शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : हवामान विभागाने दिली खुशखबर! मान्सून या दिवशी केरळात दाखल होणार; महाराष्ट्रात कधी?
2
मंत्रिमंडळाचे जिल्हा असंतुलन; ५७ टक्के मंत्री ७ जिल्ह्यांतून, १५ जिल्हे मात्र मंत्र्यांविना वंचित
3
पत्नी आजारी होती, बदली केली नाही; माजी सरन्यायाधीशांचे नाव न घेता न्यायमूर्तींची निरोप समारंभात नाराजी
4
दहशतवादी हल्ल्याचा कट अन् प्रशिक्षणासाठी तरुणांना पाकमध्ये पाठवले; शहजादचे धक्कादायक खुलासे
5
इस्रायल इराणच्या अण्वस्त्र ठिकाणांवर हल्ले करण्याच्या तयारीत; अमेरिकन गुप्तचरांच्या दाव्याने खळबळ
6
लग्नाच्या ३४ वर्षांनंतर पतीसोबत घटस्फोट घेणार अर्चना पूरण सिंग? अभिनेत्री म्हणाल्या- "आम्ही भांडतो, पण..."
7
जान्हवी कपूरचा कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा, अभिनेत्रीच्या ग्लॅमरस लूकवरुन नजरच हटेना
8
मोठा खुलासा! हेर तारिफने दिलेल्या माहितीवरूनच पाकिस्तानने सिरसावर डागले होते क्षेपणास्त्र
9
१२वी नापास सायबर गुन्हेगार, 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान करत होता देशविरोधी काम! एटीएसकडून अटक
10
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
11
Operation Sindoor : सुवर्ण मंदिरात एअर डिफेन्स गन तैनात केली होती? भारतीय सैन्याने दिली माहिती
12
वेगवान वाऱ्यासह कोसळलेल्या पावसानं ठाणे, रायगड, पालघरला झोडपलं; कोकण रेल्वेलाही फटका
13
सरन्यायाधीश आले तर... न्या. गवई यांच्या जाहीर नाराजीनंतर सरकारने काढले आदेश
14
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
15
मुसळधारेने दाणादाण,  राज्यात वीज पडून ४ ठार; मान्सूनपूर्व वादळी पावसाने राज्याला झोडपले
16
भारत-पाक संघर्षावेळीही ज्योती ‘आका’च्या संपर्कातच एनआयए, आयबीकडून चौकशीतून निष्पन्न
17
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ, मित्रांंसाठी खर्च कराल...
18
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
19
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस

छोटी छोटी बातें खुद कर के तो देखो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:00 IST

घरातल्या लहान-मोठय़ा दुरुस्त्या शिकून ‘सेल्फ सफिशन्ट’ होण्यातला आनंद.

ठळक मुद्देगोष्टी सोप्या, पण करु तेवढं कमी आहे हे कौशल्य शिक्षण.

प्राची  पाठक

अचानक फ्यूज गेला, इलेक्ट्रिशिअन मिळत नाहीये. बाथरूमच्या दाराची कडी निखळून पडलीय, त्यामुळे दरवाजा बंद करण्यासाठी दारामागे धुण्याच्या बादल्या आपण लावतोय. मिक्सरच्या प्लगची वायर निसटलीय, त्यामुळे खोळंबा झालाय. पण कोण करत बसेल ते? प्रत्येकजण दुसर्‍याने ते करावं अशी वाट पाहत असतो. आपल्याला त्यातलं अगदीच काही जमत नाही, जमणार नाही, अशातला भाग नसतो; पण आपल्याला ते करायचंच नसतं. लोढणं म्हणून आपण त्याकडे पाहत असतो. घरातल्या अगदी लहानसहान गोष्टी, त्या बिघडल्या किंवा त्यात छोटीशी जरी दुरुस्ती निघाली, तरी त्यानं फार बिघडतं अशातला भाग नाही; पण त्रास होतोच. वेळ जातो. सगळ्यांचीच चिडचिड होते. या छोटय़ा-मोठय़ा दुरुस्त्या, मेंटेनन्स वेळेवर होत नाहीच, उलट मग आपण त्यावर पर्याय शोधत बसतो. यात वेळ, पैसा तर खर्च होतोच; पण कामाचा खूप मोठा खोळंबा होतो.

* काय करता येईल?घरातली कामं करणं, छोटा-मोठा मेंटेनन्स करता येणं, ही खरं तर खूप मोठी स्किल्स असतात. ही स्किल्स आपल्याला यायलाच हवीत. दुसर्‍यांवरचं अवलंबित्व आपण त्यामुळे कमी करीत असतो. साधं दाराला तेल सोडणे हीसुद्धा एक कला आहे. दाराला नुसतेच भसाभस तेल सोडून भागत नाही. नंतर तिथे घाण चिकटून बसते, जाळी, जळमाटी चिकटतात. तेल सोडताना भिंतीचा रंग खराब होऊ शकतो. फरशीवर तेलाचे थेंब पडून डाग पडतात. हे साधंसं कामसुद्धा आपल्याला खूप काही शिकवून जाऊ शकतं. एकदा करून तर बघा. आपल्या वापरत्या वस्तूंवर एक नजर टाका. दुरु स्त्या करायच्या शेकडो संधी उपलब्ध होतील. आपले शूज बघा. त्याचं काहीतरी निघालेलं असतं. त्याला काहीतरी चिकटलेलं असतं. लेस उलटी-पालटी झालेली असते. तिचे धागेदोरे कुठून बाहेर आलेले असतात. शूजच्या आत काहीतरी टोचत असतं. या सगळ्याचा मेंटेनन्स करणं, ही एक आनंददायी प्रक्रि या असू शकते. आपण रोज वापरतो ती बॅग/सॅक बघा. त्याच्या पट्टय़ांचं सेटिंग नीट करता येतं का ते बघा. त्याची चेन नीट चालू आहे की नाही ते तपासा. जास्तीचे लोंबकळत असलेले धागे-दोरे नीट पाहून कापून टाकता येतात. जरासं कुठे उसवलं असेल, तर ते शिवून घेता येतं. ते शिवायचं कसं ते शिकता येतं. चेन बसवायला शिकता येतं. त्यासाठी फार कुठले टूल्सदेखील लागत नाहीत. घरातलीच कात्नी, हातोडी, एखादी पकड किंवा चिमटा, एखादं रनर, एखादा सुईदोरा इतकं पुरेसं असतं. गोष्टी सोप्या, पण करु तेवढं कमी आहे हे कौशल्य शिक्षण.

* त्याने काय होईल?1- घरातल्या बारीकसारीक गोष्टी करता येणं, कामातल्या परफेक्शनसाठी महत्त्वाच्या आणि अत्यंत आनंददायीसुद्धा असतत, हे कळेल.2- अशा चटकन छान पूर्ण होणार्‍या दुरु स्त्या आपल्याला ‘सेन्स ऑफ कम्प्लिशन’चा अनुभव देतात. 3- त्यातून आपल्यालाच आपल्याबद्दल एक ‘फील गुड’ फॅक्टर मिळत जातो. 4- आपण एकातून दुसर्‍या गोष्टी करून बघतो, त्या यशस्वीरीत्या पूर्ण करायला शिकतो. शिवाय आयुष्यभराचं ते लर्निगही असतं