शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

फॉरीनच्या कॉलेजात बोगस प्रवेश

By admin | Updated: April 28, 2016 13:52 IST

अमेरिकाच नाही, तर जगभरात अशा बोगस विद्यापीठांत प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना गंडवणारे शिक्षणमाफिया आॅनलाइन जाळं टाकून बसले आहेत, तेव्हा सावधान !

 - रवींद्र राऊळ

( लेखक ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीत मुख्य वार्ताहर आहेत.)

विद्यापीठ बोगस.प्रवेशही बोगसच.पण शिकत असल्याचं प्रमाणपत्र खरं,आणि ते वापरुन स्टुडण्ट व्हिसा मिळवतअमेरिका गाठणारे बहाद्दरही अनेक !अशाच काही बहाद्दरांना अमेरिकनप्रशाननाने अलीकडेच बेड्या ठोकल्या.मात्र त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांच्याअमेरिकन विद्यापीठातील प्रवेशासंदर्भातलेप्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.अमेरिकाच नाही, तर जगभरात अशा बोगस विद्यापीठांत प्रवेश देऊन विद्यार्थ्यांना गंडवणारे शिक्षणमाफिया आॅनलाइन जाळं टाकून बसले आहेत, तेव्हा सावधान !अमेरिकेत जायचं, तिथं शिकायचं या इच्छेपायी वाट्टेल ते करत तिकडं धाव घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथल्या बोगस विद्यापीठांकडून कसं गंडवलं जातं, हे नुकत्याच अमेरिकेत झालेल्या एका स्टिंग आॅपरेशनमधून उघड झालंय. महत्त्वाचं म्हणजे, व्हिसा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी खुद्द अमेरिकन प्रशासनानेच हे स्टिंग केलं होतं. आणि त्यात सापडलेल्या दहा भारतीय अमेरिकनांसह एकूण २१ जणांना बेड्या ठोकल्या. आपण विदेशात शिकायला जावं, बडी डिग्री कमवावी अशी महत्त्वाकांक्षा बऱ्यापैकी हुशार विद्यार्थ्यांची असते. हल्ली तर त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या पालकांना वाटतं की, करू पैसे खर्च पण आपल्या लेकावर ‘फॉरीन रिटर्न’ असल्याचा ठप्पा बसला पाहिजे. त्यामुळेच स्कॉलर विद्यार्थी भारतात शिक्षण घेण्याऐवजी पाश्चिमात्य देशात कुठे शिक्षणाची संधी मिळते का, हे पाहण्यासाठी वेबसाइट धुंडाळू लागतात आणि बहुतेकजण इथंच ‘बकरे’ बनतात.. कसंही करून तिकडे जाऊ पाहणारी मुलं आणि त्यांचे पालक आॅनलाइन सापडले की परदेशातील बोगस विद्यापीठं त्यांची नेमकी शिकार करतात. निरज जानी. त्याची मेलबर्नमधील एका नामांकित विद्यापीठात प्रवेश घेण्याची इच्छा होती. पण तो पडला मध्यमवर्गीय. प्रवेश मिळाला तरी भरमसाठ फी कशी भरायची, ही विवंचना त्याला होती. कारण फीसोबत तिथं राहण्याचा, प्रवासाचा खर्चही अव्वाच्या सव्वा होता. त्याने वेबसाइटवर शोधाशोध केली तेव्हा त्याला मेलबर्नमधील दुसरं एक विद्यापीठ सापडलं. फी माफक आणि वसतिगृहाचीही सोय. तो हरखून गेला. पैशांची जमवाजमव करून त्यानं मेलबर्न गाठलं. मात्र त्या विद्यापीठाची मोडकळीस आलेली इमारत पाहूनच त्याला शंका आली. पण आता इलाज नव्हता. त्यानं तिथं शिकायला सुरूवात केल्यानंतर काही दिवसातच त्याला त्या विद्यापीठाचा दर्जा समजला. चौकशी केल्यानंतर कळलं की त्या विद्यापीठाला तिथल्या शिक्षण विभागाची मान्यताच नाही. तो हैराण झाला. घरच्यांना कळवलं आणि नाइलाजानं सहा महिन्यांतच भरलेल्या फीवर पाणी सोडत दुसऱ्या मान्यताप्राप्त विद्यापीठात कसाबसा प्रवेश घेतला.