शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

करिअरचा निकाल 10 मार्कात

By admin | Updated: May 14, 2015 19:51 IST

मार्क मिळवलेत म्हणून, आई-बाबा म्हणतात म्हणून, तिकडेच खूप पैसा आहे म्हणून आणि मित्र जाताहेत म्हणून करिअरची वाट निवडायची नाही, तर मग निर्णय घ्यायचा तरी कसा?

निर्णय घेणं अवघड नाही, आपण तो कसा घेतो हेच फक्त तपासायला हवं!

 
 
बारावीनंतर सर्वाचीच पावले करिअरची वाट चालायला लागतात. आपण जे करू त्यात यश मिळणारच, अशी खात्री असते. ‘चांदतारे तोड लाऊ, सारी दुनियापर मैं छाऊ, बस इतनासा ख्वाब है.’, असे अरमान सगळ्यांचेच असतात. खरंतर आपल्यात खूप धमक आहे, आपले निर्णय बरोबरच ठरणार, आपण हुशार आहोत, नसलो तरी मेहनती आहोत, कष्ट केले की फळ मिळणारच, असा भाव डोक्यात पक्का बसलेला असतो. 
जर आपणही करिअरच्या निवडीच्या या टप्प्यावर असाल तर हेच सगळं तुमच्या मनात असणार हे नक्की. जर तुम्हाला आता करिअरचा निर्णय घ्यायचा असेल तर एक करा, प्रामाणिकपणो तुमच्या मनाला विचारा की, आपल्या जवळपासची यशस्वी माणसं कोण आहेत? आपल्या नातेवाइकांपैकी कोणी आहे का? प्रसिद्ध उद्योजक आहे का? आपले फॅमिली डॉक्टर, आपला एखादा मित्र, एखादी मैत्रीण, आपण नेहमी ज्या बॅँकेत जातो तिथले कर्मचारी की अजून कोण? 
आपल्याला यशस्वी वाटणा:या लोकांची यादी करा. ही माणसं इतरांपेक्षा वेगळी आहेत का? काय वेगळेपण आहे त्यांच्यात? असे कोणते वेगळे गुण आहेत की, ज्यामुळे ते इतरांपेक्षा वेगळे वाटतात? असा विचार केला तर आपल्याला त्यांचे गुण सहजपणाने कळतात. त्यातून लक्षात येतं की, फक्त गुणवत्तेपलीकडे म्हणजे मार्कापलीकडे असं अजून काय आहे या माणसांकडे? आणि तसं आपल्याकडे काही आहे का, जे नाही ते शिकता येईल का?
प्रत्येकाला आपल्या करिअरचा निर्णय स्वत:लाच घ्यावा लागतो. अशावेळी असं वाटतं की एकवेळ शाळा- कॉलेजमधल्या परीक्षा देणं सोपं होतं; पण त्यानंतर वाढून ठेवलेली करिअरची निवड करणं अवघड. कारण ‘सध्याचा काळ ज्ञानाधारीत आहे.’, ‘हे माहितीचं युग आहे.’, ‘ज्याच्यापाशी आधुनिक शिक्षण असेल, त्याला आयुष्यात प्रगती करण्याची पूर्ण संधी आहे.’, असं जातायेता कोणी ना कोणी सांगत असतं. त्यातून करिअरच्या अतोनात संधी उपलब्ध आहेत. आपण महाराष्ट्रात राहतो, तो तर शिक्षणासाठी पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. आता तर इथल्या संस्थांची ख्याती परदेशांत पोहोचल्यामुळे तिथले विद्यार्थी भारतात- विशेषत: महाराष्ट्रात येऊन शिकतात. अशा वातावरणात आपणही मागे राहू नये, अशी इच्छा कोणाचीही असणार. 
शहरी भागात तर अक्षरश: हजारो प्रकारचे नवेनवे कोर्स चालतात. विविध भाषाशिक्षणापासून ते फोटोग्राफीर्पयत, कॉम्प्युटर, स्क्रिप्ट रायटिंगपासून इंजिनिअरिंग, मॅनेजमेण्टर्पयत सर्वकाही शिकवणा:या संस्था आणि व्यक्ती इथे आहेत. आपल्याला जे शिकायचं असेल ते शिकू शकतो, फक्त शिकण्याची इच्छा आणि पैसा पाहिजे. आत्ता पैसे नसतील तर शैक्षणिक कर्जाचीही सोय आहे. अशा वातावरणात कोणत्याही युवा मुला-मुलींना गांगरून जायला होणारच. नक्की काय करायचं, काय शिकायचं, शिक्षण कुठे थांबवायचं, कोणत्या क्षेत्रतली नोकरी लाभदायक, ती कुठे मिळेल, हे प्रश्न असतात. एकदा नोकरी मिळाली की प्रश्न संपला, असंही वातावरण नाही. नोकरीतही सतत नवीन गोष्टी, नवीन तंत्रं शिकत रहावी लागतात. अन्यथा मागे पडण्याचा धोका असतो. मिळालेली नोकरी टिकवून ठेवण्यात धन्यता मानण्याचाही काळ गेलाच. कितीही पगार असला आणि कामात समाधान असले, तरी नव्या संधी, अधिक पगाराची नोकरी प्रत्येकाला हवीशी वाटते, हे वास्तव आहे.
 
