शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

सेक्स एज्युकेशन, प्रश्न विचारा, समजून घ्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:10 IST

कन्फ्यूजन’ दूर करून, आपल्या भाव-भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शिकवण

ठळक मुद्देआपल्या शरीरात जे बदल होत असतात, ते कोणते, काय आणि का होतात हे कळेल.

प्राची  पाठक

येता-जाता बलात्काराच्या बातम्या. रोज नवीन केस, नवीन व्यथा. अतिशय अमानुष असं काहीतरी घडलेलं असतं. त्यात आपण मुलगी असू, तर आणखीन घाबरून गेलेलो असतो. त्यात लोकांच्या सतराशेसाठ सूचना. कोणते कपडे घालावे, घरी कधी यावे, कोणाच्या कुठे, कसे मारावे. कळत-नकळत आपण तरु ण आहोत आणि आपल्याला समाजात राहायचं तर तरु ण मुलगी म्हणून अमुक वागावं आणि तमुकच करावं हे ऐकून घ्यावंच लागणार आहे, असंही आपलं कंडिशनिंग व्हायला लागतं. दुसरीकडे याच वयात कुणीतरी आवडायला लागतं, मुलांबद्दल आकर्षणसुद्धा वाटत असतं. मैत्रिणी वेगळीच खुसपूस करत बसतात.  तेच मुलग्यांचंही. एखाद्या मैत्रिणीशी जरासं बोलायचं म्हटलं तरी कुठली कुठली पथकं आपल्याला पकडून नेतील, याची भीती बसते. एकीकडे मुलींविषयीचे मनातले आकर्षण आणि दुसरीकडे आजूबाजूला प्रचंड दरारा-भीती-शंका असं वातावरण. यासगळ्यात कुठे शाळा-कॉलेजात शिक्षक स्वतर्‍च लाजत लाजत, अतिशय ऑकवर्ड होत चटकन काहीतरी लेक्चर उरकून टाकावं, काहीतरी घाण संपवून टाकावं अशा पद्धतीने हा विषय शिकवल्याचा  टिकमार्क करतात. त्याला नाव शारीरिक शिक्षण किंवा लैंगिक शिक्षण. आजूबाजूला असे प्रकार सुरू असताना गद्धे पंचविशीच्या शरीरातले केमिकल लोचे मात्न आणखीन उफाळून येत असतात. कोणीही धडपणे आणि थेट काही सांगत नाहीत. सतत आडून, लपून काहीतरी सुचवत मात्न राहतात. ‘पाय घसरणे’, ‘माती खाणे’, ‘लफडं’, ‘प्रकरण’ वगैरे शब्द कुजबुजत आपल्यार्पयत येत राहतात.

* काय करता येईल?शरीरसुद्धा आपलंच आहे. आपल्या शरीराविषयी, या वयात होणार्‍या शारीरिक, मानसिक बदलांविषयी, आपल्या लैंगिकतेविषयी आपल्याला काही शंका असतील तर त्याविषयी अधिक, योग्य ते ज्ञान घ्यायला काय हरकत आहे? आपल्या मित्र-मैत्रिणींनी सांगितलेली, ऐकिव माहिती बरोबरच आहे, याची खात्री काय? आपणच योग्य तज्ज्ञांना गाठून याविषयी शास्रीय माहिती मिळवायला काय हरकत आहे? एखादा छोटा ग्रुप करून जाऊ तज्ज्ञांकडे किंवा त्यांना आपल्याकडे बोलावू. त्यांच्याशी या विषयावर गप्पा मारू. प्रश्न विचारू. मनातल्या प्रश्नांची उत्तरे मिळवायचा प्रयत्न करू. काही ऑथेंटिक रीडिंग मटेरियल, काही चांगली पुस्तके, चांगल्या वेबसाइट्स कळतात का याविषयी बोलू या, ते शोधू या. आपल्या लैंगिकतेशी आपणच संवाद साधून बघू या.  

* त्याने काय होईल?1- आपलं शरीर, प्रेम, लैंगिकता याविषयी अनेकांनी चुकीची, अयोग्य किंवा अपुरी माहिती देऊन आपल्याला कन्फ्यूज करून ठेवलेलं असतं, ते कन्फ्यूजन दूर व्हायला मदत होईल.2- आपल्या शरीरात जे बदल होत असतात, ते कोणते, काय आणि का होतात हे कळेल.3- आपल्या भाव-भावनांवर नियंत्रण कसं ठेवायचं, सभ्य माणूस म्हणून कसं जगायचं, हे शिकता, समजता येईल.4- ‘नाही’ म्हणजे काय, दुसर्‍याच्या भावनांचा कायम आदर करायचा असतो याचं भान येईल. 5- अतिरेकी आणि खुळचट कल्पना सोडून सत्य आणि शास्रीय माहिती मिळाल्यामुळे स्री-पुरुषाविषयी, मित्र-मैत्रिणींविषयी आदराची, समानतेची भावना वाढीस लागेल.6- एखादा मुलगा ‘गर्लिश’ दिसतो, किंवा एखादी मुलगी ‘टॉम बॉईश’ वाटते, यावरून त्यांच्याविषयी काहीतरी बोलणं किंवा त्यांच्यावर नको ते शिक्के मारणं बंद होईल.