नाव : विनायक पाचलग
पुस्तकाचं नाव - कन्फ्युजन, कम्युनिकेशन, कनव्हिक्शन कधी प्रसिद्ध झालं? - एप्रिल 2क्14
पुस्तकात काय आहे ? - तीन विभागात विभागलेले 3क् लेख. गेल्या 6-7 वर्षात इंजिनिअरिंग करताना आणि सोबत विविध क्षेत्रत मुशाफिरी करताना आलेले अनुभव, पडलेले प्रश्न. पुस्तक आवडलं असं सांगणारी कॉमेण्ट - माङया एका मित्रची - त्यानं पुस्तक घेतलं, पूर्ण वाचलं आणि मग मेसेज पाठवला, ‘आयुष्यात पहिल्यांदा तुङयामुळं मराठीतलं काहीतरी संपूर्ण वाचलं!’ पुस्तक भिकार आहे, यातले संदर्भ अजिबात आवडले नाहीत असं सांगणारी कॉमेण्ट - अगदीच आवडलं नाही असं सांगणारं अजून कोण भेटलं नाही पण, साधारण पन्नाशीतल्या एका गृहस्थांनी ‘‘हे फार डिफेन्सिव्ह वाटतं’’अशी कॉमेण्ट दिली होती.
आपणच एक पुस्तक लिहावं असा किडा कधी, कसा आणि का डोक्यात आला?
- खरं तर स्वत:चं पुस्तक असावं, असं अगदी लिहायला लागल्यापासून मनाच्या कोप:यात कुठंतरी होतंच. ब्लॉग, विविध वृत्तपत्रंत वेगवेगळ्या विषयावर स्तंभ, प्रासंगिक लिखाण असा बराच प्रवास झाला. पण इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला आल्यावर मात्र आपण जे काही लिहितोय ते फारं सुटं सुटं आहे, असं वाटू लागलं. मी आजूबाजूला जे पाहत होतो ते माझं जग, समाज खूप सा:या उत्साहवर्धक गोष्टींनी पण त्याचवेळी वेगवेगळ्या अंतर्विरोधांनी भरला आहे हे जाणवत होतं. आपल्या जगण्याचा एकसंध अनुभव मांडणारं पुस्तक करायचं असं मग मी ठरवलं.
हल्लीची मुलं कुठे वाचतात? आपलं पुस्तक कोण वाचणार असा संशय-प्रश्न-शंका मनात आली नाही का ?
- आजच्या मुलांना मराठी वाचायला लावणं हाच खरा या पुस्तकाचा उद्देश आहे. आजची मुलं वाचतात हे 1क्क् टक्के माहीत होतं. पण त्यात मराठी वाचन नगण्य असतं हे अनुभवानं कळलं होतं. याच एक कारण म्हणजे इंग्लिश पुस्तकं त्यांना रिलेट करता येतात स्वत:च्या जगण्याशी; पण त्यामानानं मराठीत त्याचं असं काही नाही असं मनापासून वाटत होतं. दुजर्य दत्ता, सुदीप नगरकर, निकिता सिंग अशांच्या पुस्तकावर माङया आजूबाजूच्या तरुणांच्या उडय़ा पडत होत्या. कारण, ते आमचं जगणं लिहीत होते. वयाने तरुण होते. पण, तरुण मराठी लेखक सांग? असं म्हटल्यावर उत्तर मात्र मिळत नव्हतं. धर्मकीर्ती सुमंत, क्षितिज पटवर्धन, समीर विद्वांस, संकल्प गुजर्र अशी काही नावं मला माहीत होती. पण जवळपास ही सगळीच नाटकं किंवा सिनेमा लिहिणारी किंवा क्वचित नियतकालिकात लिहिणारी, व्यावसायिक शिक्षण घेणा:या कित्येकांना ती माहीत नसायचीच. मग जे वाटतं ते आपणच का लिहू नये, असं वाटून हे पुस्तक लिहिलं.
नेट लावून काहीतरी लिहायचं म्हणजे पेशन्स लागतो. तो कुठून-कसा आणला?
पेशन्स खूप लागतो हे खरं. त्यामुळे ही पुस्तकाची प्रोसेस खूप लांबली. लास्ट इयरच्या सुरुवातीला काम सुरू केलं आणि वर्षाच्या शेवटी पुस्तक हातात आलं. इंजिनिअरिंगचं सेमिस्टर, कॉलेजमध्ये वेगवेगळे उपक्रम, यात लिखाणाला वेळ मिळायचा नाही.
या प्रोसेसने तुला काय शिकवलं ?
अगदी खरं सांगायचं या सा:या प्रोसेसमध्ये मला स्वत:ला शोधता आलं. माङो नक्की विचार काय आहेत, माङया धारणा, माङो विकनेसेस सगळं समजायला लागलं. जेव्हा एखाद्या विषयावर तुम्ही ठाम भूमिका घेता तेव्हा तुम्हाला स्वत:चे विचार क्लिअर असावे लागतात. ते क्लिअर करता आले. स्वत:चा आवाका, लिमिटेशन्सही समजल्या. अजून खूप खूप शिकायचं, समजून घ्यायचं आणि करायचं बाकी आहे याची स्पष्ट जाणीव झाली.
आपल्या पिढीचं खरं म्हणणं, जगणं काय आहे ते कोणीच लिहीत नाही असं वाटतं का?
मुळात आजची पिढी म्हणजे नक्की काय? ते तरी ठरवलं का आपण? व्हॉट्सअॅप, फेसबुक, मोबाइल सा-याने एका समान पातळीवर आलेले पण तरीही स्वत:ची वेगळी चौकट आणि ओळख असलेले आम्ही आहोत. खेडेगावातला एखादा मुलगा, मुंबईतला कॉलेजयुवक आणि परदेशातले कोणीतरी जेव्हा माध्यमांद्वारे कनेक्टेड असतात, तेव्हा त्यांची पिढी एकच असते. पण जेव्हा ते जगत असतात, तेव्हा त्यांचा, आजूबाजूचा समाज वेगळा असतो. आजच्या पिढीनं पाहिलेलं जग, मिळणारा स्कोप आणि आजूबाजूची रिअॅलिटी यात अंतर आहे आणि त्यातच खरी गंमत आहे. ती लोकांसमोर आली पाहिजे. आम्ही लोकांनी स्वत:ला थोडं पारखलं पाहिजे आणि आमच्या आजूबाजूच्यांनी आमच्या पिढीबद्दल आमच्याबद्दल बोलताना आमच्या नव्या जगातले नवे प्रश्न, नव्या जाणिव्या थोडय़ा समजून घ्यायला हव्यात. आमच्या सारख्या पोरांनी बिनधास्त आणि सिरीयस्ली लिहायला, मांडायला लागावं. एकमेकांना समजून घ्यायचा नवा प्रवास सुरू होईल.