शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

सायकलने आॅफिसही, आउटिंगही!

By admin | Updated: May 4, 2017 07:00 IST

पुण्यातला समीर रोज १० किलोमीटर आॅफिसला सायकलने जातो. अनिमेश आणि सुमित्रा विकेण्डलामुंबई पाहत सायकलनं फिरतात. मोनाली आणि कुणाल तर म्हणतात की, सायकल हिमालयातल्या रस्त्यावर चालवा किंवा गल्लीबोळात, त्यानं आनंद बदलत नाही. कोण आहेत हे सायकलवेडे नेमके?

 सकाळी साधारणत: आॅफिसला जायची वेळ. हेल्मेट, हॅण्डग्लोव्हज, रायडर्स गॉगल अशा जय्यत तयारीनिशी समीर आॅफिसला जायला निघतो.तुम्हाला वाटेल, ही सगळी आयुधं वापरून समीर त्याच्या सुपर बाइकवर बसून धूम धूम करत आॅफिसला जाणार.पण नाही. समीरची ही सगळी तयारी चालू आहे सायकल स्वारीसाठी. पुण्यात वडगाव बुद्रुक ते भांडारकर रोड - वडगाव बुद्रुक असा रोजचा जवळपास १० किलोमीटरचा प्रवास समीर सायकलवरून करतो. ओला आणि उबेरच्या गारेगार प्रवासाच्या आॅप्शनवर फुली मारत समीर गेली चार वर्षे सायकलवरून आॅफिसला जातोय. ‘सुपर वाटतं..’ - समीर सांगतो. या सायकलिंगमधून काय काय मिळतं असं विचारलं तर सांगतो, ‘एक म्हणजे निखळ आनंद. माझ्या सायकलच्या बाजून धूर उडवत जाणाऱ्या गाड्या पाहिल्या की वाटतं, थँक गॉड, मी प्रदूषण करत नाहीये. सुरुवातीला आॅफिसमध्ये खूप थट्टा झाली. माझे कलीग्ज टर उडवायचे, हसायचे. पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आता तर सोशल मीडियामुळे सायकलिंग कसं कूल आहे हे सांगण्याचा नवा टे्रण्डच सुरू झालाय. आता माझा बॉसपण माझ्यामुळे इन्स्पायर झालाय. तो पण सायकल चालवतो. अनेकजण विचारतात, यार समीर, सायकल लेनी है, थोडा गाइड करेंगें क्या? सायकलिंगची इतकी नशा चढलीय की शनिवार-रविवार आॅफिसला सुटी असली की मी सायकल काढतो आणि जातो भटकायला. एकदा पुणे ते महाबळेश्वर व्हाया कास पठार सायकल चालवत गेलो होतो. जवळपास २५० किलोमीटर. त्या प्रवासाची झिंग अजून उतरली नाहीये. एकदा सायकल चालवायला लागलं की डोकं हलकं व्हायला लागतं, अनेक प्रश्नांची उत्तरं सापडायला लागतात. अनिमेश आणि सुमित्रा मूळचे कोलकात्याचे.नोकरीनिमित्त दिल्ली, अहमदाबाद करत करत मुंबईत आले. आम्ही बिल्कूल पार्टी पीपल नाही आहोत असं म्हणणाऱ्या आणि फिटनेस फिक्र असलेल्या अनिमेश आणि सुमित्राला मुंबईनं सायकलिंगचा पर्याय दिला. आणि तोच ऱ्हिदम पकडत या दोघांच्या सायकल्स सुसाट सुटल्या. एरोली ते कुलाबा, पवई असं सुमित्राचं मुंबई दर्शन चालू आहे पण सायकलवरून. मुंबईतली सर्वात हॅपनिंग जागा कुठली, असा प्रश्न विचारला तर सगळेजण एकच उत्तर देतील ‘टाउन’. जुन्या ब्रिटिश राजवटीच्या खुणा अंगावर मिरवणाऱ्या आर्ट डेको इमारती, इराणी रेस्टॉरण्ट्स, डिस्को, स्ट्रीट शॉपिंग आणि अर्थातच