शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
2
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
3
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
4
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
5
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
6
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
7
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
8
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
9
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
10
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
11
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
12
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
13
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
14
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
15
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
16
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
17
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
18
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
19
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
20
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस

चंकी हायलायटर्स

By admin | Updated: April 12, 2017 15:55 IST

केस कलर करणं आता तसं कॉमन झालं. जमाना हायलायटर्सचा आहे. आणि त्यापुढे जाऊन काहीजण तर पापण्या, भुवयाही रंगवत आहेत.

 - भक्ती सोमण 

केस. हा केवढा किचकट विषय. खरंतर पार गॉनकेस असा हा विषय. प्रत्येकाला आपल्या केसांचा पोत, केसांची जाडी, केसांची लांबी, रंग, त्यांचं गळणं याबाबत इतक्या समस्या असतात की डोक्याला केसांचा ताप होतो. त्यात केस पांढरे होऊन अकाली डोक्यावर चांदी पिकायला लागली की मग जाहिरातीत पाहिलेल्या हेअर कलरची याद येतेच.

पूर्वी मेहंदी लावणं हा एकमेव आॅप्शन होता. पण ते लालचुटूक केस अनेकांना नको वाटू लागले. नॅचरल कलर दिसण्याची होड सुरू झाली. आणि त्यातच हेअर कलरच्या जाहिरातीतल्या मॉडेलचे कलर केलेले केस जसे दिसतात तसे आपलेही दिसावेत असं अनेकांना वाटू लागलं. बायकांनाही वाटायला लागलं. आणि मग घरोघरच्या तरुण जगण्यात हेअर कलर नावाचा प्रकार कॉमन झाला. एकतर पूर्ण केस रंगवले जाऊ लागले नाही तर मग मधल्या मधल्या केसांना कलर करणं म्हणजेच हायलाइट करणं सुरू झालं.

आता सध्या कुठले रंग डोक्यावर चढून बसलेत विचारा?संपूर्ण केस रंगवायचे असतील तर त्यासाठी ग्लोबल हेअर कलरमधील रंगांचा वापर केला जातो. त्यात मोका, कॉपर, चॉकलेट, बरंगडी अशा काही प्रमुख कलर्सचा वापर करतात. कॉपर आणि निळ्या रंगात केस रंगवण्याचा ट्रेण्ड तर सध्या खूपच वाढला आहे. 

केसांच्या मध्यापासून टोकापर्यंत एकाच कलरनं केस रंगवत हायलाइट्स करताना आॅम्ब्रे हेअर कलर (ombre hair), चंकी हायलाइट्स असं काहीबाही करतात. म्हणजे काय तर एका रंगानं किंवा दोन रंगांचा वापर करून ग्रीन, पर्पल, ब्ल्यू, प्लॅटीनम असे रंग वापरून मध्येच केस रंगवले जातात. अशा चमकिल्या रंगांची सध्या समर क्रेझ आहे.रंगीत केसांच्या तब्येतीला टॉनिक कुठलं?केस कलर करण्याचा सोस, पण त्यांच्या देखभालीचा आनंद असं नेहमी अनेकांचं होतं. हेअर एक्सपर्ट तुषार चव्हाण सांगतात, हल्ली मुलींनाच नाही तर मुलांनाही केसांवर प्रयोग करायला खूप आवडतं. साधारणत: केस रंगवण्याचा खर्च हा हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान येतो. मुलं खर्च करतातही. पण केस रंगवल्यानंतर ते व्यवस्थित कॅरी करता आले पाहिजेत. ते मेण्टेन करण्यासाठी नियमित शाम्पू आणि कंडिशनर वापरलं पाहिजे. हेअर स्पा, फायबर ट्रीटमेंट घेण्याचा फायदा होतो. केसांना कलर करणं हे स्टाइल स्टेटमेंट असलं तरी, रंग लावल्यानंतर आपण त्याची व्यवस्थित काळजी घेऊ शकतोय का, या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर मिळालं तरच केस रंगवणं उत्तम.पापण्या आणि भुवयांनाही रंगहल्ली तर पापण्या आणि भुवयाही रंगवल्या जातात. त्यासाठी आय स्ट्रोक हायलाइट्सचा वापर केला जातो. त्यात मुख्यत्वे ब्राऊन कलर वापरला जातो. त्याचप्रमाणे गोल्ड, रेड, मोका, कॉपर, चॉकलेट, ब्राऊन, पर्पल, ब्ल्यू, बरगंडी आणि हिरवा या रंगांचाही वापर केला जातो. - भक्ती सोमण(भक्ती लोकमतच्या मुंबई आवृत्तीत उपसंपादक आहे. bhaktisoman@gmail.com)