शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

कानातले घेताय?, तुमच्या चेह-याचा आकार ओळखून खरेदी करा ट्रेन्डी कानातले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2017 11:53 IST

आवडलं की घे कानातलं असं आपण करतोे, पण ते खरंच आपल्याला शोभतं का?

सजणंधजणं कानातल्यांशिवाय पूर्ण होणं अशक्यच. हल्ली तर फॅशननुसार, ट्रेन्डनुसार कानातले निवडण्याचा आग्रह असतो. पण कानातले निवडताना आणखी एका गोष्टीकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. चेहºयाच्या आकाराशी, रंगाशी सुसंगत कानातले घालणं फार महत्त्वाचं असतं. केवळ कानातलं छान आहे म्हणून ते आपल्या चेह-याला सुट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेहºयाशी सुसंगत असे कानातले घातले तर ते जास्त उठावदार दिसतात.चेह-याला काय शोभेल?१. आयताकृती चेहराकाहीसा उभट आणि रूंदीला कमी असा चेहरा म्हणजे आयताकृती चेहरा असं म्हणता येईल. हनुवटीपाशी हा चेहरा निमुळता झालेला असतो. अशा चेहºयाच्या मुलींनी साधारणत: थोडेसे लटकणारे पण भरगच्च असलेले कानातले घालावेत. भरगच्च म्हणजे द्राक्षाचा घड जसा दिसतो त्याप्रमाणे डिझाइन असलेले; पण हनुवटीच्या रेषेपर्यंत लांबीला असलेले कानातले. त्यानं चेहºयाला काहीसा भरीव आकारही येईल आणि हे कानातले खुलून दिसतील.२. चौकोनी चेहरालांबी, रूंदीला काहीसा समान असलेला हा चेहरा आणि हनुवटीही काहीशी चौकोनी असेल तर लांब, अंडाकृती आकाराचे, नाजूकसे कानातले निवडावेत. किंवा ठसठशीत असे टॉप्सही छान दिसतील. फक्त ते आकाराने मोठे आणि भरीव डिझाइन असलेले हवेत.३. बदामी चेहराचेहरा जर बदामी असेल तर झुमके वापरायला हवेत.४. अंडाकृती चेहराया चेह-याच्या तरुणींना कोणतेही कानातले छानच दिसतात. साधे टॉप्स, हलकेसे त्रिकोणी, लोंबते कानातले या चेहºयावर छान दिसतात.५. डायमंड चेहरासाधारणत: हनुवटीपाशी हा चेहरा लांब आणि निमुळता होत जातो. या चेहºयाच्या तरुणींना टेझल कानातले, मोठे झुमके छान दिसतात.६. गोलाकार चेहराया चेह-याला लोंबते, निमुळते किंवा टॉप्स छान दिसतात.- मोहिनी घारपुरे-देशमुख