निरजचं हे उदाहरण अपवाद नाही. दरवर्षी दोन लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. काही जण मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थांमध्ये प्रवेश घेण्यात यशस्वी होतात. पण हजारो विद्यार्थी बोगस विद्यापीठांमध्ये पैशापरी पैसा घालवून आणि मन:स्थिती बिघडवून माघारी येतात. विदेशी शिक्षण या दोन शब्दांना भुलणाऱ्या मुलांना आणि पालकांना आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी आता शिक्षणमाफिया सक्रिय झाले आहेत. चकाचक वेबसाइट सुरू करून, त्यावर कॅम्पसचे आकर्षक फोटो टाकून विद्यार्थ्यांना गळाला लावलं जातं. ९0 च्या दशकापर्यंत अशा बोगस शिक्षणसंस्था जगभरातही तशा एकूण कमी होत्या. पण संगणक युग आलं आणि माहितीजालाचा गैरफायदा घेत शिक्षणाचा काळाबाजार वाऱ्याच्या वेगाने फैलावत गेला. सायन्सपासून आटर्स आणि उद्योगापासून ते लॉ, मेडिकलपर्यंतच्या डिग्य्रा देणारी बोगस विद्यापीठं जगभरात निघाली. एका अंदाजानुसार बोगस विद्यापीठांच्या या गोरखधंद्यात वार्षिक उलाढाल तब्बल ७00 दशलक्ष डॉलर्सच्या घरात आहे. हे एकीकडे आणि दुसरीकडे अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांचं प्रमाण भारतातच नाही तर जगभरात खूप आहे. वेबसाइट धुंडाळली, प्रवेश इच्छा व्यक्त केली की अनेकदा तिथल्या एखाद्या विद्यापीठात प्रवेश दिल्याचा ईमेल येतो. फी भरली की लगेच स्टुडंट व्हिसा मिळवण्यासाठी पत्र दिलं जातं. व्हिसा मिळण्याची मारामार असलेल्या अमेरिकेकडून त्या पत्राच्या आधारे मात्र स्टुडंट व्हिसा मिळवता येतो. या ना त्या कारणाने अमेरिकेत राहू इच्छिणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. म्हणून मग अशा बोगस विद्यापीठांकडून तिथं शिक्षण घेत असल्याचं पत्र मिळवून स्टुडंट व्हिसा पदरात पाडून घेण्याचे उद्योगही अनेकजण करतात. अशा इच्छुकांना आणि त्याचबरोबर खरोखरच तेथे शिकू इच्छिणाऱ्यांना बोगस विद्यापीठातील प्रवेशपत्र मिळवून देणारं रॅकेटच सुरू असतं. अनेक एजंट ते काम करीत असतात. शिक्षण विभागाची मान्यता नसलेल्या बोगस विद्यापीठांचा मुख्य व्यवसाय म्हणजे व्हिसा मिळवण्यासाठी गिऱ्हाईकांना आपल्या तथाकथित विद्यापीठात प्रवेश देणं. अशा बोगस विद्यापीठांच्या असंख्य वेबसाइट्स तयार आहेत. इंटरनेट फ्रॉडचाच हा प्रकार. दक्षिण आफ्रिकेत काही दिवसांपूर्वी अशा ४२ कॉलेजांवर बंदी आणली होती. जगभरात हा विषय गंभीर बनतो आहे. परदेशी शिक्षणाची स्वप्नं पाहणाऱ्या जेमतेम आर्थिक स्थितीतल्या मुलांची मात्र या साऱ्यात ससेहोलपट होेते आहे. त्यांची फसवणूक होण्याचा धोकाही वाढला आहे. अनेकदा तर तिथं पोहचल्यावर ही फसवणूक लक्षात येते आणि कडवट अनुभव गाठीशी घेतच ही मुलं मायदेशी परततात. शिक्षण आणि करिअरची वाताहत होेते ती वेगळीच ! त्यामुळेच हुरळून न जाता, प्रलोभनांना न भुलता योग्य खातरजमा करूनच परदेशी कॉलेजात प्रवेश घेणं, हीच एकमेव काळजी विद्यार्थी या साऱ्यात घेऊ शकतात. सतर्कता हाच उपाय !!