- प्रेरणा राऊत, निर्माण 4
चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यात नेरी हे माझं गाव.आई-वडील दोघेही शिक्षक. घरात शैक्षणिक आणि सामाजिक वातावरण होतं, लहानपणी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची पुस्तके वाचण्यातच मन जास्त रमायचं. थोडी मोठी झाल्यावर बलुतं, उपरा, झोंबी यासारख्या कादंब:या वाचल्या.त्यावेळी आमच्याकडे लोकमत यायचा, त्यातली मैत्न (आताची ऑक्सिजन) ही पुरवणी त्या काळातील सगळ्या कुमारवयीन मुला-मुलींमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी फारच फेमस होती. मैत्नमध्ये निर्माणच्या काही गोष्टी येत असतं, त्या गोष्टी वाचून मलाही निर्माण प्रक्रियेत भाग घ्यावासा वाटत असे; पण त्यासाठी 2011 साल उजाडावे लागले. 2011 डिसेंबर महिन्यात मी निर्माण प्रक्रि येत सामील झाले. त्यावेळेस मी बीएचएमएस इंटर्नशिप करत होते.पण मला माझं शिक्षण फारच व्यर्थ वाटायचं, कारण मी फक्त परीक्षेपुरता अभ्यास करून पास होणा:या कॅटेगरीतील मुलगी होते. अर्थात, पुढे काही महिन्यातच नावापुढे डॉक्टरही लागणार होते; पण क्लिनिकल कामांमध्ये जराही इंटरेस्ट नसल्यामुळे पुढे आयुष्यात काय करायचे हा यक्षप्रश्न समोर होता. शिवाय त्या काळात मनात ज्या काही सामाजिक भावना जागृत झाल्या होत्या त्याला कसं चॅनलाइज करायचं, हाही प्रश्न खूप सतावत होता. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला निर्माण या प्रक्रि येत भाग घेतल्यामुळे मिळाली. त्याच काळात मेळघाटमधील कुपोषित मुलांचे पावसाळ्यात होणारे मृत्यू कमी करण्यासाठी जुलै ते सप्टेंबर महिन्यात आयोजित केलेल्या एका आरोग्यशिक्षणावर आधारित पावसाळी कॅम्पमध्ये मी भाग घेतला. या प्रक्रि येत 10 दिवस सहभागी. आणि मेळघाटच्या प्रेमात पडले. आपल्या शिक्षणाचा सामाजिक कामात उपयोग कसा करायचा आणि पोट भरण्यापुरते पैसे कसे कमवायचे, हे निर्माणच्या प्रक्रियेत कळल्यामुळे मी पुढे एमपीएच करायचा निर्णय घेतला. त्यानंतर मी मेळघाट येथील एका सामाजिक संस्थेत 2 वर्षे 6 महिने काम केलं. कुपोषण ते किचन गार्डन, विविध वयोगटातील लोकांचे आजार, पाच वर्षार्पयतच्या वयोगटातील मुलांचे आजार यासारख्या अनेक विषयांमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून काम बघितलं.माझा मेळघाटमधील फिल्डमध्ये काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता, तिथल्या आदिवासी लोकांची संस्कृती मला फार जवळून बघता आली. त्यातून ब:याच गोष्टी शिकता आल्या.सध्या मी शहीद हॉस्पिटल, दल्लीराजहरा, जिल्हा बालोद, छत्तीसगढ इथं दोन वर्षापासून सामाजिक स्वाथ्य विभागात कार्यरत आहे. ‘मेहनतकशों के स्वास्थ्य के लिए मेहनतकशों का अपना अस्पताल’ हे या हॉस्पिटलचं ब्रीदवाक्य.
निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?
तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल. अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2020आहे.