शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शांत निवांत ‘समर डेस्टिनेशन्स’

By admin | Updated: April 2, 2017 06:56 IST

यंदाच्या उन्हाळ्यातल्या सहलींसाठी नेहमीची गर्दीनं गजबजून गेलेली समर डेस्टिनेशन्स टाळून मनाला आणि शरीराला विसावा देणारी आगळी वेगळी

 यंदाच्या उन्हाळ्यातल्या सहलींसाठी नेहमीची गर्दीनं गजबजून गेलेली समर डेस्टिनेशन्स टाळून मनाला आणि शरीराला विसावा देणारी आगळी वेगळी हिल डेस्टीनेशन्स निवडायची का? होळीनंतर उन्हाचा पारा चांगलाच वाढू लागला आहे. उन्हाच्या झळांपासून बचावण्यासाठी आपण नेहमीच थंडाव्याच्या शोधात असतो. मग तो थंडावा आजूबाजूच्या वातावरणातून मिळणारा असो, खाण्या-पिण्यातून मिळणारा असो की कपड्यांतून.

उन्हाळ्यात शरीराला आणि मनाला विसावा देण्याचाच एक पर्याय म्हणजे आपल्या नेहमीच्या धकाधकीतून काही दिवसांसाठी दूर एखाद्या थंडगार ठिकाणी जाणं. उन्हाळ्यातली हिल स्टेशनची एक सफर आपल्याला रिफ्रेश करून टाकते. महाबळेश्वर, माथेरान, सिमला, कुलू, मनाली, उटी ही आपल्या अगदीच परिचयाची ठिकाणं. पर्यटकांच्या गर्दीनं ओसंडून जाणारी. पण या उन्हाळ्यामध्ये ही नेहमीची डेस्टिनेशन्स टाळून तुम्ही काहीतरी वेगळा पर्याय नक्कीच निवडू शकता जेणेकरून तुम्हाला निवांतपणे उन्हाळ्यातल्या सहलींचा आनंद उपभोगता येईल.

भारतातच अगदी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत तुम्हाला अनेक वेगळी ‘समर डेस्टिनेशन्स’ सापडतील. हिमालयाच्या कुशीतला निवांत ‘लडाख’ लडाखपर्यंत पोहचण्यासाठीचा प्रवास हेच एक थ्रिल असू शकतं. इथे ‘खार्दुंगला पास’ आहे जो जगातला सर्वांत उंचावरचा मोटरेबल रोड म्हणून ओळखला जातो. ‘थ्री इिडयट्स’ चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये दिसणारा निळाभोर तलाव सगळ्यांनाच आठवत असेल. हा ‘पेंगांग लेक’ही लडाखमध्येच आहे. तिथे तुम्ही मस्तपैकी कँपिंगही करु शकता. लडाखच्या बर्फाळ प्रदेशात वाळंवटाचा विरळा अनुभव येतो तो नुब्रा व्हॅलीमध्ये. त्यामुळेच इथल्या वाळूच्या टेकड्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा भाग ठरतात.

अँडव्हेंन्चरची आवड असणाऱ्यांसाठी लडाखमध्ये फक्त उन्हाळ्यातच झंस्कार नदीमधे रिव्हर राफ्टिंगचाही आनंद घेता येतो. लडाखवर बौद्ध धर्माची ठळक छाप आहे. त्यामुळेच इथे शांती स्तूप, बौद्ध विहारही पहायला मिळतात. 17 व्या शतकात नामग्याल राजांनी बांधलेला लेहचा राजवाडा इथल्या इतिहासाची साक्ष देतो. मनालीपासून लडाखपर्यंतचा प्रवास बाईकवरुन करून लडाखची ट्रीप तुम्ही थोडीशी वेगळ्या पद्धतीनंही प्लॅन करु शकता.. एकाचवेळी अँडव्हेंचर, निवांतपणा आणि थोडा स्वत:शीच संवाद साधण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर या उन्हाळ्यात तुम्ही नक्कीच लडाखची ट्रीप करु शकता. निसर्गाचा आनंद देणारा ‘खज्जियार’ हिमाचल प्रदेशमध्ये डलहौसीच्या जवळच असलेल्या या छोट्याशा जागेला तुम्ही खात्रीनं ‘भारताचं स्वित्झर्लंड’ म्हणू शकता

