शहरं
Join us  
Trending Stories
1
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
2
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
3
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
4
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
5
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
6
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
7
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
8
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
9
बंपर गिफ्ट...! या मल्टीबॅगर कंपनीनं १-२ नव्हे, वाटले तब्बल 24 बोनस शेअर, लोकांना केलं मालामाल; दिलाय 6100% हून अधिक परतावा
10
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
11
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
12
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
13
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
14
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
15
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
16
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
17
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
18
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
19
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
20
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
Daily Top 2Weekly Top 5

मनातलं बोलावं असं कुणीच नाही आयुष्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST

स्वत:च्याच ट्रॅपमधून मोकळं होण्याची सुरुवात.

ठळक मुद्दे मनातलं बोलता येत नाही, बोलत नाही, म्हणून आपण स्वतर्‍लाच खात राहतो, कुढत राहतो. हे कुढणं बंद होईल.

प्राची  पाठक 

आपण बोलतो, भरमसाठ गप्पा मारतो; पण म्हणजे नेमकं  काय करतो, हे कोणालाच नीट सांगता येत नाही. त्यातल्या किती गोष्टी आपण वरवरच्या बोलत असतो? नुसतंच काहीतरी बोलायचं म्हणून किती बोलतो? वेळ मारून न्यायला किती बोलतो? आपल्या मनात चालणार्‍या अनेक गोष्टींचा कसलाही थांगपत्ता लागू न देता इतर अनेक सतराशेसाठ गोष्टींवर बोलायचं स्किल अनेकांनी आत्मसात केलेलं असतं. कुणी घरीदारी जेवढय़ास तेवढं बोलणं पसंत करतात. कारण बोलणं म्हणजे त्यापलीकडे काही असतं, हे त्यांना माहीतच नसतं.नुसत्याच हवापाण्याच्या गप्पा मारणं म्हणजेही बोलणं नाही. त्यात मनातल्या अडीअडचणींचं शेअरिंग असतं का, हा मूळ मुद्दा आहे. तिशीर्पयतचा काळ हा अनेक मानसिक समस्यांनी डोकं वर काढायचा काळ असतो. याच काळात आपल्याला काहीच न बोलायची किंवा सोयीस्कर गप्प बसायची अथवा सहन करायची सवय लागते. आजूबाजूला प्रचंड स्पर्धा असते. आयुष्यात काहीतरी करून दाखवायचा ताण आपल्यावर असतो. या ताणामुळेदेखील कित्येकदा मनातलं बोलणं टाळलं जातं. मग परिस्थिती आणखी चिघळत जाते. आजूबाजूला अनेक लोक आहेत. फोनमध्ये स्टोअर केलेले कॉन्टॅक्टस ओसंडून वाहत आहेत. चॅट्सचे स्क्र ोल वाढत चालले आहेत, तरीही मनातलं बोलायला आणि ते शांतपणे ऐकून घ्यायला कोणी नाही ! ऐकून घेतलं तरी त्यावर शिक्के न मारणारे लोक दुर्मीळ. मनातलं न बोलण्यामागे हीच खरी भीती असते की आपल्या बोलण्याचा कोण कसा अर्थ लावेल?दुसर्‍याशी संवाद साधायची गाडी रु ळावरून घसरायला लागते ती इथे. 

* काय करता येईल? आपल्याला समजून घेईल असा एकतरी कान शोधणं, ही आपली खरी परीक्षा असते ! त्या परीक्षेला आपल्याला आधी बसावं लागेल. आपल्याला नेमकं काय जाचतं आहे, ते दुसर्‍यावर न थोपवता नीट सांगता येणं ही एक कला आहे. आधी थोडं अवघड जाईल; पण नक्की जमेल. मात्र दुसर्‍याकडून आपल्या आयुष्यातल्या प्रश्नांवर चटचट रेडिमेड उत्तरं मिळतील, असं गृहीत न धरता बोलायची सवय करावी लागेल आणि लगेच लोकं आपल्याशी बोलायला लागतील हा समजही बाजूला ठेवावा लागेल. मनातलं बोलायचा सराव करावा लागतो आणि त्याचीही सवय व्हावी लागते, हे आपल्याला हळूहळू समजेल. 

* त्याने काय होईल?1- आपल्या भावभावना समजून घेणारी हक्काची मंडळी आपल्या आसपासच दिसू लागतील. आपण एकटे पडणार नाही. 2- मनातलं बोलता येत नाही, बोलत नाही, म्हणून आपण स्वतर्‍लाच खात राहतो, कुढत राहतो. हे कुढणं बंद होईल.4- मोकळं झाल्यामुळे अंगावरचं ओझं एकदम उतरल्यासारखं वाटेल आणि मन प्रफुल्लित होईल.5- नवनवीन गोष्टी करून पाहण्याची, इतरांकडून शिकण्याची संधी उपलब्ध होईल.7- विश्वास ठेवण्याजोग्या अनेक व्यक्ती आजूबाजूला आहेत हे कळेल.