शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भला, उसकी लाइफ मेरी लाइफ से बेहतर कैसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:05 IST

तुमचं छान, आमचंही छान. इतरांबरोबर तुलना करण्याच्या भावनेचा फैसला

ठळक मुद्दे इतरांच्या आयुष्यात आपण भिंग लावून बसायची गरज नाही.

प्राची  पाठक

‘तो बघ किती पुढे गेलाय’. ‘ती बघ कसं मस्त करिअर करतेय’.‘त्याला मिळाली बाबा तिकडे अ‍ॅडमिशन, तूच राहून गेलास’. ‘तिने पटकावलाच तो जॉब’. ‘त्यांची लग्नं होऊन जातील, तुम्ही बसा इथेच’.अशा तुलनात्मक गोष्टींची सुरु वात आपल्या घरातल्याच लोकांनी केलेली असते. कधी कळत, कधी नकळत. अगदी शिक्षकसुद्धा सहजच कोणाची कोणाशी तुलना करून जातात. मग आपल्याला वाटायला लागतं, यार, यांचं तर सगळंच झकास आहे. कसं बुवा यांचं कायमच लकी असतं सगळं? आपल्याला वाटायला लागतं, ते आपल्यापेक्षा भारी आहेत आणि आपण मात्न एकदम कंडम ! आपण ज्यांना अगदी जवळचे समजतो, तेच काहीवेळा आपल्याला अगदी टोकाचे बोलून जातात. तेदेखील दुसर्‍याचे काहीतरी दाखवत ! दुसरीकडे आपल्या आतसुद्धा कळत-नकळत तुलना करण्याचा मोह, लोचा झालेला असतोच. त्यात सर्वात जास्त त्नासदायक असतं, ते दुसर्‍याचे चटचट बदलणारे लै भारी डीपी बघत राहणं. त्यांचे रोजरोज पडणारे स्टेट्स शांतपणे पाहत राहणं. त्यांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट्समधला आनंद पचवत राहणं. मनात अनेक शंका येतात. हे काय करत असतील? कुठून त्यांना पैसे मिळत असतील? इतके भारी कसे काय कायमच राहत असतील?  या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ताबडतोब हवी असतात. कधी कधी तर ती उत्तरं आपल्याला पाहिजे तशीच हवी असतात.  तिथेही आपण समोरच्या विषयीचा माझा अंदाज कसा बरोब्बर ठरला, या आपल्याच इगोला कुरवाळायची एक संधी शोधत असतो. 

* काय करता येईल?

लोकांचं छान, मस्त मजेत चाललं आहे आणि आपणच कसे एकदम कंडम, आपल्या आयुष्यात काहीच चांगलं, मनासारखं घडत नाही, या भावनांना आपण आधी आपल्या आयुष्यातून बाजूला सारू या. या सर्व भावनांना एकदाच काय ते बजावून टाकू, की तुम्ही निघा आता आमच्या मर्गातून.एक लक्षात ठेवायला हवं. आपले दुसर्‍या विषयीचे अंदाज, त्यांच्याकडून आपल्या गॅजेट्समध्ये नकळत येऊन पडणारी माहिती, यावर आपलं आयुष्य तरून जाणार नाहीये. इतरांच्या आयुष्यात आपण भिंग लावून बसायची गरज नाही. आपण आपल्याच झोळीत जरा डोकावून बघू. आपलं काय सुरू आहे, त्यावर जास्तीत जास्त फोकस ठेवायचा सराव नव्याने करायला शिकू. काय? 

* त्याने काय होईल?1- इतर काय करताहेत, त्यांचं कसं छान चाललंय, यापेक्षा आपण काय करतोय आणि आपल्याला काय करायचंय, यावर फोकस करता येईल.2- आपल्या जमेच्या आणि वजाबाकीच्या गोष्टी कळतील आणि त्यावर काम करणं सोपं जाईल.3- नकारात्मक दृष्टिकोन दूर होऊन पॉझिटिव्हली पाहायला शिकता येईल. 4- दुसर्‍यांकडे पाहून त्यावर आपलं आयुष्य बेतण्याची घातक सवय मोडेल.