. तसं करणं, कळत-नकळत हा गुन्हा आहे.3. एखाद्या व्यक्तीबद्दल, समाजाबद्दल बनावट वेबपेज, व्हिडीओ, मजकूर, कमेण्ट्स व्हायरल करून ऑनलाइन धार्मिक, वांशिक, पारंपरिक किंवा राजकीय द्वेष पसरवणं हा समाजकंटकांचा हेतू असू शकतो. त्यासाठी आपले अकाउण्टही वापरले जाऊ शकतात. मॉर्फीगचे प्रकार घडतात.त्यामुळे आलेली माहिती ताडून पहा. आपल्या खासगीपणाची पूर्ण काळजी घ्या.4. शक्यतोवर अनावश्यक माहिती मजकूर फॉरवर्ड, व्हायरल करणं टाळा, उत्साहाच्या भरात आपण एखाद्या सायबर गुन्ह्यात अडकू शकतो हे लक्षात घ्या.                     5. सोशल मीडिया हे आवश्यक माहितीच्या आदानप्रदानासाठी आहे, द्वेष पसरविण्यासाठी नाही हे आधी ध्यानात घ्या. व्हॉट्सअॅप,  फेसबुकवर येणारी प्रत्येक पोस्ट, मजकूर, व्हिडीओ विश्वासार्ह असतो असे नसते. अफवा, फेक पोस्ट मागे एखादी विकृत भावना असू शकते.                                               6. सोशल मीडियावर काही पोस्ट, अफवा, तेढ निर्माण करणारे मजकूर प्रकाशित करण्याआधी कायद्यातील तरतुदी लक्षात घ्या.7.  सायबर विश्वात वावरताना प्रत्येकाने सायबर विश्वासंदर्भात जागरूक राहणो अपरिहार्य बनले आहे.

 

1.महाराष्ट्र राज्यात आतार्पयत, आक्षेपार्ह व्हॉट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 127 गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 113 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 2. टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी 1क् गुन्हे व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी 5 गुन्हे दाखल झाले आहेत.3.इन्स्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल व अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, यू-टय़ूब) गैरवापर केल्याप्रकरणी 48 गुन्हे दाखल झाले आहेत.  4.कोविड-19 विषाणूसंदर्भाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये शांतता व एकोपा अबाधित राखण्यासाठी सोशल मीडियावर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाते आहे.5.इलेक्ट्रॉनिक, डिजिटल पुरावा सिद्ध झाल्यास आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते.