मोटारमालक संघ, सांगली
वाहतूक व्यावसायिकांनी एकत्र येऊन काही वर्षांपूर्वी मोटारमालक संघ गणेशोत्सव मंडळ सुरू केलं. ट्रकचालक, क्लिनर यांच्यासाठी रुग्णालय चालविणार्या या मंडळानं यंदा गणेशोत्सवात बंदोबस्तासाठी असणार्या पोलिसांना नेमणुकीच्या ठिकाणी खाद्याची पाकिटं व पाण्याच्या बाटल्या पुरविण्याचा उपक्रम हाती घेतलाय. चोवीस तास बंदोबस्तावर असणार्या पोलिसांना घरी जाता येत नाही. अनेकदा उपासमार होते. मोटारमालक मंडळाकडून यंदा त्यांना बंदोबस्ताच्या ठिकाणीच खाद्याची पाकिटं देण्यात येतील. बंदोबस्तासाठी किती पोलीस असणार, खाद्य पाकिटं कशी व कोणती पुरवायची, याचं नियोजन सुरु असल्याची माहिती संस्थापक बाळासाहेब कलशेट्टी यांनी दिली.
मदत उपक्रमांना
भंडार्याचा राजा
‘वेगळे’ मंडळ म्हणून या गणेश मंडळाकडे पाहिले जाते. मंडळाचे कार्यकर्ते दरवर्षी गणपतीत वर्गणी गोळा करतात. तोलूनमापून काटकसरीनं खर्च करतात आणि शिल्लक राहिलेली सगळी रक्कम बाल उदय अनाथालयाला मदत म्हणून दिली जाते किंवा एखाद्या अन्य गरजू संस्थेला. मागीलवर्षी अतवृष्टीमुळे घराची पडझड झाल्यानं खराशी येथील काही मुलं बेघर झाली, अशा अनाथ मुलांना संस्थेनं ही रक्कम दिली. मागच्या वर्षी शिल्लक रकमेतून मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शहीद भगतसिंग स्मारक
सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेतला.
- नंदू पारसवार