शहरं
Join us  
Trending Stories
1
"भर उन्हाळ्यात 'नगर दक्षिणे'त पैशांची धुवांधार बरसात"; पैसे वाटपावरून विखे - लंके यांच्यात जुंपली
2
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सुरुवात; 11 मतदारसंघ, तापमान कमी होणार
3
राज ठाकरेंच्या राजकारणाचा शेवट, आग लावण्याची कामं बंद करा; जितेंद्र आव्हाड संतापले
4
राज ठाकरेंनी ज्याची सुपारी घेतली, त्याची वाजवावी तर लागेलच! जयंत पाटलांनी काढला फडणवीसांचा जुना व्हिडीओ
5
'मिस्टर राज!' लाव रे तो व्हिडीओवर राज ठाकरेंना सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर; किणी हत्याकांड, कोहिनूर मिलची केली आठवण
6
जागरूक हो मतदारराजा; महाराष्ट्रासह १० राज्यांतील ९६ जागांसाठी आज होणार मतदान
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२४; एखाद दुसरी सोडली, तर सर्वच राशींना फायद्याचा, आनंदाचा दिवस
8
बाळासाहेबांवर अन्याय करणाऱ्यांना सोबत कसे घेतले? राज ठाकरे, ठाण्यातील लोंढ्यांबाबत चिंता
9
पंतप्रधानांची निवड तुम्ही संगीत खुर्चीतून करणार का? उपमुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल
10
लोकशाही न मानणाऱ्या नरेंद्र मोदींची पावले हुकूमशाहीकडे; शरद पवारांची टीका
11
मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका
12
ही लोकसभेची निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी झालेली आहे: प्रकाश आंबेडकर
13
“यापुढे विधानसभा, लोकसभेची निवडणूक लढविणार नाही, राजकीय संन्यास…”: एकनाथ खडसे
14
भाजपाने उद्योग, नोकऱ्या गुजरातला पळविल्या, उद्या मंत्रालयही पाठवले जाईल: आदित्य ठाकरे
15
सत्तेच्या लालसेपोटी उद्धव ठाकरे रामाला विरोध करणाऱ्यांबरोबर; पुष्करसिंह धामी यांची टीका
16
४ जूनला भाजपा जाऊन इंडिया आघाडीचे सरकार येईल: शशी थरूर, देशभरात हवा बदलल्याचा दावा
17
मुंबईत प्रचाराचा सुपरसंडे! मतदानाआधीचा शेवटचा रविवार; सभांमुळे वातावरण तापले
18
चौथ्या टप्प्यातही नात्यांची कसोटी; विखे, गावित, खडसे, मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला
19
पोट भरण्याचे अन् विजेचे वांदे; महागाईविरोधात ‘पीओके’ पेटले
20
RCB ने प्ले ऑफच्या आशा कायम राखल्या, DC च्या अडचणी वाढल्या; विराट-अनुष्का खूश 

कॉम्बो- दिवाळीचा नवा फॅशन ट्रेण्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 6:50 AM

खण-इरकल या पारंपरिक कापडाचा उत्तम वापर करत रंगांचं आणि फॅशनचं फ्युजन हा यंदा दिवाळी ट्रेण्ड आहे.

ठळक मुद्देसध्या दागिन्यांमध्ये चलती आहे ती ऑक्सिडाइजच्या दागिन्यांबरोबरच फ्रेब्रिक म्हणचेच कपडय़ापासून केलेल्या दागिन्यांची.

- भक्ती सोमण

दिवाळीत हमखास या साडय़ा नेसल्या जातात. एखादी सिल्कची साडी, ड्रेस विकत घेतला जातो. थोडक्यात सणाच्या दिवसात साडय़ा आवडीने नेसल्या जातात. दिवाळीसारख्या सणांच्या दिवसात प्रामुख्याने गडद रंगाच्या चमकदार लूक असणार्‍या साडय़ा जास्त चलतीत असतात. तसं यावर्षी काय आहे?यावर्षी खण, इरकलच्या साडय़ा पुन्हा चर्चेत आहेत. खण, इरकल आवडतं कारण त्यानं मिळणारा ट्रेडिशनल लूक. रंगाचं वैविध्य बघायला मिळतं. याशिवाय कलर कोलाज करण्याकडे आता मुलींचा भर असतो. म्हणजे गुलाबी साडीवर निळा ब्लाउज, किंवा कॉटनच्या बारीक नक्षी असलेल्या साडीवर खणाचा ब्लाउज, प्लॅन साडीवर कलमकारी असं कॉम्बिनेशन केलं जातं. 

कॉम्बोंसमजा, तुम्ही अजरक साडी नेसली तर त्याच्यावर कलमकारीची बॉर्डर करता येऊ शकते. किंवा खणाची बॉर्डरही जोडता येऊ शकते. इरकल साडीवर तर खणाची बॉर्डर आजकाल पहायला मिळते. या प्रकारच्या साडय़ा नेसण्याकडेही मुलींचा कल आहे.  --पैठणीचे ड्रेस पैठणीच्या साडय़ा या खास समारंभात, लग्नात, सणांच्या दिवसात आवजरून नेसली जाते; पण साडीपेक्षा पैठणीच्या ड्रेसना आता खूपच मागणी आहे. साडीपेक्षा पैठणी ड्रेस घेण्याकडे मुलींचा ओढा खूप आहे. ड्रेसबरोबरीने पैठणीचे वन पीसही मिळतात. अर्थात हे बरेच महाग असतात.  

फ्रेब्रिकचे दागिने ेसध्या दागिन्यांमध्ये चलती आहे ती ऑक्सिडाइजच्या दागिन्यांबरोबरच फ्रेब्रिक म्हणचेच कपडय़ापासून केलेल्या दागिन्यांची. यात खण, इकत, खादी अशाप्रकारचं ग्लेजचं कापड वापरून त्यातून कानातले, गळ्यातल्याचे विविध प्रकार केले जातात.