. फार न फिरता एखाद्याच ठिकाणी शांतपणे राहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर खज्जियारचा पर्याय नक्कीच चांगला आहे. देवदार, ओक आणि सिल्व्हर फरची दाट वनराजी आणि खज्जियार लेकच्या काठावरचा निवांतपणा हे खज्जियार येथेच मिळू शकतो. निसर्गाचं सान्निध्य म्हणजे काय हे प्रत्यक्षात इथं अनुभवता येऊ शकतं. निसर्ग- संस्कृतीचा वेगळा अनुभव देणारं‘ अल्मोडा’ देवभूमी उत्तराखंडमधील हे हिलस्टेशन. खज्जियारप्रमाणेच एखाद्या ठिकाणी निवांत राहण्यासाठीचं उत्तम ठिकाण. कुमाऊँ संस्कृती, इथली वेगळी हस्तकला, पारंपरिक खाद्यपदार्थ आणि हिमालयाचं सान्निध्य यामुळे देशी-विदेशी पर्यटकांचा ओढा अल्मोडाकडे वाढतो आहे. इथलं नंदादेवीचं मंदिर प्रसिद्ध आहे. इथे इतरही अनेक मंदिरं आहेत. दोनशे वर्षांपूर्वीचा लाला बाजारही आहे.

शिवाय अल्मोडा प्रसिद्ध आहे इथल्या अंगोरा जातीच्या सशापासून मिळणाऱ्या लोकरीपासून बनणाऱ्या अंगोरा शालींसाठी. भरपूर फिरण्याचा अनुभव देणारा छोटासा ‘सिक्कीम’ सिक्कीम- भारताच्या ईशान्येकडील राज्यांना भेट देणाऱ्या पर्यटकांचं प्रमाण गेल्या काही वर्षांमध्ये वाढत आहे. अरूणाचल प्रदेश आणि सिक्कीम ही पर्यटकांची आवडती ठिकाणं ठरताहेत. सदाहरित जंगलं, फुलांच्या जवळपास 200 जाती, इथली सेंद्रिय शेती आणि छोटी-छोटी आॅरगॅनिक मार्केट्स, बुद्ध विहार यासारख्या ठिकाणांमुळे या छोट्याशा राज्यात दहा-बारा दिवस आरामात जाऊ शकतात. इथे आल्यानंतर येणारा आयुष्यभर जपून ठेवावा असा क्षण म्हणजे शुभ्र आकाशाला भिडणाऱ्या जगातल्या तिसऱ्या सर्वांत उंच शिखराचं अर्थात कांचनजुंगाचं दर्शन.

निसर्गासोबतच इतिहास दर्शन घडवणारं ‘पंचमढी’ पंचमढी मध्यप्रदेशमधलं हे हिलस्टेशन ‘सातपुड्याची राणी’ म्हणूनच ओळखलं जातं. हिरव्यागार टेकड्या, दऱ्या -खोऱ्यांबरोबरच इथलं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे इथले धबधबे. बी फॉल, रजत प्रपात, अप्सरा फॉल असे अनेक धबधबे इथल्या डोंगरराजीतून कोसळताना दिसतात. धूपगढ हे सातपुडा पर्वत रांगांमधलं सर्वांत उंच शिखरही इथेच आहे. शिवाय अभ्यासकांना इथलल्या बुद्धकालीन गुंफाही आकर्षित करतात. निसर्गसौंदर्यासोबतच इतिहासातही तुम्ही रमू शकता असं हे ठिकाण आहे. ही ठिकाणं नक्कीच तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिल्याचा, अनुभवल्याचा आनंद देऊ शकतील.

- अमृता कदम