 
पण. मार्क फसवतात!
महाराष्ट्र बोर्डाने ‘बेस्ट ऑफ फाइव्ह’ ही योजना आणली. योजना चांगलीच आहे; मात्र त्यामुळे दहावीचे गुण वाढल्यासारखे वाटतात. 85 टक्क्यांच्या पुढे जाता येतं. आता एवढे गुण मिळालेत, तर चला सायन्सकडे, असं अनेकांना वाटतं. वास्तविक त्यांना मनातून चांगलं माहीत असतं की, आपला पिंड सायन्सचा नाही. आपल्याला इतर काही गोष्टी आवडतात, त्यात करिअर करायचं आपण ठरवतोय. पण मार्काचा मोठ्ठा आनंद झालेला असतो. पालकांचंही तेच मत असतं. म्हणून ते सायन्सकडे जातात. मार्कामुळे प्रवेश मिळतो, पण या विषयांची आवड असते का, असा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा.  
  म्हणून सुरुवातीलाच आपल्या मनाचा नीट कौल घ्यायला हवा. आपली ध्येयं काय आहेत, आपल्याला नक्की काय करायचंय, असे प्रश्न आधी विचारायला पाहिजेत. त्यादृष्टीने मनाशी काही एक आखणी सुरू असेल. या आखणीला आणि त्या प्रकारच्या योजनांचा पाया भक्कम असायला हवा. पण तो पाया म्हणजे काय?
करिअर ठरवताना नक्की कशाचा विचार करायचा?
तेच सांगणारी काही सूत्रं आहेत, ती लक्षात ठेवली तर तुमचा निर्णय सोपा होऊ शकतो!
 
- डॉ. श्रुती पानसे
 
 
करिअरचा निर्णय घेताय?
ही 1क् सूत्र लक्षात ठेवा.
 
 रिझल्ट 
ज्या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायला जास्त मार्काची अपेक्षा असते, त्यासाठी आधीपासून प्रयत्न करून तेवढे मार्क मिळवायलाच हवेत. पण मार्क जास्त मिळाले, म्हणून नको त्या विषयाकडे जाऊ नका. रिझल्ट आवश्यक आहेच, पण मार्क भरपूर मिळाले म्हणजे आपल्याला तेच काम करायचं, असं समजू नका.
 कल 
 आपल्याला करिअर म्हणून कशाची निवड करायला आवडेल, हे कदाचित धूसर असेल. माहिती नसेल. पण निदान काय करायला आवडणार नाही, हे तर नक्कीच माहीत असतं. जे आवडणार नाही, त्याची एक यादी करून टाका. 
 संधी 
 ‘मला आवडतं’ या एकाच कारणासाठी भलत्याच कोर्सला जाऊ नका. या क्षेत्रत पुढे नोकरी/ व्यवसायाची संधी आहे का, हे बघा. विचारा. एखाद्या ‘हटके’ क्षेत्रकडे जायचं असेल, तर संधी निर्माण करण्याची धमक तुमच्यात असली पाहिजे. ती आहे का आणि वर्षानुवर्षे कष्ट करण्याची तयारी आहे का, हे प्रॅक्टिकली तपासा.
 अनुभवींचा सल्ला 
गेल्या दोन वर्षात ज्यांनी करिअरचा निर्णय घेतला आह,े त्यांच्याशी बोला. यातले काही समाधानी असतील, तर काही असमाधानी असतील. त्यांचे अनुभव विचारा. दोघांकडूनही उपयुक्तच माहिती मिळेल. 
 अनुभवींचे निरीक्षण 
 आपल्याला जी करिअरची वाट निवडावीशी वाटते आहे, त्या वाटेवर आधी जे पोहोचलेत, प्रत्यक्ष कामाला लागले आहेत. त्यांच्या कामाचं, जीवनशैलीचं, ताणतणावांचं आणि अर्थातच पॅकेजचाही विचार करा. प्रत्यक्ष निर्णय घ्यायला याचा उपयोग होईल.
विविध टेस्ट 
  तुम्ही कदाचित वेगवेगळ्या सायकोलॉजिकल टेस्ट्स करून घेतल्या असतील किंवा करायच्या विचारात असाल, टेस्ट जरूर करा. टेस्ट योग्य प्रकारे झाली नाही, तर मनाचा गोंधळ उडवणारे निकाल येतात; पण आपल्या मनाचा कल तुम्हालाच जास्त कळतो, हे लक्षात घ्या.
कृतीचं काय?
 वयाच्या या टप्प्यावर बंडखोरी असते. पण, विचारांना कृतीची जोड मिळाली तर नव्या गोष्टी हातून घडण्याची शक्यता असते. ‘आउट ऑफ द बॉक्स’ म्हणजेच चौकटीबाहेर विचार करण्याची क्षमता प्रत्येकात असू शकते. या क्षमतेवर विश्वास ठेवा. मात्र नुसते खयाली पुलाव नकोत.
मैत्रीवर जबाबदारी नको 
 मित्रने किंवा मैत्रिणीने एखादी गोष्ट  ठरवली म्हणून तुम्ही ठरवली, असं नको. स्वत:चा निर्णय स्वत: घ्या. निर्णयाची जबाबदारी घ्या.
 नियोजन  
आपण नियोजन करण्यातच चूक केली, तर त्याचे दुष्परिणाम होतातच. त्यामुळं जे कराल त्याचं प्लॅंिनंग पक्कंहवं. निर्णय ठाम हवा.
प्रेशर कशाला?
आपला आयुष्यभराचा निर्णय कोणाच्याही अपेक्षांच्या दबावाखाली घेऊ नका. ज्या प्रकारचं काम करताना कंटाळा येणार नाही, उत्साह वाटेल, तीच वाट स्वीकारली पाहिजे. मग कुणी कितीही फोर्स केला तरी आपला निर्णय पक्का पाहिजे!