शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

ब्रेकलेस आनंदाची बिन्धास्त cycle

By admin | Updated: May 4, 2017 06:55 IST

सायकलने तरुण जगण्यात एक जोरदार एण्ट्री मारली आहे, आणि अनेकजण सायकलवर स्वार होत फिटनेसच्याच नाही, तर आॅफिसच्या दिशेनंही निघालेत. जगण्याचं झपाटलेपण देणारी ही सायकल नक्की देतेय काय तरुण मुलांना?

 सायकल. हा एक शब्द आपल्यातलं पॅशन जागं करतोच..लहानपणी शिकलेली सायकल, कुणीतरी धरलेलं कॅरिअर, दोस्तांसोबत दामटलेली सायकल आणि रस्त्यात सतत पडत्या चेनवरून खाल्लेल्या मित्रमैत्रिणींच्या शिव्या..हे सारं सायकल मेमरी नावाच्या फोल्डरमध्ये आॅटो ओपन होतंच..पण आपण कॉलेजात जायला लागलो की काय होतं त्या सायकलचं?बाइक येते, आणि सायकल सायडिंगला जाते..मात्र अनेक तरुण मुलांच्या आयुष्यात या सायकलनं आता रिएण्ट्री घेतली आहे, पण पॅशचा तडका मात्र तोच..सायकल म्हणजे गरिबांची गाडी असं म्हणणारे आउटडेटेड ठरावेत, कारण चारचाकीची ऐपत असली तरी सायकलनेच आॅफिसला जाणारी अनेक मुलंमुली आता पुण्या-मुंबईतसुद्धा आहेत.. रोज सकाळी काही किलोमीटर नियमित सायकलिंग,ते सायकलवरून काढलेल्या मोहिमा,सायकल क्लब,सायकल कट्टे,सायकल क्लब.. अशी नावं बदलती दिसतील प्रत्येक शहरात, पण त्यातलं वेड आणि झपाटलेपण मात्र सारखंच आहे. आणि वाढतंही आहे.म्हणून तर अनेक शहरांत आता सायकल क्लब आहेत. ते पहाटे सायकल काढून फिरतात, चांदण्यातलं सायकलिंग करतात. कुणी रविवार मोहिमा करतं, तर कुणी सायकलवरून एकटंच फिरून येतं मनसोक्त..स्वत:ला हवं तसं फिरण्याची स्वस्त आणि मस्त हमी आणि पूर्ण स्वातंत्र्य ही सायकल देते..इंधन लागतं ते केवळ झपाटलेल्या मनशक्तीचं आणि मिळणाऱ्या आनंदी ऊर्जेचं!अशाच काही सायकलवेड्या दोस्तांची, रोजचं सायकलिंग जगणाऱ्या तरुण मुलांची एक खास भेट  .आणि सायकलिंग करताना मारल्या जाणाऱ्या प्रत्येक पेडलमधून मिळणाऱ्या आनंदाचं रहस्य..आणि हे सायकलिंगचं प्रेम फक्त आपल्याकडेच नव्यानं आलं आहे असं वाटत असेल तर एक बातमीही हाताशी ठेवा. भविष्यात वाढणाऱ्या बाजारपेठेत सायकल उद्योग नव्यानं वाढत असून, येत्या २०२२ पर्यंत जगभरातला सायकल उद्योग ३४९० कोटी डॉलर्सच्या आसपास पोहचलेला असेल. आणि लहान मुलांच्या सायकल्सपासून माऊण्टन सायकलपर्यंत सगळ्यांचा त्यात समावेश असेल..हा उद्योग वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे जगभरातले जागरूक तरुण आता स्वत:ला विचारू लागलेत की आपण प्रदूषण करणाऱ्यांतल्या गटातले की न करणाऱ्यांतल्या?प्रदूषण न करणारा गट सायकलवर स्वार होत गाणी गात पुढे निघालेला दिसतोय हे खरं.. आॅक्सिजन टीम