डिग्री विकत घेणारे श्रीमंतअभ्यासात गती नसलेली अनेक बड्या धेंडांची मुलं इथल्या कॉलेजांमध्ये जाऊन अभ्यास बिभ्यास करायच्या भानगडीत पडत नाहीत. त्यापेक्षा अशा फॉरीनच्या बोगस विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊन बऱ्यापैकी मोठा परदेश दौरा करतात. कॉलेजातून प्रोजेक्ट वगैरे करायला सांगितला की तिथली हुशार मुलं भरघोस रक्कम घेऊन प्रोजेक्ट करून देतात. येताना ही पोरं डिग्री मिरवतच येतात. अनेक राजकारण्यांची मुलं अशा मार्गानेच ‘उच्चविद्याविभूषित’ झालेली पाहायला मिळतात.अवघ्या पंधरा दिवसात पीएचडीकेपटाऊन येथील उच्च शिक्षण आणि प्रशिक्षण विभागाने गेल्या वर्षी अशा बोगस विद्यापीठांची झाडाझडती घेतली तेव्हा एका आॅनलाइन विद्यापीठात चक्क पंधरा दिवसात पीएचडी सन्मानपूर्वक प्रदान केली जात असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली. याशिवाय कोणतीही पदवी केवळ पैसे भरले की आठ दिवसात आपल्या हाती पडते. विशेष म्हणजे, अनेक बोगस विद्यापीठांनी उच्च शिक्षण विभागाची आपल्याला मान्यता असल्याचं दडपून सांगत त्यांचा लोगोही आपल्या वेबसाइटवर झळकवला होता. असं झालं अमेरिकन स्टिंगबोगस प्रवेश रॅकेटना आळा घालण्यासाठीच अमेरिकन प्रशासनाने हे स्टिंग आॅपरेशन केलं. त्यासाठी त्यांनी स्वत:च एक बोगस विद्यापीठ स्थापन करून त्याद्वारे एक हजाराहून अधिक विदेशींना विद्यार्थी आणि रोजगार व्हिसा देऊ केला. विदेशींना बेकायदा व्हिसा मिळवून देणाऱ्या दलालांनी २६ देशांतील एक हजार परदेशी नागरिकांना या बोगस विद्यापीठात प्रवेश मिळवून देत स्टुडंट व्हिसा आणि परदेशी कामगार व्हिसा त्यांच्या पदरात टाकला. या सगळ्याची नोंद घेत संबंधितांना अटक करण्यात आली. प्रशासनाने स्वत: अशा प्रकारचं स्टिंग करून कारवाई करण्याचा प्रकारही विरळाच.फॉरीनच्या कॉलेजात प्रवेश घेताय?हे तपासा..*फसव्या जाहिरातींपासून सावध राहा. *एजंटांच्या आमिषांना बळी पडू नका.*संबंधित सरकारच्या शिक्षण विभागाची या विद्यापीठांना मान्यता आहे का, ते तपासा. बहुतेक शिक्षण विभागांनी आपल्या हेल्पलाइनवर अशी माहिती पडताळून पाहण्याची व्यवस्था केली आहे. *वेबसाइटवरचा मजकूर काळजीपूर्वक तपासा. तेथे संपर्कासाठी केवळ पोस्ट बॉक्स नंबर दिलाय का? मग नक्कीच काहीतरी गडबड आहे. जर जेन्यूअन विद्यापीठ असेल तर वेबसाइटवर पूर्ण पत्ता हवा. *प्राध्यापक कोण आहेत? त्यांची विश्वासार्हता तपासा. आवश्यक वाटल्यास विद्यापीठाबाबत खातरजमा करण्यासाठी सोशल मीडियाचाही वापर केला जाऊ शकतो.