समुद्र या सगळ्यांच्या प्रेमात आकंठ बुडालेला माणूस न सापडणं विरळच. सुमित्रानं ही मुंबई पाहिलीय, अनुभवलीय पण सायकलवरून. सायकल चालवता चालवता बस आणि रिक्षावाल्यांच्या ड्रायव्हिगंचा बरावाईट अनुभवही सुमित्रानं घेतलाय. ‘खूप जेवलो किंवा खूप गोड खाल्लंय त्यामुळे उद्या कॅलरीज बर्न केल्याच पाहिजेत असं ठरवून आम्ही सायकलिंगला जातो. पोटात गेलेल्या एक्स्ट्रॉ कॅलरीज आम्हाला मोटिव्हेट करतात सायकलिंगसाठी!’ - सुमित्रा हसत हसत सांगते. कुणाल आणि मोनाली टिपिकल मुंबईकर जोडपं. सोमवार ते शुक्र वार घड्याळाच्या काट्यावर धावत करिअर करायचं आणि वीकएण्डला सोशल लाइफ एन्जॉय करायचं असा क्लीअर फोकस. पण आता त्यांनाही सायकलिंग एक चांगलं स्ट्रेस बस्टर वाटतंय. आमच्या सायकल्स साध्या आहेत, गिअर वगैरे काही नाही. आम्ही बाजारातून वाणसामान आणायला सायकलवरून जातो. हेल्मेट, शूज घालून सायकल चालवताना सगळेजण बघतात आम्हाला. आणि परत येताना आमच्या सायकलच्या हॅण्डलला भाजी आणि किराण्याची पिशवी असते. कुणालला हे सगळं जामचं फनी वाटतं. पण मोनालीला वाटतं, ‘सायकल चालवणं महत्त्वाचं. मग तुम्ही ती हिमालयात चालवा किंवा गल्लीबोळात. त्यातून मिळणारा आनंद सारखाच असतो.’या साध्या सायकलवर प्रॅक्टिस करून मग गिअरची सायकल घ्यायचा तिचा विचार आहे. गाडीतून फिरताना दिसणारे रस्ते आता सायकलवरून फिरताना वेगळेच दिसतात. चांगले कळतात. हॅण्डल आणि पेडलचा ताळमेळ जमला की कानात शिरणाऱ्या वाऱ्यावर स्वार होत वेगाची नशा चढायला लागते आणि ज्यांना ज्यांना या नशेची भुरळ पडली त्यांच्या पावलांना पेडल खुणावू लागतात.म्हणूनच अनिमेशनं नवी मुंबईत एरोली सायकलिंग एन्थुझिस्ट नावाचा क्लब सुरू केलाय. त्याच्यासारखेच अनेक सायकलवेडे वेळ मिळेल तेव्हा, सुटीच्या दिवशी सायकलवर स्वार होत नव्या जागा एक्सप्लोअर करतात. नवे मित्र मिळतात, ओळखी होतात. आता अनिमेश आणि सुमित्राचं पुढचं टार्गेट आहे मुंबई-दार्जिलिंग सायकलिंग आणि लेह लडाख आॅन सायकल. आणि समीरला तर मान्सूननंतर थेट सायकलवरून कन्याकुमारी गाठायचंय. सेल्स, टार्गेट आणि एन्क्रीमेण्टच्या विचारांबरोबरीनच या सगळ्यांना स्वत:चा स्टॅमिना वाढवण्याचं, नवी स्किल्स शिकण्याचं टार्गेटही अचिव्ह करायचंय.भारतात जिथे फुटपाथवर फेरीवाले असतात, रस्त्यांवरून माणसं आणि गाड्या चालतात या सगळ्या गोंधळात निखळ आनंद शोधणारी ही सगळी सायकलवेडी जमात. मुंबई-पुण्यातल्या ट्रॅफिकने, बेशिस्त ड्रायव्हिंगने हैराण होणाऱ्या आणि दिवसभर आॅफिसमधल्या ताणावर वैतागणाऱ्या स्वत:साठी गर्दीत ऊर्जेच्या आणि उत्साहाच्या वाटा शोधत पेडल मारताहेत. त्यांनी स्वत:साठी एक सायकलवाट निवडली आहे..- शची मराठे - (मुक्त पत्रकार असलेली शची उत्साही सायकलवेडीही आहे.)